Sunday, September 14, 2008

आठवण

असा मनाचा लळा लागला रे
जीवनाला सुखाचा तळा लागला रे

व्यथा सांगतो मी कथा सांगतो मी
आर्ततेच्या सुखाने गळा दाटला रे

मला पाहणारी तिची नजर येते
तिच्या पाहण्यात क्षमा वाटली रे

हसण्यात आहे निराळी मजा रे
सुमधुर तुझी वाणी पटली रे

निनादो असा घुंगरू कानी आला रे
तिने कुंकवाचा टीळा लावला रे

असत्यामागे सत्य सामोरे येते
प्रेम रोगाचा नवा शोध नावाजला रे

कवताळले आता स्वर्ग मिठीत आहे
तुझ्या नावानेच जीवन सुखी वाटते रे

जरी तू आहेस परी लांब माझ्या
यादेत तुझ्या मृत्यु गळा कापतो रे

चिमनिताई ....!!

No comments: