आज एकटाच होतो मी
आणि तोच रस्ता होता ,नेहमीचाच
सारखा मागे वळुन पाहत होतो
ती हाक मारेल या आशेने ,आक्रोशाने
आठवत होते तिचे शब्द
मनाला भिड्नारे पूर्ण पणे, शीर्षेद
धक्काच तसा लागला होता
मन ही सावरत नव्हते ,घायाळ
मी तिचाच होतो
केसा पासून नखापर्यंत , अक्खा
चालतच जात होतो
रस्ता संपेपर्यंत ,खुळा
विचार ही करत होतो
पुन्हा होइल का भेट ,वाजवी
डोक्यात प्रकाशाच पेटत नव्हता
तेच विचार पुन्हापुन्हा , भंडावलेले
कारन नुकताच आलो होतो
आग लावून ,चितेला
पुन्हा नाही भेटणार
या आशेनेच गेलो होतो, शेवटचा
Wednesday, July 16, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 comment:
Hey.. Really Nice Poem!!
M lovin it...
~http://mimarathicha.blogspot.com
Post a Comment