Tuesday, October 7, 2008

आता सुटला रे भार ...!!


भार भाराचा आधार
धार धारेला वधार
किती वेणु मी नशीब
आता सुटला रे भार ...!!

मन मनाची वखार
त्याले लागस वारं
जिव कोंबडिना पिंजरा
आता सुटला रे भार ...!!

देव देवा तुनि मार
उड़स आकाश हाई सारं
पानी पेवाले घागर
आता सुटला रे भार ...!!

कोम्भ कोम्भिला मझार
येई त्यालेच जव्हार
हाई खावाले वावरं
आता सुटला रे भार ...!!

माचा माचा वरी पातीचार
त्याले उना आते आकार
झोप उनी शेवटनि
आता सुटला रे भार ....!!

चिमनिताई ~~!!

No comments: