Sunday, September 14, 2008

मरीमाय खायजो तुले ....!!


मरीमाय खायजो तुले ....!!



अहिरानिचं भुत डोक्यावर होतं
हातात मराठीची लेखनी ....!!

दुकानाचा ताबा वडिल पाहत होते
आणि मी नोकराची चाखनी ....!!

उत्तम कवि होणार हेच स्वप्न होतं
सकाळ रात्री तेच पडत होतं ....!!

आज काय झालं उद्या काय होइल
हेच कवितेतच घडत होतं ....!!

कवितेच्या नादात कामाला दुर्लक्ष केलं
गिर्ह्यायिकान्चं मन आता सर्वत्र पसरलं ....!!

आता काय करावं म्हणुन टाइम टेबल केला
कामं सोडून कविताच येते बाकी सर्व इसरलं....!!

आता काय करू महीना झाला खोटा
नाही दीसत आता भरपूर हिरव्या नोटा....!!

आजच मी आईला म्हनलो हे असं असं झालं.... माझ्या मुळे
एकच आवाज आला ,मरिमाय खायजो तुले ,मरी माय खायजो तुले ....!!

चिमनिताई ....!!

No comments: