Tuesday, October 7, 2008

शान्ति भिनली ..आज ..!!


बाहुल्या या डोळ्यांच्या बाहुल्या
ज़रा खिन्न खिन्न आहेत आज ..!!

जरी मिटता ही पापणी क्षम्य
एक घटका विझला हा भास् आज ...!!

क्षण हा पुर्तिचा आला नसला जरी
घटा घटात वास्तव्य करतो आज ...!!

रुण ह्या जन्माचे फेडिले म्हणुन तरी
दिसला हा परभ्र्म्ह वास्तव्यात आज ...!!

पावन झालो असेही नाही या शरीरात
या आत्म्याचा अंत दुरनिकट आहे आज ...!!

तरीही मी सुखी या अर्थी तहानलेलो
शान्ति शान्ति शान्ति भिनली भिनली आज ...!!

बाहुल्या या डोळ्यांच्या बाहुल्या
ज़रा खिन्न खिन्न आहेत आज ...!!

चिमनिताई ~~!!

एकच वेळ ...!!


एकच वेळ ...!!

मी तर केवळ दयेचा सागर
लोटा भर-भर वाहून घे ..
मी तर केवळ मायेचा सागर
एक डुबकी तरी मारून घे ...!!

मी तर केवळ प्रकाश ज्ञानाचा
एकच अंधकार लावून घे
मी तर केवळ क्षणाचा भुंगर
एकदा तरी पाहून घे ..!!

मी तर केवळ प्रभूचा दास
एकच वेळ एइकून घे ..
तू तर आहे दासाचा दास
एकच वेळ ओळखुन घे ..!!

मी तर आहे भविष्याचा मार्ग
एकच वेळा चालून घे ..
मी तर आहे भूतांचा भुत
एकच वेळ जानूं घे ...!!

मी तर आहे पाण्याचा झोत
एकच वेळ पिवून घे
मी तर आहे जीवनाचा मौत
एकच वेळ जगुन घे ..!!

मी तर आहे परमात्म्याशी समरूप
एकच वेळ उपकारून घे ..
मी तर आहे जादूचा चिराग
एकच वेळ फुकमारून घे ...!!

चिमनिताई ~~!!

(शत्रुस ललकारी )

मी फुंकले रणशींग आज
तू घे माघार शत्रु
मी मोडिस काढली माझी प्रथा
तू घे जाणून आज शत्रु ....

शिवा - जिवाचा माझा बाणा
तू तलवार थिरकलास शत्रु
या काळ्या मातीचा मी लाल
तू शून्य गतीला मिसळ शत्रु ..!!

वैकुठाची भूमि आमची ही माय मराठी
तू तळहाताचा मैल शत्रु
ज्ञान मुर्तीची लेखी आमची जात
तू भयभीत आमचाच शत्रु ....!!

वाचा आमची नीट सुनले राजा
तू तर आहें बहिरा शत्रु
नयनांनी तर वार करतोरे तीर
तू तर वास्तु गंध शत्रु ...!!

या देशाला मानाचा मुजरा ठोकतो सलामी
तू गुंड तयाचा शत्रु
निधड्या छातीचा मी शुर योद्धा
तुजला रणशींग फ़ुंकतो शत्रु ..!!

चिमनिताई ~~!!

"अमृतानुभव"


मज नको थोरवा पुर्तिचा
मज नको थोरवा कीर्तीचा
मी तान्हा बाळ काचेचा
मज नको बनवू मुर्तिचा ...!!

राम रामा तुझाच ध्यास
मनामधि माझ्या तुझाच वास
तू कीर्ति-पुर्तिच्या मधास
तुझ्यासाठी अखेरचा एक श्वास ...!!

दया जागवी चैतन्यक्शम्य
प्रत्येक्ष पुर्न्ब्र्ह्म्हा तू ज्ञानराजा
तुझाच भास आहे सर्व जागा
तू निरंतरा तू अधिराजा ...!!

स्वहित ज्ञाना यावे पंढरिसि
एक वेळ पाहावे पांडुरंगासि
तोहा जीवन सफल व्हावा नामकाळि
चित्तावे ,भजावे नाम नित्य हरिसि ...!!

सांगती वेदान्त मिळे जे तत्व
तन्तोतान्ति भाव अनंत काळ
"अमृतानुभव" मिळे ज्यासी नित्य काळ
तोचि विद्वान सर्वांस एकवेळ ...!!

चिमनिताई ~~!!

येत नाही....!!


मला कविता करता येत नाही
नरर्थक रेघोटया मात्र मारतो

सारं कसं काळजाला भिड़त नाही
मग हसत रडत व्यक्त करतो

मला चित्र काढता येत नाही
उभे आडवे भोपळे मात्र छापतो

सारं कसं डोळ्याना पाहावत नाही
मग गपचुप बिनदेखत कापतो

मला प्रेम करता येत नाही
तिला येताजाता घिरट्या मात्र मारतो

सारं काही समोरच घडत नाही
म्हणुन नव्या नव्या युक्त्या शोधतो

म्हणतात प्रेमाला सीमा नाही
मग माझ्या घरापासून तिच्या घरापर्यंत येतोजातो

चिमनिताई ~~!!

मला झोप येत नाही मी काय करू ?


मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला राम झोप येवू देत नाही
रामायण लिहवितो .....!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला कृष्णा झोप येवू देत नाही
महाभारत लिहावितो .....!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला ज्ञानेश्वर झोप येवू देत नाही
ज्ञानेश्वरी लिहवितो ......!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला तुकाराम झोप येवू देत नाही
तुकाराम गाथा लिहवितो .....!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला रामदास झोप येवू देत माही
दासबोध लिहवितो ....!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला नामदेव झोप येवू देत नाही
नामदेव गाथा लिहवितो .....!!

मला झोप येत नाही
मी काय करू ?

चिमनिताई ~~!!

पाहून घे .....


आज माझा नवा दिवस
उगवण्याचा ,

काल झाले ते गेले ,संपले
नाशिवंत ,

मृत्युला कवटाळत शेवटचे
भंगले ,

पानाना फुटल्या पालव्या ,आजच
उपभोगलेले ,

माझे नवे रूप आहे पुर्विचेच
निराकार ,

उघड्या डोळ्यांनी पाहा
स्वत्छ ,

काविळिने व्यापलेली दृष्टी
चांदण्याला पिवळे ,

उगा का होईना ,पण बघ
एकदाच ,

जर इत्छा असेल तर
अन्तिम ,

मी निरभ्र ,मोकळा ,सर्वत्र
सामावलेला ...


अरे वेड्या पाहून घे ...पाहून घे

चिमनिताई ~~!!