Thursday, August 5, 2010

मी तर स्त्री रे ...


मी अश्या आशेवर जगते ..
कधी मरत मरत ही जगते ...
कधी जगत जगत ही मरते..
मी तर स्त्री रे ...

उष्टी भाकरी कधी कुणाची
दोन घास पोटा पाण्याची ..
मी तर झाड़ा सारखी सुकते रे
मी तर स्त्री रे ...

उसवलेले जीवन माझे
दुखह ,दारिद्र्य धाग्याचे
मी तर शिवते ...सुख दुख्हालाही रे ..
मी तर स्त्री रे ...

कोणी नाही माझे माझे
ना येथे कोणी माझे तुमचे
लचके तोडतात डोळ्यांनी श्वापद रे ..
मी तर स्त्री रे ...

कधी आई .अन कधी बहिन मी
कशी वाचवू लाज मी माझी
धागा राखिचा भावु माझ्या रे
मी तर स्त्री रे ...

मधु (चिमनिताई ) ...

No comments: