..........आठवण..........!!
आठवल्या त्या रिमझिम धाराकोमल भेट टी फुलासारखी ,
तुटुन पडली विज़ माझ्यावर
बहरली ति चांदण्या सारखी !!
भर दुपारी आभाळाला
छेदले होते तार्यानी ,
थंडगार तो वारा लागला
वेढले आहें सार्यानी !!
आठवली ती भेट मला
ओल्या ॠतुच्या स्पर्शाने ,
ओला देह शहरला आता
तुझ्या एका छोट्याश्या हरषाने !!
तुझ्या प्रीतिची ओढ़ लागली
मन झाले होते व्याकुळ,
तुझ्या लालिचा गंध वेचता वेचता
मीही झालो होतो बकुल !!
भावनं।नी मनातून माझ्या
ही एक कविता रचली होती ,
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती!!

No comments:
Post a Comment