Sunday, August 31, 2008

मी असा कसा विरंगुळा~~~!!


मी असा कसा विरंगुळा
मला नाही माझा ठाव ठिकाणा ..!!

कोणी सांगेल का मला
कलूद्या माझा ठाव ठिकाणा ..!!

गूढया न गूढया घड्या घालतो
माझ्यावर नाही कोणाची छाया ..!!

आंथरुन् पाहून पाय पसरतो
माझ्यावर नाही कुणाची माया ..!!

भूंगा होऊनि मी जातो आहे
कमळामध्ये भूक विझविण्या ..!!

कुणी पाहु नका मला डोळे मिटुनी
मांजर होऊनि दूध पिण्या ..!!

अंधारात प्रकाश शोधतो
गूढ उकलतो ,प्रकाशाविनामी ..!!

मोजकेज बोलणे माझे सांगतो
लिहतो खोडतो ,लेखणिविनमी ..!!

अंतराळात कधी हरवतो
कधी सूर्य कधी चंद्र बनूणी ..!!

प्रेमा खातीर धडपडतो आहे
कधी बाण तर कधी तीर् बनूणी ..!!

मन हे माझे सांगत असते
शूर वीर मी या धारतीतला ....!!

कधी भाग्यातुन कधी लेखणीतून
घडवित असतो मी स्वतःला ..!!

No comments: