Thursday, August 5, 2010

वृंदा वनात....


वृंदा वनात छेडिली तार
सुर माझे आले घन न नं न घन नं न नं न

मी व्यथित झाले ..चिंतावले
कोणी छेडिली सतार ..घन न नं न घन नं न नं न

नयन माझे दिपावाले
सामोरी राम अवतारले घन न नं न घन नं न नं न

मन माझे एक पतित उच्चारिले
मीच क्षमा मागुनी स्मरिले घन न नं न घन नं न नं न

नयन माझे झंकारले
सामोरी कृष्ण अवतारले घन न नं न घन नं न नं न

मोहुनी मीरे सम मज घेतले
ह्रुदयात बनुनी राहिले सावकार घन न नं न घन नं न नं न


माधवी ..(चिमनिताई )

मी तर स्त्री रे ...


मी अश्या आशेवर जगते ..
कधी मरत मरत ही जगते ...
कधी जगत जगत ही मरते..
मी तर स्त्री रे ...

उष्टी भाकरी कधी कुणाची
दोन घास पोटा पाण्याची ..
मी तर झाड़ा सारखी सुकते रे
मी तर स्त्री रे ...

उसवलेले जीवन माझे
दुखह ,दारिद्र्य धाग्याचे
मी तर शिवते ...सुख दुख्हालाही रे ..
मी तर स्त्री रे ...

कोणी नाही माझे माझे
ना येथे कोणी माझे तुमचे
लचके तोडतात डोळ्यांनी श्वापद रे ..
मी तर स्त्री रे ...

कधी आई .अन कधी बहिन मी
कशी वाचवू लाज मी माझी
धागा राखिचा भावु माझ्या रे
मी तर स्त्री रे ...

मधु (चिमनिताई ) ...

Wednesday, April 15, 2009

प्रवास

संपत नाही प्रवास तोवर चालत जाने
रस्ता म्हणजे जीवन उगाच तुडवत जाने

जाती अन भाषा घेवून बोभारा फुकने
कधी कधी तर ताकतिच्या आधीन जाने

पडला जर प्रकाश असा तेजोमय सुर्याचा
अंधाराचे कधी कवडसे वेचत जाने

कसले पानी कसली वाणी वाया आहे सर्व काही
देहाच्या मागण्या अधाशी अश्याच पुरवत जाने

कधी वास सुखाचा न लागो ...रे मानवा
दुःख असेच हे पेरित जाने दुःख असेच हे पेरित जाने

कवी चिमनिताई


Saturday, March 28, 2009

आभाळाचे डोळे ..........


उंच पाहिल्या वर काय दिसतं ?
पहिलं ,पाहिलं अ ह काय दिसतय ?
अ रे हो फक्त आभाळ.....................!
त्याच्यात पाणी असतं ना ....पावसाळा आला की ते ढग पाणी टाकुन जातात ...

माझी आई सांगायची ढग वर वर जातात आणि ठण्ड होतात
मग पाउस पडतो ..टिप टिप आणि थंडगार होते सारे काही .....!

पण एकदा मी आईच्या डोळ्यात पाणी पाहिलं
आईला हळूच म्हणालो ,आई ढग खुप वर गेलेत काय ग ?तुझ्या डोळ्यातून टिप टिप पाउस पडतोय

आई म्हणाली नाही रे बाळा...
जेव्हा ढग वर जातात तेव्हा त्यांचं वजन ते कमी करतात ...आणि आपण त्याना पाहिलं की
ढग डोळ्यात जमा होतात आणि डोळे ठण्ड करण्या साठी पाणी तिथेच सोडून जातात ......!!


चिमनिताई.......

निराकार .....


मी आता तुला पाहिले
अन तू मला दिसलास
खुप फिरवलेस ,लपलास
पण तरीही भेटलास ....

पाहिले तेव्हाच समजलो
तू असाच आहेस
निराकार ,निर्गुण
पण तरीही भेटलास .....

तुला डोळे नाही तरीही
तू पाहतोस ,
कान नाही तरीही
तू ऐकतोस ....

देवा विशाल रूप तुझे
असून तू अदृश्य राहतोस
आणि सारे काही पारदर्शी
असून तू अपारदर्श्याचा भास् करतोस

भ्रम आणि ज्ञान
दोन रुपाचा खेळ करतोस
कधी भेटतोस अन कधी हरवतोस
सदगुरु रुपाने दर्शन देतोस .....


चिमनिताई.......

बघ जमतय का ?


पहावे तुला असेच
आंधळ्य़ा डोळ्यांनी
अन बोलावे तुझ्याशी
मुक्याने
बघ जमतय का ?

सारं काही विसरावं
तुला कवेत घ्यावं
र्हुदयाने स्पर्श करावा
अन ऐकावे स्पंदने
बघ जमतय का ?


चिमनिताई.......