मला छंद वेग़ळा नको
मला गंध वेग़ळा नको
या माती मध्ये उगवून
मला व्यंग वेग़ळा नको...!!
मला ध्यास वेग़ळा नको
मला व्यास वेग़ळा नको
या सावली मध्ये अंतरून
मला श्वास वेग़ळा नको .....!!
मला राम वेग़ळानको
मला श्याम वेग़ळा नको
या निराकाराच्या मध्ये तापलेला
मला नाम वेग़ळा नको ...!!
मला आत्मा वेग़ळा नको
मला परमात्मा वेग़ळा नको
या शरीरा मध्ये बसलेला
मला अमरआत्मा वेग़ळा नको ...!!
मला सत्व वेग़ळा नको
मला तत्व वेग़ळा नको
या ज्ञाना मध्ये धुतलेले
मला नेमत्व वेग़ळा नको ...!!
मला गुरु वेग़ळा नको
मला सदगुरु वेग़ळा नको
ब्रम्हज्ञानाविना नसलेला
मला ज्ञानगुरु वेग़ळा नको ...!!
चिमनिताई ~~!!

No comments:
Post a Comment