Sunday, September 14, 2008

माझी करनी (काम )मला आवडतं ते असं


मी असाच बोलतो
काय करणार ?
मी असाच राहतो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

मी असाच मस्ती करतो
काय करणार ?
मी असा गप्प पण बसतो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

मी राज्याची स्वप्न पण बघतो
काय करणार ?
कधी भिका~याचं सोंग ही घेतो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

आता रमतय मन मंदिरात
काय करणार ?
देवा कड़े पाट करू की पोट करू
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

मला आवडते ज्ञानेश्वरी
काय करणार?
दासबोध ही हवाहवा सा वाटतो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

शोधतो कधी कधी दगडात देव
काय करणार ?
निराकाराच्या शोधात धड़पद्तो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

मग विश्वाचीय ठाई मी होय खोटा खोटा
काय करणार ?
देव पाहि तेव्हा आन्नद होई मोठा मोठा
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

सकळ विश्वची माझे घर
काय करणार ?
त्यास नाही आकार उकार
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

गुरु सोडवी अमाप बंधन
काय करणार ?
मी त्याचा वेड़ा एक बाळ
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

चिमनिताई ....!!

No comments: