आज मी लग्न करायचं ठरवलं
आणि करणारच हेही पक्क केलय...!!
माझ्या लाडक्या शब्दांशी
खुप मदत करतात ते मला ...!!
नेहमी सोबत च असतात माझ्या
नाही बोललो तरीही उगाजच ...!!
कधी मी आनंदात असतो
ते मोती बनुन बाहर येतात
मग कधी दुखात असतो
खरे खुरे अश्रु बनुन जिव ओवाळुन टाकतात
मग मला त्यांच्याशीच प्रेम झाले
त्याला मी काय करणार ....!!
आवडायला लागली आहे मला ती
शब्दांसह ,शब्दांची माळा ....!!
कुणी माझा प्रेम भंग करू नका
मी कवताळलय आता तिला ....!!
फक्त मला तुमचा होकार हवा आहे
आमच्या जोडीला तुमचा आशीर्वाद हवा आहे ...!!
दयाल ना .... आशीर्वाद....!!
चिमनिताई ...!!
Sunday, September 14, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment