Sunday, September 14, 2008

माझा लढा

मी चाललो पार नवका घेवून
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय .....!!

डाव मांडलाय पत्त्यानचा इथ
रम्मी कोनालाबी खेळता येत नाय
पत्ते पिसुन थकलेत समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

बाग़ उगवली स्वप्नांची इथ
झाडे कोनालाबी लावता येत नाय
झाडे तोडून थकले समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

गाण्याचा बाजार भरलाय इथ
ओरडायला कोनलाबी येत नाय
शिटी वाजवून थकले समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

राजाची सभा भरलीय इथ
वजिराचा तर पत्ताच नाय
अन्यायाला घाबरून थकले समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

ढगांचा पावूस भरलाय इथ
विजांचा तर कळ्कळाटच नाय
पावसाची वाट पाहून थकले समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

जगबुडी म्हणतात होणार इथ
धरतीला कम्पन सुटणार नाय
मी चाललो पार नवका घेवून
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

चिमनिताई ...!!

No comments: