Sunday, August 31, 2008

देवाला कुठे शोधतोस रे ...!!

राम नाम चा गजर करा रे
कशाला हुशारी मिरवतोस रे ..
कच्या मातीचा मनाचा बंगला
क्षणात विर्घळुन जाई रे ....!!

ब्राम्हण आहेस ,स्नान करतोस
पुरानाही तू वाचतोस रे..
सर्व काल तत्पर असून
देवाला कुठे कुठे शोधतोस रे ...!!

जोगी होवून जटा वाढवतो
सर्व काळ आनंदी असतोस रे..
डोक्या वर्ती हाथ धरून
देवाला कुठे शोधतोस रे ...!!

मानभावाच पगडा घेवून
काळे वेश धारण करतोस रे..
दाढ़ी मिशा ,वाकडी काठी मिरवतोस
देवाला कुठे कुठे शोधतोस रे ...!!

मुसल मान असून बाक देतो
हा देव काय बहिरा आहें रे..
मुंगीच्या पायात घुंगरू वाजतात
हेही देव एकतो रे .....!! देवाला कुठे कुठे शोधतोस रे ...!!

जंगम असून लिंग घेवून
घरा घरा तुन फिरतोस रे..
शंख वाजवून भिक्षा मागतोस
देवाला कुठे कुठे शोधतोस रे ...!!

एकरे मानवा ,मी नाही साधू
मनात जपाची कीर्ति करतोस तर..
अंतकरनातुन तोही प्रकटतो ..
त्याचीच भक्ति करतोस तर ..

देवाला तू आणि देव तूला पाविल रे ..........

No comments: