Tuesday, July 29, 2008

नवा सूर्य........



सावल्यांच्या चांदनित
एक प्रकाश उजाडला
मोकळ्या फुलांत आता
नवा दीप बहरला.....!!

पुर्वीचा रूप खरा
मुक्याने वाचाळला
आभास हा असाच हा
चहुकडे पसरला .....!!

मानवतेच्या पुरातला
महापुर कोसळला
चंद्राच्या गुनातला
नवा चेहरा आज उजाडला ....!!

नावाच्या घोळातला
पवन सूत अवतरला
प्रेमाचा शोध त्याने
नकळतच लावला ........!!

चिमनी ताई..........!!

Tuesday, July 22, 2008

बदलणार..... आणि नाहिपण



येतात आणि जातात
बदलत राहतात ,
ऐका मागोमाग एक
नशीबच बनुन वागतात.......!!

तीनच ॠतु
आयुष्यात पण येतात
तिन पगड्या घेवून
विरून जातात ......!!

बाल पनापासुन तरुण
वयापर्यंत काहीच कळत नाही ,
तरुण पन गेले की
म्हातार्पनात ही काहीच कळत नाही ,

बालपन म्हणजे
पावसाळा असतो ,
हिवाला ,उन्हाला तरुण
म्हातार वयात येत असतो ....!!

ॠतु बदलतात
आणि आयुष्यही बदलणार
बदलत नाही तों
ह्या स्रुष्टिचा घडवणार......!!

जो ॠतु ही घडवतों
आयुष्यही घडवतों ,
धावतो ,पडतो
आपल्या बरोबर धडपडतो....!!

पुन्हा ह्या जीवन
चक्र्कात आणून सोडतो ,
तोच तों, बघतो ,
हसतो आणि रडवतो ....!!

तरीही कळुन आणि
वळुन न कळाल्या सारखं ,
गुंत्यात गुंता पडल्या वाणी
सुट्ल्या सारखं

तरीही काळाच्या ओघात
सर्व काही वाहून जाते
माणूस विसरला
तरीही जीवन चक्र तसेच रहाते

.....!!.......चिमनिताई .....!!...

वाट पाहते.....

पुन्हा नवे वेड
आणि नवा खेळ
स्वप्नाहून सुन्दर रानी
एक राजा याचा मेळ....!!

स्वप्नातच होती
तेव्हाच उचलून नेले
अजुन शुद्धा नव्हती
म्हणुनच मनही गेले ...!!

पर्क्याच्या हाथी
नाचवतच होता
जसं सांगेल तसं
मीही खात होती गोता ....!!

तरीही राजकुमारच्या
आठवणीत एक एक दिवस
एक एक रात्र
आणि मग रात्र आणि दिवस ...!!

दिवसामागून महीने
तरीही तो नाही वाहत
मी तशीच होती
त्याची आतुरपने वाट पाहत ..!!

नाही येणार का
मला न्यायला आता
तरीही मी वाट पाहीन
शेवटपर्यंत जाता जाता ....!!

तरीही तुझी वाट पाहीन
तुझं गीत गाइन
श्याम आणि संध्या
तुझच ध्यान करीन ...!!

.....!!.......चिमनिताई .....!!...

Saturday, July 19, 2008

आज पहाट जहाली.

आज पहाट पहाट आज पहाट जहाली.
स्वप्न अमृताचे गोड मनी हरवून
...................आज पहाट जहाली.||

स्वप्न म्हणता म्हणता कवा कवडस् हे आलं
पाहताच अंगनी माझ्या मन चांद्न्यांच गेलं
गोड शब्द शहारून आज पहाट जहाली !!

मधुर आवाजाने सकाळ बहरून गेली
सोन चाफ्या कळ्यानि नभ कहरून आली
स्वप्न सुन्दर म्हणताच आज पहाट जहाली !!

हरी नामाच्या गजरान नाद मनोमनी आला
पुश्प्काच्या चंदनानी नवा दिवस वुजाडला
मोहिनिने मोहरून आज पहाट जहाली !!

असाच देवा तू रोज सामोरी येना
यातना विसरून मला तुझ्यात विलीन करना
तुझा भाव मनी राखून आज पहाट जहाली !!

..................चिमनी ताई

Friday, July 18, 2008

राम ही मीच


राम ही मीच

राम ही मीच
सीता ही मीच
तू शोधू पाहते
तों रावण ही मीच

क्षणा क्षनाला
रूप बदलतो
रावनातला
राम ही मीच

मित्रत्वाचा
मित्र मी
सखा सोबती
राम ही मीच

पुष्प कळ्यान्च्ये
पान ही मीच
खोड़ काटे
राम ही मीच

नेत्रुत्वाच
नेत्रा ही मीच
भूया न पापण्या
राम ही मीच

तुझ्या सारखा
समरूप ही मीच
एकरूप नाही असा
राम ही मीच

शाश्वत आत्मा
पर्भ्र्म्हा ही मीच
पन परमेश्वर नाही
राम ही मीच

चिमनी ताई

Thursday, July 17, 2008

पावसाळा

उन्हाळ्यात असतो ,उन्हाचा सळ्सळा
हिवाळ्यात वाटतो ,थंडीचा कळ्कळा
पावसाळ्यात मात्र काही तरी असते
थंडी ,उन ,पाउस सर्वच वसते

पावसाळा आला की गमतच असते
गम्मत के जम्मतच असते
नदी, नाले तुडुम्ब् वाहतात
अनेक आनद सुखाने नाह्तात

झाडे सर्वच अंघोळ करतात
फुला फ़ळानि टवटवीत दिसतात
नविन वस्त्र धारण करतात
जणू कुठेतरी फिरायलाच जातात

चिमनिताई........

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
कोण जाने ,बट्ट त्याना हाथ मा शे !!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
मी करसु तवयच हुइन ,जे मना मनमा उमजी र्हायन !!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
हाई काई माती धनधान्य देस ,गुराढोरासले भी खावाड्स !! पन
माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन !!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
आज वाटन हाई धरतीच मणि माय शे !!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
हाई धरती आपलं पोट भरस,पाणी भी हाइच पाजस !!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
मी राबसू ,काम करसु ,माले मालुम शे !!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
मी अनाड़ी माणूस ,लिखता वाचता गनक्च एस माले !! पन
माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन!!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
जवय मी अहीरानी भाषा मा कविता करसु
तवय्च मन नशीब खुलिन ,ते आज व्हयन्न!!

चिमनी ताई........

Wednesday, July 16, 2008

...............................

आज एकटाच होतो मी
आणि तोच रस्ता होता ,नेहमीचाच

सारखा मागे वळुन पाहत होतो
ती हाक मारेल या आशेने ,आक्रोशाने

आठवत होते तिचे शब्द
मनाला भिड्नारे पूर्ण पणे, शीर्षेद

धक्काच तसा लागला होता
मन ही सावरत नव्हते ,घायाळ

मी तिचाच होतो
केसा पासून नखापर्यंत , अक्खा

चालतच जात होतो
रस्ता संपेपर्यंत ,खुळा

विचार ही करत होतो
पुन्हा होइल का भेट ,वाजवी

डोक्यात प्रकाशाच पेटत नव्हता
तेच विचार पुन्हापुन्हा , भंडावलेले

कारन नुकताच आलो होतो
आग लावून ,चितेला

पुन्हा नाही भेटणार
या आशेनेच गेलो होतो, शेवटचा

निराकार प्रभु


निर्विद्लेल्या हातानी
वंदन करते तुजला
तू महारती निरंतरा
निर्विज निरंतर मजला !!

तू स्वताः परभ्रम्हाः
कृष्णा ,विष्णु नयना तू
नाम तुजे निरंतर
चाले पंढरपुर तू !!

मज आवडे प्रकाश
हा काळोख्या रात्रीचा
विठू माझा चमत्कारी
वेथ वाचे शात्राचा !!

विश्वास माझा सदगुरुवरि
तुला पाहता मी झाले सुखी
रूप तुझे हे निराकार
निशब्द ठेव आले मुखी!!

...................चिमनी ताई...............

Thursday, July 10, 2008

निराकार प्रभु

[teal]निर्विद्लेल्या हातानीवंदन करते तुजलातू महारती निरंतरानिर्विज निरंतर मजला !!तू स्वताः परभ्रम्हाःकृष्णा ,विष्णु नयना तूनाम तुजे निरंतर चाले पंढरपुर तू !!मज आवडे प्रकाशहा काळोख्या रात्रीचाविठू माझा चमत्कारीवेथ वाचे शात्राचा !!विश्वास माझा सदगुरुवरितुला पाहता मी झाले सुखीरूप तुझे हे निराकारनिशब्द ठेव आले मुखी!!
...................चिमनी ताई...............

Saturday, July 5, 2008

चिमणीचे प्रेम........

नाम
घेइन
मुखाने
तू
राहा
सुखाने
वाट
परतीची
पाहणारे
शोधती
तुजला
सारे...!!

तू
कोवळा
सांजवात
मी
पक्षीन
नभात
तू
देहात
हातात
निरंतर
देमजला
साथ...!!

विलक्षण
शक्ति
तू
दिसाचा
सूर्य
तू
रात्रीचा
चन्द्र
तू
प्रेमाचा
गुलकंद
तू...!!

प्रात
कालप्राजक्ता
वेचते
तुजे
रूपनयनी
आठवते
नित्य
तुअसाच
राहा
तुला
ऒजळीत
साठवते ...!!

... चिमणीताई....

स्वप्न.........!!


तुझ्या डोळ्यामध्ये पाहीले मी ,
विश्व माझे स्वप्नातले ..!!
स्वप्नात तूच होतीस ती परी,
भाव तुझे मनातले ....!!

लेवुनी बंध माझा काळ्जाचा
हाथ तूच रोखला ....!!
स्पंद चालु लागला सराईत
प्रेमाचा गंध हा चाखला ...!!

सेरबैर झालो राणी
प्रीत तुझी जेव्हा मिळलि ....!!
रातरानीच फुलली अंगनात
मंत्रमुग्ध मन् खीळलि ....!!

चाहुल होताच शुद्धा हरपलो
पाहुलागलो तुलाच ग.....!!
स्वप्न माझे तुटले हे
कळले नाही मलाच ग ...!!

...

ღ चिमणीताईღ

Thursday, July 3, 2008

कुणी नाही बोलत नाही माझ्याशी.....

कुणी नाही बोलत नाही माझ्याशी......

(2002)मद्ये ..........
मी दहावित होतो आणि काही कारनामुले
घरातून निघून गेलो होतो ,आणि २ दिवसानी जेव्हा
मला घराची आठ्वन आली तेव्हा परत घरी आलो
पन माझ्याशी कोणी बोलत नव्हते ,तेव्हा २० मिन्तात ही कवीता लिहली आणि
सर्वाना वाचून दाखवली ,आणि happy ending......

...................................................................................


कुणी नाही बोलत नाही माझ्याशी
मनाला वाटते खंत,
होइल माझा कदाचित एकदा
या जगातुनी अंत !!

सर्वे रुसले आहेत माझ्याशी
झाली माझ्याकडून अशी चुक ,
जेवण पन कोणी नाही विचारत
मला लागली आहें आता भूक !!

होता एक मित्र अपुला
तोही गेला रुसाया ,
कुणीच नाही आले
माझे अश्रु पुसाया !!

क्षमा मागुनि नाही बोलत
अशी ही सगळी मानस,
क्षमा करा तुम्ही मला
आहें एक स्वप्न छानसं !!

पुन्हा नाही होणार हो
अशी चुक पप्पा ,
आता तरी बोलाना
मारा माझ्याशी गप्पा !!

आई तू तरी बोलगं
मन हलकं कर गं,
माझ्याशी खेळ गं
रडू नको येवू देवू गं !!

दादा तू तरी सांगना
मी काय करू ?
पुन्हा दारी उभा राहू
का असाच मरू !!

बस बस बस

कुणी नाही बोलले माझ्याशी
मनाला वाटली खंत ,
झाला माझा नक्की आता
या जगातुनी अंत !!

चिमणीताई

..........आठवण..........!!

..........आठवण..........!!

आठवल्या त्या रिमझिम धारा
कोमल भेट टी फुलासारखी ,
तुटुन पडली विज़ माझ्यावर
बहरली ति चांदण्या सारखी !!

भर दुपारी आभाळाला
छेदले होते तार्यानी ,
थंडगार तो वारा लागला
वेढले आहें सार्यानी !!

आठवली ती भेट मला
ओल्या ॠतुच्या स्पर्शाने ,
ओला देह शहरला आता
तुझ्या एका छोट्याश्या हरषाने !!

तुझ्या प्रीतिची ओढ़ लागली
मन झाले होते व्याकुळ,
तुझ्या लालिचा गंध वेचता वेचता
मीही झालो होतो बकुल !!

भावनं।नी मनातून माझ्या
ही एक कविता रचली होती ,
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती!!

चिमणीताई

एक सूर्य तो मालवला

एक सूर्य तो मालवला

आकाशात भ्रमण करणारा एक पक्षी ,जेव्हा पिंजर्यात अडकतो ,
स्वताचा जीव त्या पिंझर्यातुं मुक्त करण्या साठी रक्त बम्भाळ अवस्तेत
तो पलायन करतो आणी पारधी कडून मारला जातो आशीच एक
पक्ष्यावर ही रचना केलि आहे...........

...............................................................................
...............................................................................

तीक्ष्ण नजर ,सळपातळ बांधा
चाल बोलकी तोर्याची !!

वाट अवघङ,पूर्ण डोंगर
रूप माझे मोहरती !!

मनात्त माझ्या , नाचती मोर
रूप चांदने तेजवती !!

अड्कला जीव् ,पाह्न्यात ड्रुश्य
झेप् घेतली कारव्याने !!

नाम तयाचे , घेतले मुखी
धुंद बेधुंद पिंजर्यात अडकला परवाने !!

पिंजरा तोडीला ,मुक्या पक्षानी
धाव घेतली घरा कड़े !!

शोधित आसरा ,पान फुलाचा
सुगन्धित दरवले चहुकडे !!

कुण्या चोराने,चोरीला हेतु
सूर्य मालवन्या मनाच्या आधी !!

तिथेच लागली,आज तयाची
अंतिम राख समाधि !!

तेजाचातो अस्त,नयन कुंजिता
विरहं चुम्बुनी आळ्वला !!

प्रखर तेजाचा ,तेज अग्नीचा
सूर्य आज तो मालवला!

चिमणीताई

तो काल दृष्टी योग मी पाहून आलो...........!!

तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

उभा समोर मुत्यु तो मी पाहून आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

रक्ताच्या वेदनेत मी नाहुन आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

क्रूर ती रात्र पाहून मोहरुण आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

आन्न्दाच्या दुखात मी पोहून आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

यातनेला साद मी घालून आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

सुर रडके घेउन नाचून आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

मैफिल ही मित्राची साधुन आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

काल दृष्टी योग स्म्शानी सोडून आलो
मन आन्नादात मी फुलून आलो

चिमणीताई