Tuesday, October 7, 2008

कारन मी आता देवाकडेच राहणार आहे ....!!


कारन मी आता देवाकडेच राहणार आहे ....!!

मी नेहमी लहानच राहणार आहे
ज़रा ही काही होईना उगाच रुस्नार आहे
मला खुप लाम्ब जायचे आहे
कारण मी आता देवाकडेच राहणार आहे .....!!

मित्र माझे खुप आहे
पण विचारणारे कुणी नाही
एकट्याची वाट मला एकट्याला चालायची आहे
कारण मी आता देवाकडेच राहणार आहे ...!!

भावासारखा भाऊ आहे
आई-वडिल प्रेमाळु आहे
माया त्यांची कधी अपुरी पडणार नाही पण माझी अट आहे
कारण मला देवाकडेच राहायचे आहे .....!!

मी रोजच तुम्हाला सांगत आहे
दुःख तुमचे भरपूर आहे
सर्वांचे दुःख मलाद्या ही इच्छा आहे
कारण मी आता देवाकडेच राहणार आहे ......!!

जो पर्यंत या नश्वर जगात आहे
प्रेमाचे बिज लावायचेच आहे
कधिकधिना कधी मोठे होइल हे झाड़ आता तुम्हाला त्याला वाढवायचे आहे
कारण मी आता देवाकडेच राहणार आहे .......!!


कारण मी आता देवाकडेच राहणार आहे .......!!

चिमनिताई

No comments: