Tuesday, October 7, 2008

खंत मनाची ....!!


खंत मनाची ....!!

अश्या घननिळ सागरात ,हे दूर दूर किनारे
मल्हाव करीत लाटा ,तू थाम्बलास का रे ...!!

पंढरपुरात आहे ,सदा, नित्य वास त्याचा
कमरेत हाथ दोन्ही ,तो एकला उभा रे .....!!

या उंच पर्वतांचा,नद्या अन सागराचा
वारिस तो एकला ,खबरदार स्तब्द कसा रे ....!!

या मुक्या बाहुल्यांचे कर्तुत्व थोर आहे
नव माणसास कसा हा छंद जोपासलास रे ...!!

भुंग़्य़ाची जात ही न्यारी ,तो कमळ शोधत आहे
वा~यावरी भ्रमर करूनही सूर्यास वेचतो रे ...!!

चिमनिताई ~~!!

No comments: