नरर्थक रेघोटया मात्र मारतो
सारं कसं काळजाला भिड़त नाही
मग हसत रडत व्यक्त करतो
मला चित्र काढता येत नाही
उभे आडवे भोपळे मात्र छापतो
सारं कसं डोळ्याना पाहावत नाही
मग गपचुप बिनदेखत कापतो
मला प्रेम करता येत नाही
तिला येताजाता घिरट्या मात्र मारतो
सारं काही समोरच घडत नाही
म्हणुन नव्या नव्या युक्त्या शोधतो
म्हणतात प्रेमाला सीमा नाही
मग माझ्या घरापासून तिच्या घरापर्यंत येतोजातो
चिमनिताई ~~!!

No comments:
Post a Comment