Sunday, September 14, 2008

मी प्राण देत आहे .....!!


बेखबर नजरांचे
वार होत आहे
मी असाच वेळोवेळी
प्राण देत आहे ....!!

नभेदले जरी हे वार
आरपार होत आहे
सवेदना मनाला
मी घाव घालत आहे ....!!

प्राणा पलिकडे शरीरही
उगाच साथ देत आहे
मी तडकलो तरीही
मुद्दाम शोषित आहे ....!!

आता न कोणी मला
नाही थांबवत आहे
जातो विलीन होण्या
जीवन उगाच लांबवत आहे ...!!

दोस्ता तुम्हावारी विश्वास
अजुन ठाम आहे
प्रेमाने केला कहर हा
मी प्राण देत आहे ....!!

मी प्राण देत आहे .....!!

चिमनिताई ....!!

No comments: