Wednesday, April 15, 2009

प्रवास

संपत नाही प्रवास तोवर चालत जाने
रस्ता म्हणजे जीवन उगाच तुडवत जाने

जाती अन भाषा घेवून बोभारा फुकने
कधी कधी तर ताकतिच्या आधीन जाने

पडला जर प्रकाश असा तेजोमय सुर्याचा
अंधाराचे कधी कवडसे वेचत जाने

कसले पानी कसली वाणी वाया आहे सर्व काही
देहाच्या मागण्या अधाशी अश्याच पुरवत जाने

कधी वास सुखाचा न लागो ...रे मानवा
दुःख असेच हे पेरित जाने दुःख असेच हे पेरित जाने

कवी चिमनिताई


1 comment:

GMG110987 said...

घरट
--------------------

खिडकी बाहेरच्या घरट्यात
चिमणा चिमणी बसलेहोते
हिरमुसलेले .... चुकल्या चुकल्या सारखे ...

काल परवा उडायला शिकलेली पिल्ल
भूर्रकन उडून गेली होती ... त्यांच्या नव्या आकाशात...

आणि यांच आकाश ... एकट एकट ... भकास...
बिच्चारे चिमणा चिमणी ...
कदाचित पिल्ल परत येण्याची वाट पाहात असतील
एवढ्या कष्टाने घरट बान्धल..
पिल्लाना चारा पणी भरवल...
फुला सारख जपत मोठ केल..
आणि पिल्ल साली परक्या सारखी उडून गेलीत ...

पिल्लाना शिव्या घालातच होतो .. तेवढ्यात मोबाईल वाजला
आई बाबांचा भारतातून फोन होता ...
क्षणभर थबकलो .....
आणि नंतर फोन घेण्याची हिंमत झाली नाही.