Tuesday, October 7, 2008

कविता आणि जेवण


कविता आणि जेवण

येडयाचा कांदा ,कांद्याची वांगी
वांग्याच्या मिरच्या .आणि हे भरित ....!!

कसं जमतं हो तुम्हाला
हे वांग्याचं भरित ?

शेवग्याच्या शेंगा ,वाटपाचं सारण
लावलाय गैस ,आणि ही आमटी ...!!

कसं जमतं हो तुम्हाला
ही शेवग्याची आमटी ?

ज्वारिचं पीठ ,तापलेला तवा
थोडसं मीठ.आणि ही भाकरी ....!!

कसं काय जमते हो
ही ज्वारीची भाकरी ?

भिजवलेले तांदुळ ,शिटी वाला कुकर
घद्याळाचि २० मिनटे आणि हा भात ...!!

कसं काय जमते हो
ही तान्दळाचा भात ?

मग झालं जेवण आज तैयार सर्वाना मेजवानी
कधी कुठे झाले मीठ जास्त आणि कमी पानी

तरीही सहजच कधीतरी बनवतो जेवण
आवडले तर या मेजवानीला खा माझे कालवन

कवितांचे ही असेच आहे ,कधी जास्त गोड होते
कधी थोडी खारत .कधी येते डोळ्यात पानी आणि जीवन होते असेच सुरु...!!

चिमनिताई ~~!!

No comments: