Tuesday, October 7, 2008

तू कवटाळ मला ....!!


तू कवटाळ मला ....!!

मी फिरवली नजर
चहुकडे सम ..!!

घेतला ब्योरा दूर दूर
भिडेल तोवर ..!!

ज्ञान कक्ष्य उघडले
भार देवून ..!!

नकळे तरीही हे गूढ़
भोवताली असुनही ..!!

कारण............!!

मी अज्ञान- मी बालकं
मी ना थोर कुणी .....!!

मी कुरुविचारी -विस्मय वादी
मी ना अघोर कुणी ....!!

जो वास करी चहुकडे
असा हा अदृश्य ....!!

जो समय चक्र चालवी
असा हा अभेद्य ....!!

जो भासालाही आवाज करी
असा हा चेतनामयी ...!!

तोच हा ज्ञानदाता
जो भ्रम्हांड निर्माण करी ...!!

मी क्षरण तुला रे निराकार
तू करशी मज तुसारखा

तू अनंता ,तू अविनाशी
मी तुझा लेकरु ,तू कवटाळ मला ....!!
....................तू कवटाळ मला ....!!

चिमनिताई ~~!!

No comments: