Tuesday, October 7, 2008

एकच वेळ ...!!


एकच वेळ ...!!

मी तर केवळ दयेचा सागर
लोटा भर-भर वाहून घे ..
मी तर केवळ मायेचा सागर
एक डुबकी तरी मारून घे ...!!

मी तर केवळ प्रकाश ज्ञानाचा
एकच अंधकार लावून घे
मी तर केवळ क्षणाचा भुंगर
एकदा तरी पाहून घे ..!!

मी तर केवळ प्रभूचा दास
एकच वेळ एइकून घे ..
तू तर आहे दासाचा दास
एकच वेळ ओळखुन घे ..!!

मी तर आहे भविष्याचा मार्ग
एकच वेळा चालून घे ..
मी तर आहे भूतांचा भुत
एकच वेळ जानूं घे ...!!

मी तर आहे पाण्याचा झोत
एकच वेळ पिवून घे
मी तर आहे जीवनाचा मौत
एकच वेळ जगुन घे ..!!

मी तर आहे परमात्म्याशी समरूप
एकच वेळ उपकारून घे ..
मी तर आहे जादूचा चिराग
एकच वेळ फुकमारून घे ...!!

चिमनिताई ~~!!

1 comment:

Unknown said...

ultimate yaar..

speacially the last stanza..

ek vel fuk marun ghe.. .

keep it up..