Sunday, September 14, 2008

प्रतीक्षा.....!!


मी वेदनेच्या हाकेन
व्याकुळ झालो होतो

तू येशील सावलीत माझ्या
मी बकुल झालो होतो ....!!

नाही गवसला किनारा
मी वाहतच जात होतो

तू भेटशील या आशेने
मी पाहताच जात होतो ....!!

लय दूर तो किनारा
संपत नाही आता

आठवण येते आहे
दुखः झाले नाथा ...!!

तो गोडवा तुझा रे
आता मी गाईला होतो

क्षण क्षण तुझ्या प्रेमाचा
आता मी पाहिला होता ....!!

अशा शांततेत आता
मन बहरून येते

तू येशील या आशेने
नयन गह्यरून येते ......!!

चिमनिताई

No comments: