विचार च करत राहिलो
जानेवारी कधी संपला
तेच पाहत राहिलो .....!!
महिन्याच्या शेवटी पाहिलं
जीव वेडाकासा झाला
काहीतरी म्हणेन म्हणुन राहिलं ...!!
फेब्रुवारी ,मार्च असाच गेला
ओळ्ख व्हावी म्हणुन
मी मित्राला नेला ..!!
एप्रिलला माझी चांगलीच ओळ्ख झाली
कधी भांडन कधी तंटा
गोष्ट मोठी होत गेली .....!!
में महिन्यात ती ज़रा जवळ आली
जून आला आणि गेला
जुलै पावसात भिजुन नेला ...!!
ऑगस्ट महिन्यात तिला फिरायला घेवून गेलो
सेप्टेंबरला तिनं मला नेलं
एकाच नारळाचं नळि घालून पाणी पिलं ....!!
ऑक्टोंबर मध्ये ती हवीहवीशी वाटली
नोव्हेंबर मध्ये एकदम नाहीशी झाली
मग डिसेम्बर ला घरीच भेटली ....!!
म्हणते कशी वरीस निघून गेलं
तूण काय भी नाय दावलं
म्हणुन आता मीच दस~याला हेरलं ...!!
Sunday, August 31, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment