मी करू पाहतोय
या गगनाला अजुन उंच
मी करू पाहतोय
या पाण्याला अजुन नितळ
मी करू पहातोय
या धरतीला अजुन घट्ट
मी करू पाहतोय
या शरीराला अजुन बळकत
मी करू पाहतोय
या मनाला अजुन मजबूत
मी करू पाहतोय
या जगाला अजुन मॅमथ (हत्ती सारखा एक प्राणी )
मी करू पाहतोय
या रक्ताला अजुन शिरशिरित
मी करू पाहतोय
या डोळ्याना अजुन तीक्ष्ण
मी करू पाहातोय
या समुद्राला अजुन गोड
मी करू पाहातोय
या सोन्याला अजुन येइल सुवास ...!!
मी करू पाहातोय
या स्वर्गाला शीड्या अमाप ...!!
मी करू पाहातोय
हे भंगलेलं स्वप्न खरं ...!!
मी करू पाहतोय
ही कविता लिहायचं धाडसं....!!
दयाल तुम्ही साथ ..............!!
चिमनिताई ....!!!
Sunday, September 14, 2008
माझी करनी (काम )मला आवडतं ते असं
काय करणार ?
मी असाच राहतो
काय करणार ?
मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!
मी असाच मस्ती करतो
काय करणार ?
मी असा गप्प पण बसतो
काय करणार ?
मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!
मी राज्याची स्वप्न पण बघतो
काय करणार ?
कधी भिका~याचं सोंग ही घेतो
काय करणार ?
मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!
आता रमतय मन मंदिरात
काय करणार ?
देवा कड़े पाट करू की पोट करू
काय करणार ?
मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!
मला आवडते ज्ञानेश्वरी
काय करणार?
दासबोध ही हवाहवा सा वाटतो
काय करणार ?
मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!
शोधतो कधी कधी दगडात देव
काय करणार ?
निराकाराच्या शोधात धड़पद्तो
काय करणार ?
मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!
मग विश्वाचीय ठाई मी होय खोटा खोटा
काय करणार ?
देव पाहि तेव्हा आन्नद होई मोठा मोठा
काय करणार ?
मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!
सकळ विश्वची माझे घर
काय करणार ?
त्यास नाही आकार उकार
काय करणार ?
मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!
गुरु सोडवी अमाप बंधन
काय करणार ?
मी त्याचा वेड़ा एक बाळ
काय करणार ?
मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!
चिमनिताई ....!!
या गुरु कृपा .....!!
गुरु कृपेचा दिधला वारा
गुरु विन आहे संत अधूरा ...!!
ज्ञान रूपा तेज हा पूरा
संत ची वाहती या ज्ञान धारा ....!!
जग कल्याणी अवतार घेतला पारा
पोलादी स्पर्श करुनी न्याहाळतो सोनारा ...!!
रूपा रूपा तुनि प्रगटला न्यारा
चंदनासम सुहासिताला घर संसारा ...!!
या विश्वाचा पालन हरता निरंकारा
पाहतो तुला आज मी या गुरु कृपा ,या गुरु कृपा .....!!
चिमनिताई ...!!
या शांततेत आता...!!
एका अश्या माणसाचे मनोव्रुत्त की जो काही दिवसात मारणार आहे
मी काही वेळ होतो सहवासात माझ्या शब्दात एक दुखः आणि पुढचा प्रवास नंतर कारण
तों जेवढा दुख्हात होता तितकाच आनंदित ही पण हा प्रवास मनाचा ........!!
सचेतनाचा वारा लागतोय
धम्मळ झालीय ही वाणी ....!!
मनी कुणाच्या भास् होतायत
कोण कुजबुजतोय ही गानी...!!
भाव विश्व त्यागले आता
काही नको न चारा पानी ...!!
तन्मय जीवन भोगून सरले
मधुर वाचा न आली कानी ...!!
अनंतेच्या वाटावरती पाठ फिरवुनी
कोण होइल का महा धनि ...!!
एकच आशा एकच तरु
मंदिर झालय हे निकामी ...!!
मंदिर झालय हे निकामी ..........!!
पहा पहा रे जीवन चक्र
फिरते आहे मागे पुढे ...!!
कोण कुणाचा कुणाला खातो
कोण कुणाला आहे भ्यातो ...!!
पाहून धरती आहे म्हणते
ये तुला मी आता समावते..!!
घाबरत तर मी वाघला ही नाही
मोकलं झालय आता हे रानं....!!
जीवन चक्र तर सुरु झालय
शरीरही व्याकुळ अन मनही घाण ....!!
चिमनिताई ....!!
अंत...!!
या शांततेत आता
मानुसाही दगावतोय ...
प्रेमाखातिरही का होईना
माणुसकी विसरतोय...
भुन्ग्याला पंख फूटता
कमळ नवे तो शोधतोय .....
जगण्याला आधार का होईना
चिखला वरी हा उभारतोय.....
पत्किला दिव्याचा पसारा
का अंगात इतका भिनतोय .....
मरन्यास तो आतुरलेला
मृत्यु शीवन्यास जातोय ....
भंगले शरीर आता
मी पोरका झाहालोय ...
या देवाकडे ही विचारन्या
त्वरा कराया लावतोय .....
माखलो मी सर्वानगातुन
जीवही परलोकी पोहचतोय .....
आता हा पसारा हवा हवा सा आहे
अंत ही जवळच टिपून बसला आहे .!!
मी मागतो मला दया नितांत झोप आता
आयुष्याच्या किनारी मी वाट पाहत बसलोय .!!
चिमनिताई ..!!
मानुसाही दगावतोय ...
प्रेमाखातिरही का होईना
माणुसकी विसरतोय...
भुन्ग्याला पंख फूटता
कमळ नवे तो शोधतोय .....
जगण्याला आधार का होईना
चिखला वरी हा उभारतोय.....
पत्किला दिव्याचा पसारा
का अंगात इतका भिनतोय .....
मरन्यास तो आतुरलेला
मृत्यु शीवन्यास जातोय ....
भंगले शरीर आता
मी पोरका झाहालोय ...
या देवाकडे ही विचारन्या
त्वरा कराया लावतोय .....
माखलो मी सर्वानगातुन
जीवही परलोकी पोहचतोय .....
आता हा पसारा हवा हवा सा आहे
अंत ही जवळच टिपून बसला आहे .!!
मी मागतो मला दया नितांत झोप आता
आयुष्याच्या किनारी मी वाट पाहत बसलोय .!!
चिमनिताई ..!!
आठवण
असा मनाचा लळा लागला रे
जीवनाला सुखाचा तळा लागला रे
व्यथा सांगतो मी कथा सांगतो मी
आर्ततेच्या सुखाने गळा दाटला रे
मला पाहणारी तिची नजर येते
तिच्या पाहण्यात क्षमा वाटली रे
हसण्यात आहे निराळी मजा रे
सुमधुर तुझी वाणी पटली रे
निनादो असा घुंगरू कानी आला रे
तिने कुंकवाचा टीळा लावला रे
असत्यामागे सत्य सामोरे येते
प्रेम रोगाचा नवा शोध नावाजला रे
कवताळले आता स्वर्ग मिठीत आहे
तुझ्या नावानेच जीवन सुखी वाटते रे
जरी तू आहेस परी लांब माझ्या
यादेत तुझ्या मृत्यु गळा कापतो रे
चिमनिताई ....!!
जीवनाला सुखाचा तळा लागला रे
व्यथा सांगतो मी कथा सांगतो मी
आर्ततेच्या सुखाने गळा दाटला रे
मला पाहणारी तिची नजर येते
तिच्या पाहण्यात क्षमा वाटली रे
हसण्यात आहे निराळी मजा रे
सुमधुर तुझी वाणी पटली रे
निनादो असा घुंगरू कानी आला रे
तिने कुंकवाचा टीळा लावला रे
असत्यामागे सत्य सामोरे येते
प्रेम रोगाचा नवा शोध नावाजला रे
कवताळले आता स्वर्ग मिठीत आहे
तुझ्या नावानेच जीवन सुखी वाटते रे
जरी तू आहेस परी लांब माझ्या
यादेत तुझ्या मृत्यु गळा कापतो रे
चिमनिताई ....!!
नसतानाही ...!!
............प्रेम करत होतो
अस्तित्वाची जानीव् नसतानाही .....!!
मी नकळतच झुरत
................जात होतो
तू माझ्याकडे पाहिलं नसतानाही ......!!
विशाल सागरात एकटाच
...................पोहत जात होतो
तू तिथेही सोबत नसतानाही ......!!
आता भास् होता आहेत
ही मयफिल कधी सजली नसतानाही .....!!
जख्मा वेदानानी भरता आहेत
या डोळ्यात कधी अश्रु नसतानाही ......!!
माझ्या नभाखाली मीच बसतोय
कधीही शीत छाया नसतानाही ......!!
तू माझ्या जीवनात कधी येणार आहेस
मला जगण्याची आवड नसतानाही .....!!
मी तुला असाच सतवत आहे
तू नश्वर जगात जिवंत नसतानाही .....!!
चिमनिताई ....!!
Subscribe to:
Posts (Atom)
