मग का जागतो आहे मी
लयलुट झालीच नाही
मग का झाकतो आहे मी
सूर्यच आला नाही
मग का तपतो आहे मी
मरनच आले नाही
मग का जगतो आहे मी
तू भेटलीच नाही
मग का शोधतो आहे मी
प्रेमच उरले नाही
मग का रागवतो आहे मी
उरलाच नाही किनारा
मग का वाहतो आहे मी
डुबलोच नाही आता
मग का पोहतो आहे मी
सापडे ना मग अश्व
मग का पळतो आहे मी
शरिरच नाही उरले
मग का जळतो आहे मी
चिमनिताई

No comments:
Post a Comment