Tuesday, August 26, 2008

कवी कल्पना...!!

कॉलेज ला होतो १/५/२००३ ला तेव्हा कॉलेज मध्ये एक मुलगी होती
"कल्पना " तिच्या साठी लिहली होती ....

निसर्गाच्या सानिध्यात
निसर्ग आपला सोबती
मी तिचा होतो
आणि ती माझी होती

जिथे जिथे जात होतो
तिथे तिथे येत होती
कधी पुढे येत होती
कधी मागे राहत होती

मी करायच्या आधी
तीच करून टाकत होती
बोलत नव्हती ,हसत नव्हती
फक्त माझ्या बरोबर येत होती

मी तर तिचा होतो
आणि ती माझी होती
तों तर मी होतो आणि
ती माझी कवी कल्पना होती

chimnitai......!!

No comments: