Saturday, July 19, 2008

आज पहाट जहाली.

आज पहाट पहाट आज पहाट जहाली.
स्वप्न अमृताचे गोड मनी हरवून
...................आज पहाट जहाली.||

स्वप्न म्हणता म्हणता कवा कवडस् हे आलं
पाहताच अंगनी माझ्या मन चांद्न्यांच गेलं
गोड शब्द शहारून आज पहाट जहाली !!

मधुर आवाजाने सकाळ बहरून गेली
सोन चाफ्या कळ्यानि नभ कहरून आली
स्वप्न सुन्दर म्हणताच आज पहाट जहाली !!

हरी नामाच्या गजरान नाद मनोमनी आला
पुश्प्काच्या चंदनानी नवा दिवस वुजाडला
मोहिनिने मोहरून आज पहाट जहाली !!

असाच देवा तू रोज सामोरी येना
यातना विसरून मला तुझ्यात विलीन करना
तुझा भाव मनी राखून आज पहाट जहाली !!

..................चिमनी ताई

No comments: