Sunday, September 14, 2008

या शांततेत आता...


एका अश्या माणसाचे मनोव्रुत्त की जो काही दिवसात मारणार आहे

मी काही वेळ होतो सहवासात माझ्या शब्दात एक दुखः आणि पुढचा प्रवास नंतर कारण
तों जेवढा दुख्हात होता तितकाच आनंदित ही पण हा प्रवास दुख्हाचा ....

या शांततेत आता
मी हरवनार आहे...!!

मोजकेच दिवस माझे
मी जगणार आहे...!!

कळुद्या मला जीवन
जे पावले आहे...!!

काळाचा घोळ सारा
मी मरणार आहे...!!

यमाचा दूत मला
आज सांगुन गेला...!!

तुझे प्राण पाहिजे
दान मागुन गेला...!!

नवे शरीर मिळेल
नवे नाम देवून गेला...!!

पुरे झाले आता
मी बदनाम आहे...!!

या शांततेत आता
मी हरवनार आहे...!!

चिमनिताई ......!!

वाईट माणूस ...


अजूनही हा पाठलाग
असाच चालु आहे

काही न उरले आज
जे मी समजणार आहे

ओंजाळ रिकामी तरीही
हा गळा तृप्त आहे

काट्यांचा ही सुहास हा
या फुला सम आहे

स्पर्शा विनाही मात्रा हा
लंगोटी चोर आहे

काय सांगू मी तुम्हाला हा
मल्हाळ पोटी आहे

मानवासम दिसणारा हा
भामटा बेईमान आहे

नको तो खरा घडा हा
मातीच्या स्वाभिमान आहे

असुनही नसल्या सारखा हा
श्वापद भावना हिन् आहे

गरज नसूनही गरजू बनुन हा
उपभोगता बनणार आहे

अश्या वासराला बैल समजुन हा
गुराखी आरी टोचत आहे

माहामारी विनाशाची प्रवृति जात हा
अविस्मरनीय कंबर खोचत आहे

चिमनिताई ....!!

मी प्राण देत आहे .....!!


बेखबर नजरांचे
वार होत आहे
मी असाच वेळोवेळी
प्राण देत आहे ....!!

नभेदले जरी हे वार
आरपार होत आहे
सवेदना मनाला
मी घाव घालत आहे ....!!

प्राणा पलिकडे शरीरही
उगाच साथ देत आहे
मी तडकलो तरीही
मुद्दाम शोषित आहे ....!!

आता न कोणी मला
नाही थांबवत आहे
जातो विलीन होण्या
जीवन उगाच लांबवत आहे ...!!

दोस्ता तुम्हावारी विश्वास
अजुन ठाम आहे
प्रेमाने केला कहर हा
मी प्राण देत आहे ....!!

मी प्राण देत आहे .....!!

चिमनिताई ....!!

असा आहे मी


स्वप्नच आले नाही ना
मग का जागतो आहे मी

लयलुट झालीच नाही
मग का झाकतो आहे मी

सूर्यच आला नाही
मग का तपतो आहे मी

मरनच आले नाही
मग का जगतो आहे मी

तू भेटलीच नाही
मग का शोधतो आहे मी

प्रेमच उरले नाही
मग का रागवतो आहे मी

उरलाच नाही किनारा
मग का वाहतो आहे मी

डुबलोच नाही आता
मग का पोहतो आहे मी

सापडे ना मग अश्व
मग का पळतो आहे मी

शरिरच नाही उरले
मग का जळतो आहे मी

चिमनिताई

प्रतीक्षा.....!!


मी वेदनेच्या हाकेन
व्याकुळ झालो होतो

तू येशील सावलीत माझ्या
मी बकुल झालो होतो ....!!

नाही गवसला किनारा
मी वाहतच जात होतो

तू भेटशील या आशेने
मी पाहताच जात होतो ....!!

लय दूर तो किनारा
संपत नाही आता

आठवण येते आहे
दुखः झाले नाथा ...!!

तो गोडवा तुझा रे
आता मी गाईला होतो

क्षण क्षण तुझ्या प्रेमाचा
आता मी पाहिला होता ....!!

अशा शांततेत आता
मन बहरून येते

तू येशील या आशेने
नयन गह्यरून येते ......!!

चिमनिताई

मी घाव घातला आहे..!!


मी घाव घातला आहे..!!

या नश्वर देहा वरती
मी घाव घातला आहे ..!!

या मनाच्या जळ्न्या वरती
मी घाव घातला आहे ..!!

या अभिमानाच्या पर्वतावर
मी घाव घातला आहे ..!!

या कर्म् कांड कामावरती
मी घाव घातला आहे ..!!

या रूप बदलत्या साखळिवर
मी घाव घातला आहे ..!!

या मनाच्या वादळिवर
मी घाव घातला आहे ..!!

या संसाराच्या मोहावरती
मी घाव घातला आहे ..!!

या अमर्यादी इच्छांवर
मी घाव घातला आहे..!!

या मानवाच्या अस्तित्त्वावर
मी घाव घातला आहे..!!

या युधाच्या शर्नागतिवर
मी घाव घातला आहे..!!

अन प्रेमाच्या या आत्म दहनावर
मी घाव घातला आहे..!!

विजयी होइन या विश्वाचा अमर्तेवर
मी घाव घातला आहे..!!


या मानवाच्या जन्मावरती
मी घाव घातला आहे कारन......

या नश्वर देहा वरती
मी घाव घातला आहे..!!

चिमनिताई ......!!

ही कवीता

कतिही प्रयत्न केले तरीही येते ही कवीता
कल्पने कल्पने ने वाट दाखवी ही कविता

काय सुचावे काय रुचावे तर ती ही कविता
भान हरवावे की हरवून जावे ती ही कविता

शब्दांची साखळी बनवते ती ही कविता
स्वताहुन गुम्फते तर ती ही कविता

मनाचा खेळ सारा मनाला दाखवते ती ही कविता
कवीला आपल्याच बंधात बांधते ती ही कविता

ज्या मनाला वाळवि लागते तिथे उमलते ही कविता
मना मनाचा संवाद घडवते ती आपलीच कविता

चिमनिताई ....!!