Tuesday, October 7, 2008

मी खेळ मांडला शब्दांचा ...!!


मी खेळ मांडला शब्दांचा ....!!

ही मांडनि झाली वरखाली
सापडे न कोणी रक्ताचा
पहा पहा डोळे उघडुन
मी खेळ मांडला शब्दांचा ...!!

शब्दच मला सांगतात
कोणी न येथे वरणाचा
भाव भक्ति ही आपल्यासाठीच
मी खेळ मांडला शब्दांचा ....!!

प्रेमा खातिर जान ही देऊ
जिव असेल जर ख~याचा
जिवाभावाचा कोणीही सापडो
मी खेळ मांडला शब्दांचा ....!!

भान असुद्या अंतरंगाचे
हा विश्वची त्याला व्यापायचा
तू लघु ,तो आभासी विशाल
मी खेळ मांडला शब्दांचा ...!!

गुरु विना हा संत अधूरा
संतची मांडी डाव देवाचा
तो दाखवतो ब्रह्मा दोन डोळ्यांनी
मी खेळ मांडला शब्दांचा ...!!

चिमनिताई ~~!!

No comments: