Saturday, August 23, 2008

कोणासाठी ....!!

कुना न सांगू मत माझे
हे तुझ्याच साठी
कुना न भावे मीच माझा
मी तुझ्याच साठी ...!!

लोका न पावे गर्द तयाचा
हा कोना साठी
क्षमेत चालतो भुरळ पाडन्या
कोट्यान कोटि कुणासाठी ...!!

पहिला जिव या सॄष्टिचा पाहिला
न मी कोणासाठी
तुलाच पाहीले देवा आता
हे सर्वे काही कोणासाठी ....!!

जीवन जगण्या अन्नपाणी
जगणे ही कोणासाठी
वारा न वाही झोक्याचा
प्राण वायु कोणासाठी ...!!

मत्स्य तरंगी जलधारा ती
श्वास घेतसे कोणासाठी
अमृत्वाचा लेनी तिची
श्वास सोडतासे कोणासाठी ....!!

श्वापद निर्मित मांस हारी
अमिर्भाव हां कोणासाठी
जिवंत राहने धेय्य ऐकले
जगणे मरने कोणासाठी ...!!

पापाची ही दुनिया सारी
पुण्य घेतले कोणासाठी
नरकाचे आसन मीच होइन
नर्क असावा कोणासाठी ...!!

जीवन जगण्या आत्मा समर्थ
देव पाहि कोणासाठी .......
जीवनाचे या कल्याण करण्या
सदगुरु आलाय तुम्हासाठी ....!!

chmnitai....!!

No comments: