Tuesday, October 7, 2008

मी तुझी असतानाही ....!!

मी अशीच तुझ्या मोहात पडली
तू माझा नसतानाही ....!!

मी अशीच तुला सावरू लागली
तू माझा नसतानाही ....!!

तुझ्या काटेरी रस्त्याला मी पायदान दिले
तू माझ्या नसतानाही .....!!

मी तुझ्या भावनाना कधीही ठेच पोहचवली नाही
तू माझा नसतानाही ....!!

तापना~या सूर्यापासून तुझी सावली झाली मी
तू माझा नसतानाही ....!!

माझ्या मनातले गुपित तुलाच सांगितले मी
तू माझा नसतानाही ...!!

मी पुष्कल प्रेम केलं तुझ्यावर
तू माझा नसतानाही....!!

तरीही तू मला समजू शकला नाही
मी तुझी असतानाही ....!!

चिमनिताई ~~!!

1 comment:

Unknown said...

hi. .
tuze blog sahi astat yaar..

nice poem. . .
it really touchy
thnks

Kiran