Saturday, March 28, 2009

आभाळाचे डोळे ..........


उंच पाहिल्या वर काय दिसतं ?
पहिलं ,पाहिलं अ ह काय दिसतय ?
अ रे हो फक्त आभाळ.....................!
त्याच्यात पाणी असतं ना ....पावसाळा आला की ते ढग पाणी टाकुन जातात ...

माझी आई सांगायची ढग वर वर जातात आणि ठण्ड होतात
मग पाउस पडतो ..टिप टिप आणि थंडगार होते सारे काही .....!

पण एकदा मी आईच्या डोळ्यात पाणी पाहिलं
आईला हळूच म्हणालो ,आई ढग खुप वर गेलेत काय ग ?तुझ्या डोळ्यातून टिप टिप पाउस पडतोय

आई म्हणाली नाही रे बाळा...
जेव्हा ढग वर जातात तेव्हा त्यांचं वजन ते कमी करतात ...आणि आपण त्याना पाहिलं की
ढग डोळ्यात जमा होतात आणि डोळे ठण्ड करण्या साठी पाणी तिथेच सोडून जातात ......!!


चिमनिताई.......

निराकार .....


मी आता तुला पाहिले
अन तू मला दिसलास
खुप फिरवलेस ,लपलास
पण तरीही भेटलास ....

पाहिले तेव्हाच समजलो
तू असाच आहेस
निराकार ,निर्गुण
पण तरीही भेटलास .....

तुला डोळे नाही तरीही
तू पाहतोस ,
कान नाही तरीही
तू ऐकतोस ....

देवा विशाल रूप तुझे
असून तू अदृश्य राहतोस
आणि सारे काही पारदर्शी
असून तू अपारदर्श्याचा भास् करतोस

भ्रम आणि ज्ञान
दोन रुपाचा खेळ करतोस
कधी भेटतोस अन कधी हरवतोस
सदगुरु रुपाने दर्शन देतोस .....


चिमनिताई.......

बघ जमतय का ?


पहावे तुला असेच
आंधळ्य़ा डोळ्यांनी
अन बोलावे तुझ्याशी
मुक्याने
बघ जमतय का ?

सारं काही विसरावं
तुला कवेत घ्यावं
र्हुदयाने स्पर्श करावा
अन ऐकावे स्पंदने
बघ जमतय का ?


चिमनिताई.......

प्रार्थना


हे देवा ,निरंकारा
अविनाशी अनंत बहुगुणा
दयालु मालिक ,परमेश्वरा
तू सर्व काही पाहतोस

तुझ्या वाचून काहीच नाही
निरंतरा ,विठ्ठला ,पांडुरंगा
सर्वांचा मालक
तू एकच निराकार आहेस

सुखात काही जन तुला विसरतात
पण तेच दुखात तुला आठवतहि असतात
माणूस आपली कर्म भोगत असतो
चौ ~याएंशी लक्ष्य योन्यां मधून
त्यांचा न्याय निवाड़ा तू करतोस
अशी ही काही मानसं आहेत
जी दुखात ही तुला आठवत नाहित
त्यांच्या जीवनातून तुझे रूप
नष्ट झाले आहे ............
त्यांच्या विचारातून तू निघून गेला आहेस
त्यांचे देखिल भले कर
....



चिमनिताई.......

कवितेची सुरवात ....कविताच कविता


कवितेची सुरवात ....कविताच कविता

माती ,
माती पासून सुरवात होते कवितेची
मातीत पाणी मिसळुन सुरवात होते
माती पासून मडकं अन सुरवात होते
मडकं भट्तित तापुन सुरवात होते

(कुंभार)
कविता इथून सुरवात होते

आग
आगि पासून सुरवात होते कवितेची
आगीशी खेळतात मुले अन सुरवात होते
आगीशी खेलानारी मुले आग असतात
एक नवा जोश असतो अन सुरवात होते

(मुले )
कविता इथून सुरवात होते

हवा
हवे पासून सुरवात होते कवितेची
मौसम पावसाचा ओलिचिंब हवा सुरवातीची
मौसम उन्हाचा कोरडी हवा अन सुरवात होते
मौसम थंडीचा अन सुरवात होते कवितेची

(आनंद )
कविता इथून सुरवात होते

फक्त एक कारण पाहिजे असते कविता करण्या साठी...
मग काय कविताच कविता
माणसाला काय पाहिजे
साडे तिन हाथ जमिन,
अन्न वस्त्र ,निवारा
आणि पाव शेर आनंद अन छटाक भर जीवन
तोच माणूस पुन्हा परतत आहे
आपल्या छोट्या मोट्या गरजाना घेवून
आणि सुरु होते
आणि सुरु होते आणखी एका कवितेची

चिमनिताई.......

गुलाबी सुहास ..........!!


लव लवत्या पापण्या तुझ्या
काळ्जाच पाणी करुण जातात ,
तुझ्या एका इशा~याने
मनातले पक्षी ह्रुदयात घर करुण राहतात ....!!

तुझ्या स्मित हास्यात
माझ्या लाळेला थारा मिळत नाही
अन ओठांच्या मुकुंदात
धनुष्याचे माप खिळत नाही ......!!

प्रेमा तुझा रंग न्यारा निराळा
कधी वेगळा ,जिव्हाळ्याचा ,
रख रखत्या उन्हात अनवाणी पायांना
थंडगार स्पर्श हिवाळ्याचा ......!!

तुझ्या श्वासात एक श्वास माझा
नुसताच उगाच एक आभास माझा
आरंभ ही तू अन अंत तू
माझ्या गीतातले संगीतही तू ......!!

चिमनिताई.......

प्रेमाविन


जीवनाचा खेळ माझा
नेहमीच नवा रंग घेतो
कधी सुखाच्या कारंज्याचा
तर कधी ज्वालेचे चटके देतो ...!!

आणिबानी कधीही होवे
घाव हृदयावरती होतातच
सुखाचा पाउस येताच मनी
दुखाचे थेंब पड़तातच ....!!

नाहित मित्र शब्द आता
शब्दाविना जगु कसा ?
शरीराचे घाव भरतील पण
मनाला मलहम लावू कसा ?

"कोमलताही" मनाची झाली
वीरघळले त्यात सारे काही
जगने आता कठिन आहे
मरने ही सोपे नाही .....!!

प्रेमाची शब्दे कमी झाली
दुराव्यांनी भग्नं केलि
प्रेमाचं नाव संपले आता
दुखाची लाट आपली केलि


चिमनिताई.......

********#

घे जाणून आज मला तू
नुसत्या बाता करू नको
जिवाला जिव देइन मी
नुसत्या हाका मारू नको

जरी नसलो तुझ्या जवळ
एक पुकार अंतरातून मार
येन नक्कीच स्वप्नात तुझ्या
फक्त एकदा तू मला स्वीकार ...

क्षण हे विरहाचे माझ्या दुखाचे


क्षण हे विरहाचे माझ्या दुखाचे
मी मलाच हरवून जातो
या क्षणात विरून जातो
तडफडतो अन तडपतो
क्षण हे विरहाचे ,माझ्या दुखाचे

क्षण हे विरहाचे ,माझ्या दुखाचे
ह्रदयाला तडे पड़तात
घाव अनिकगहिरे होतात
मन ही तडपत राहते
क्षण हे विरहाचे ,माझ्या दुखाचे

क्षण हे विरहाचे ,माझ्या दुखाचे
विजाही साथ देतात
पावुसाही बरसाया लागतो
अश्रु ही वाहू लागते
क्षण हे विरहाचे ,माझ्या दुखाचे

क्षण हे विरहाचे ,माझ्या दुखाचे
मी असाच स्थब्द होतो
मनाची समजूत घेतो
खोल खोल सागराच्या गहिराइत जातो
क्षण हे विरहाचे ,माझ्या दुखाचे

क्षण हे विरहाचे ,माझ्या दुखाचे
अंधारही साथ सोडतो
प्रकाश ही दुजोरा देतो
चंद्राच्या प्रकाशात मी टिप टिप आसवे गाळतो
क्षण हे विरहाचे ,माझ्या दुखाचे

क्षण हे विरहाचे ,माझ्या दुखाचे

चिमनिताई.......

अनंता हुनी थोर ....

अनंता हुनी थोर तुझे उपकार देवा
या जन्मास घातले मला

परत फेड केलीच पाहिजे या आत्म्याला
तू अपार शक्ति दे मला

प्रेमा तुनि सांडतो रचना परमात्म्याची
सगुणा धरूनही निर्गुणाची भक्ति

तू यथा सार्थ महाभारत ,रामायण ही तूच रचे
अश्या कलेची आता दे मजला शक्ति

अदृश्या तुनि दृश्य म्हनू मी तुजला
का अव्यक्ता तुनि व्यक्त करू

अनंता तुनि प्रगटू आता अन
कना कनातुन मोकळे करू

धरिले चरण आता तुझे मार्ग ही तूच असे
जीवन गाथा समक्ष तुझ्या एने जाने तूच रचे

अंधारातून दाखवी मार्ग साक्ष मोक्ष तूच रे
पार आता तूच कर अन सामाव तुझ्या करांत रे

चिमनिताई.......

Friday, March 20, 2009

शेवटचं लेण .....

शेवटचं लेण
कसं सांगू मी तुला
की मी तुझ्यावर आजही प्रेम करतो

क्षणा क्षणाला तूच दीसतेस
आणि आठवानित तुलाच पाहतो .....

या वेड्या मनाला किती समजावू
या मिनमिनत्या प्रकाशात किती पाहू

आठवण पुसट होण्या अगोदर
जगाचा निरोप घेण्या अगोदर
ह्रदयाच्या पिंज~यात केलेलं घर
एकदा आपल्या हाताने सजवून जा ....

फुलांचा गंध ,पानांचा रंग
या सप्तरंगी इंद्र धनुला आज माझी गरज आहे
माझं प्रेम आंधळं होतं
हेच मला शेवटचं समजावून जा .....

आता श्वास घट्ट होत चाललाय
ह्रदयाची स्पंदनं वेग घेतायत
पुन्हा भेटिन न भेटिन
एकदा मिठीत येवून जा ...

चिमनिताई ........

नाही कोणी........


नाही कोणी जन्मी ,नाही कोणी अंती
तरीही चक्र, फिरतसे....!!

नाही काही तृण ,नाही तेथे दावाग्नि ।
जाय तो विझोनी ,आपसया...!!

नाही काही शस्त्र ,नाही तेथे योध्हा
तरीही प्राण जातो ,आपलाच ...!!

नाही काही लेख ,नाही ही कविता
जाय वाचत तू ,मंत्रमुग्ध ..!!

नाही काही पाप ,नाही येथे पुण्य
तरीही तड जोड़ ,होतसे ...!!

संदी येथे भिकारी ,तुम्ही इथे देव
देवुनिया दान, होई उपकार ...!!

चिमनिताई ........

अंतरे अशी दूर लोटली


अंतरे अशी दूर लोटली
जवळ येवून माझी नं राहिली

जरी मी परतीच्या वाटेवर
ती राहुनही स्थब्द राहिली

पुन्हा ही ओळ मुखावर आली
आणि अंतरे अशी दूर लोटली

परदा पुन्हा सावरला दुरवर
अन शब्द शब्द टोचत राहिली

जगने जगने आणि मरने शेवटी
जगण्याची राह एंटी भेटली

अन मरुन्ही जगने आले वाटी
आणि अंतरे अशी दूर लोटली

बुन्ध्या लागुन झाड़ वाढले
जगले मारले काल लोटुनि

अंता तुनि ही जीवन उरले
तरी न झाल्या गाठी भेठी....

चिमनिताई ........

प्रेम गंध निराळा


प्रेम गंध निराळा
झोका वाहत जातो

नवनव्या कळ्यांच्या जागी
नवा वारा वाहत येतो

झुरतो अंत तरीही
आठ्वनित येत राहतो

परिपूर्ण ना कधीही
येता जाता वाहतो

गर्दित माणसांच्या
आपला जिव पाहतो

असला किती ही दूर
आपला आपणच शोधतो

तरीही आकांत शोक
करू एकदा पाहतो

जेव्हा जिव शरीर
सोडू धरु पाहतो

चिमनिताई ........

गाणारा आहे पक्षी मी

गाणारा आहे पक्षी मी
रोजच नवे गीत गातो

कोणी अइका नाही तर सोडून दया
मी माझच मन त्यात रमवतो......!!

अड़खळनारे पानी मी
रोजच नवे मार्ग काढतो

कोणी चाला अथवा सोडून दया
मी माझाच मार्ग सुंदर करतो .....!!

काट्यां मधले फुल मी
रोजच फुलतो आणि बहरतो

कोणी सुगंध घ्या अथवा सजवा देवा चरनी
मी माझेच मला भाग्य समजतो ....!!

आकाशातालं ढ़ग मी
रोजच येतो आणि बरसतो

कोणी भिजा अथवा चिंब व्हा
मी माझ्या जमिनीची तहान भागवतो ....!!

ह्रदयात राहणारा मी एक आत्मा
नेहमीच नवे शरीर बदलतो

कोणी माना अथवा न माना
देवाची करनी मी आहे भोगतो ....!!

मुलींच्या ह्रुदयातला मी आहे राजा
रोजच नवी मुलगी गठवतो

कोणी प्रेमात पडा अथवा न पडा
माझा वेळ मी असाच घालवतो .....!!

संदीप पाटिल ....!!

दिल की परेशानी मुझे दे दो


हवा का एक झोका ,प्यारसे मुझे है सहलाता
दर्द अपना कह जाता है ,और एकही बात गुनगुनाता ...|

सौदागर नही मै ......पर फ़िर भी मुझे एइसा लगता
कुझ दर्द है तेरे सिने में ..बार बार जो धक् धक् करता ...|

प्यार न करना तू मुसाफिर , प्यार में दर्द तो होता है
मिलना और बीछडना , बस युही चलता रहता है ...|

एक सौदा तू करले मुझसे ,दिल की परेशानी मुझे दे दो
मेरा सुख अपना समझकर ,सुखी तुम जीवन को कर दो ...|

इसमे न कोई घाटे बाजी ,बस प्यार से तू दूर रेहना
समझ ले तू बात कवि की ,बस येही मुझे हर दम कहना ...|

चिमनिताई ........

कोणी माझ्याशी लग्न करील काय ?


लग्ना साठी माझी माहिती मी थोडक्यात देत आहे ..जर कोणी इच्छुक असेल तर जरुर कळवा........
एकदा असाच एक नातेवाइका कड़े गेलो होतो ,त्यांची काही तयारी चालु होती आणि मला सांगितले की
नव~या विषयी तू काही माहिती लिह्शील का ?जेने करून नवरी कडचे लवकर पसंत करतील ..मी हो म्हणालो आणि दोन प्रत लिहल्या ,त्यातली ही एक ....


गबाळा ,गबरू , पोट फूट्या
डोक्याच्याही दोनच पाति
असा दिसतो मी
कोणी माझ्याशी लग्न करील काय ?

कधी धोतर घालतो ,नाडी बांधतो
कुडचिलाही दोनच गुंड्या
असा दिसतो मी
कोणी माझ्याशी लग्न करील काय ?

वजन हलके ,काटा तुट्न्या जोगे
कधीही न सावरनारे ,गोल घुमट
असा दिसतो मी
कोणी माझ्याशी लग्न करील काय ?

पोहचत नाय कानाला हाथ .नाकाला जीभ
गुलाबाचे गाल
असा दिसतो मी
कोणी माझ्याशी लग्न करील काय ?

लोका संगे ब्रम्ह ज्ञान ,स्वतः मात्र कोरडे पाषाण
दिन माझा नेहमी सुखी
असा दिसतो मी
कोणी माझ्याशी लग्न करील काय ?

संदीप पाटिल...!!

हिशोब...!!


कुठेतरी असं अइकलेलं

प्रेमात सर्व काही माफ़ असतं

पण जीवनाच्या हिशोबात

सर्व काही साफ़ असतं

मी तुझ्यात मिळालो तर

बेरीज झाली असं समजावं

मला तुझ्या तुन वगळता

वजाबाकित शून्य उमजावं

तुझ्या तुन मी वजा होतांना

माझी बाकी तुझ्या हवाली करेन

ती तुझ्यात न मिसळता

त्यांना स्वप्नातच मिरवेन

हिशोबाच्या बाबतीत हे असच होणार

कधीतरी चुकायचं कधीतरी बरोबर येणार

मग मी फक्त प्रेम देणार

अन बेरजेची संख्या वाढवत जाणार

चिमनिताई ........

उगावालो मी आज पुन्हा


उगावालो मी आज पुन्हा
नव्या आशेने नव्या उषेने

मावळलो नव्हतोच मुळी
परद्यात होतो काही काळ

सूर्य आजचा प्रखर आहे रे
निसतेज पोकळी भासवितो

मावळणार आज ही तो
परद्यात होता काही काळ

नकळत बोलून जातो मी
काळ्या कुट्ट अंधारातहि

अस्तित्वाची जाणीव होइल ,कारण
परद्यात होतो काही काळ

पुन्हा आठवतील शब्द माझे
करतील तुझ्या ह्रुदयात वार

टोचतिल मग हळु हळु ,कारण
परद्यात होते काही काळ

पुन्हा पुन्हा मी तेच आठवतो
तेच शब्द आणि तीच कविता

शब्द फुलांची करतील माळ ,कारण
परद्यात होते काही काळ

चिमनिताई ........

हरवलेलं शोधतोय ....!!


तू जे चित्र स्वप्नात बनवले होते
आज मी त्यात रंग भरला आहे
तरीही ते चित्र अर्धवट दीसत आहे
कारण त्या चित्रात तुझ्या असण्याचा वास नाही ......

तू जे कधी शिखर बनवले होतेस स्वताहा साठी
त्या शीखरावर आज मी उभा आहे
तरीही ते शिखर अर्धवट दीसत आहे
कारण त्या शीखरावर तुझ्या असण्याचा वास नाही ......

तू माझ्या हास्यावर जे जग सजवले होते
आज ते हास्य कुठे तरी गुडुप झाले आहे
हसतो तर आज ही मी माझ्या विरंगुळ्या सोबत
कारण त्या हास्यात तुझ्या असण्याचा वास नाही ....

तू कधी म्हणाली होतीस की शब्द यात्रा करतात
जर देवाची खरच कृपा असेल तर
माझे हे शब्द तुझ्या पर्यंत जरुर पोहचतील
आणि तू .....

मला पुन्हा ती झोप दे
जी मला संध्याकाळी तुझ्या कुशीत यायची
मला पुन्हा ती स्वप्न परत दे
ज्यात प~या मला झोपवायच्या.....

अश्या या यादगार संध्याकाळी
मी नेहमी असाच झोपेन
आणि या यादगार संध्याकाल ची
सकाळ पुन्हा न येवो ,पुन्हा न येवो ......

चिमनिताई ........

राहून गेलं ..!!


बरच काही करायच होतं
...पण राहून गेलं .
बरच काही सांगायचं होतं
...पण राहून गेलं .
जाता जाता शेवटच एक
...पण तेहि राहून गेलं ..

बसलो होतो कल्प वृक्षाच्या खाली
पण मागायचं राहून गेलं .....

गेलो होतो कामधेनु कड़े
पण आवरायचं राहून गेलं .....

धड़पडलो आयुष्यात खुप
पण सावरायचो राहून गेलो ....

लिहता लिहता लिहत गेलो
पण वाचायचं राहून गेले

ओन्झळितले दोन थेंब सांडत होते
पण झेलायचे राहून गेले

तुझ्या बरोबरचे सुखाचे दोन क्षण
पण आठवानित राहून गेले

चिमनिताई ........

तुझ्याच साठी ..!!


चोळा झाले हे शब्द ,गोळा झाले हे शब्द
मी फुललो शब्दांसाठी ,ही शब्द फूले तुझ्याच साठी

वेचतो हे शब्द ,टाकतो हे शब्द
मी माळलो शब्दांसाठी ,ही शब्द माळा तुझ्याच साठी

तरंगले हे शब्द ,बुडले हे शब्द
मी उन्मळतो शब्दांसाठी .ही शब्द लहर तुझ्याच साठी

वाहिले हे शब्द ,गणले हे शब्द
मी वाहवलो शब्दांसाठी , ही शब्द सुमने तुझ्याच साठी

मोतिले हे शब्द ,पोतिले हे शब्द
मी अडकलो शब्दांसाठी , ही शब्द माळ फक्त तुझ्याच साठी

चिमनिताई ........

भावना ..मनातल्या


आसमंत गोठलेला
...व्याकुळ भावनांनी
मिश्मित हा किनारा
....निशब्द बंधनांनी ....!!

आठवणीत रम्यतारा
....तुझ्या नाद कळ्यांचा
मनी साठवत होतो
....नाना शोभेल गळांचा...!!

मंतरलेल्या राती येतात
....एक एक करून पाझरतात
मी वास्तव्याला घाबरतो मग
....आठवनी एकट्याच राहतात ....!!

क्षण क्षण तू सामोरी येते
....मी क्षणाला थोडा सावरतो
हा गंध तुझा ,हा छंद तुझा
....मोहात तुझ्या मी बावरतो ...!!

चिमनिताई ........

पाहिला मी पाहिला


पाहिला मी पाहिला
श्री हरी या डोळा पहिला ...!!

वास्तव्याचा खडा घडा
मी या डोळा पाहिला ...!!

अमृताहुनी गोड रसाचा बुडबुडा
म्या या रसानाने चाखिला ....!!

भाव भक्तीचा सोहळा पंढरपुरला
म्या रायाला वाहिला ....!!

प्राशले चरण अमृत पालखिचे
म्या धन्यत्वाला जाहला ...!!

चिमनिताई ........

अमृतानुभव _3




आता नाही चुका
आता नाही रुका
तरीही माणूस भूका | लागलाय ||

नाही केलि चोरी
तरीही विद्या अघोरी
घराला नाही मोरी | आपलिया ||

गोड लागे पावा
त्याले धरून चावा
जात माणसाची लावा |लागोलागी ||

जो प्रियुचि प्राणेश्वरी
त्याचा गुरु ज्ञानेश्वरी
त्यासी भावे सर्वेश्वरी | अखंडित ||

विठ्ठल नाव गावे
जन्मोजन्मी तूच पावे
निरंतरा तुलाच भजावे | दररोज ||

चिमनिताई ........

अमृतानुभव _2


ज्ञानरूपा ,अष्टविना दया सागरा
अत्ताराविना सुवासिता ...

गर्भ नयना ,सर्व भूता गुनाधरा
पार्थाविना अखण्डता ....

तेज मुखा ,पैलू गुना अविष्टता
आकाराविना निर्गुणा.....

पुष्प ज्योतिका ,नाद वन्दिका विशाचिये
अमृताचा विशदु ....

परी दर्पणे ,न पाहने होए पाहने
ऐसा सकळ दृष्टिचा ....

नाही कसला मुळ,अविराक्त गजानना
अम्बराविना भिडे आकाशा ....

चिमनिताई ........

तुला याचे काही नाही ..!!


कोणी जगाने नाही
कोणी मरने नाही
मला हे खरे वाटते
याचे तुला काही नाही ...!!

कोणी हसने नाही
कोणी रुसने नाही
मला ही तर गम्मत वाटते
तुला याचे काही नाही ...!!

कोणी सत्य नाही
कोणी खोटे नाही
याचा परिणाम कसा होतो
तुला याचे काही नाही ..!!

कोणी फुल्पुष्प नाही
कोणी दगड-धोंडा नाही
यांनी कसे वावरावे
तुला याचे काही नाही ..!!

कोणी भावना नाही
कोणी पाव्हणा नाही
यात कसला मतभेद आहे
तुला याचे काही नाही ...!!

कोणी पास नाही
कोणी आसमांत नाही
सारे काही आपलेच आहे
तुला याचे काही नाही ..!!

कोणी दया नाही
कोणी धर्म नाही
सारी मानसं एकच आहेत
तुला याचे काही नाही ....!!

कोणी विष नाही
कोणी अमृत नाही
सारी सरणावर येतच राहतात
तुला याचे काही नाही ..!!

कोणी भुत नाही
कोणी भविष्य नाही
वर्तमानात जगनेच अवघड
तुला याचे काही नाही ....!!

चिमनिताई .......

एकच मार्ग ... ..!!


करतो मी पाप
रोज ....क्षणा क्षणाला
विचार ही करतो
पापाच्या पुण्याईचा ...!!

क्षणभर उभा राहतो
रडतो ... डोळे भरून
का करतो मी असं ?
माणूस आहे मी पाच तत्वांचा ..!!

अन्नाताच्या पलिकडे पाहतो
क्षणिक .....एका सुखासाठी
विसावतो मायेच्या तराजुत
तो एकच घटक आनंदाचा ..!!

रामाचे प्रतिबिम्ब अनुसरतो
लौकिक ....भावानुबंधासाठी
रावणाच्या इच्छ्यांच्या आदरात
बनतो भागीदार पापाचा ...!!

नाद खुळा ह्या मुर्खाचा
वेडा ...भावाअभावी
३ लोक ९ खंड १८ पुरानांचा
अभ्यास करतोय ज्ञानाचा ...!!

चिमनिताई .....