Tuesday, October 7, 2008

पाहून घे .....


आज माझा नवा दिवस
उगवण्याचा ,

काल झाले ते गेले ,संपले
नाशिवंत ,

मृत्युला कवटाळत शेवटचे
भंगले ,

पानाना फुटल्या पालव्या ,आजच
उपभोगलेले ,

माझे नवे रूप आहे पुर्विचेच
निराकार ,

उघड्या डोळ्यांनी पाहा
स्वत्छ ,

काविळिने व्यापलेली दृष्टी
चांदण्याला पिवळे ,

उगा का होईना ,पण बघ
एकदाच ,

जर इत्छा असेल तर
अन्तिम ,

मी निरभ्र ,मोकळा ,सर्वत्र
सामावलेला ...


अरे वेड्या पाहून घे ...पाहून घे

चिमनिताई ~~!!

No comments: