Sunday, August 31, 2008

................


स्वप्न माझे मीच लिहतो मला आता काही नको
येता जाता हात वारे ,पाहुणचार तर मुळिच नको !!

अति विषयता भर भर येते ,जिवाजिवाची हानि होते ,
चला तर आता ध्यास धरुया, एकोप्याने बळ ही येते...!!

मुक्त होवुया फिरन्या साठी झटपट , झटपट मार्गी लागरे ,
क्षणात आवरा सारी कामे , या देवाची आम्ही लेकरे ....!!

स्मरण करा रे या अविनाशीचे,मनन करा रे या देवाचे
भाग्य उजळेल तुम्हा सर्वांचे , सतकार्य होइल या देहाचे....!!

दर्शन घेता या देवाचे ,कळेल सारी माया होती
दीसणार ते नासणार होते , सदगुरुला शरण जाती..!!

No comments: