Tuesday, October 7, 2008

आयुष्याच्या वाटेवर ...!!


आयुष्याच्या वाटेवर ...!!

रास्ता चुकलो आता
घरी जायचे आहे
जिवाला मुकलो आता
वरी जायचे आहे ..!!

माणूस आहे मी
मानसा सारखे वागतो
वेळ आली तर
जनावरा सारखे जगतो ...!!

कुणी नाही येथे
आधार द्यायला येत
जो असेल तोही नेतात
त्याला माणूस म्हानतायेत...!!

विचार करा ज़रा
काय करता आहात
चोरी होते डोळ्यासमोर
तरीही पाहता आहात ...!!

माणूस माणूस म्हणुन
जनावरे झालीत समदी
जनावरांना असते अक्कल
तुम्हाला आहे का शर्मिंदी ...!!

एकच वाक्य आता
ध्यानात आहे ठेवतो
आयुष्याच्या वाटेवर कुणी
कुणाचा असुनही नसतो ....!!

चिमनिताई ~~!!

No comments: