Sunday, September 14, 2008

ही कवीता

कतिही प्रयत्न केले तरीही येते ही कवीता
कल्पने कल्पने ने वाट दाखवी ही कविता

काय सुचावे काय रुचावे तर ती ही कविता
भान हरवावे की हरवून जावे ती ही कविता

शब्दांची साखळी बनवते ती ही कविता
स्वताहुन गुम्फते तर ती ही कविता

मनाचा खेळ सारा मनाला दाखवते ती ही कविता
कवीला आपल्याच बंधात बांधते ती ही कविता

ज्या मनाला वाळवि लागते तिथे उमलते ही कविता
मना मनाचा संवाद घडवते ती आपलीच कविता

चिमनिताई ....!!

No comments: