Thursday, July 3, 2008

तो काल दृष्टी योग मी पाहून आलो...........!!

तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

उभा समोर मुत्यु तो मी पाहून आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

रक्ताच्या वेदनेत मी नाहुन आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

क्रूर ती रात्र पाहून मोहरुण आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

आन्न्दाच्या दुखात मी पोहून आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

यातनेला साद मी घालून आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

सुर रडके घेउन नाचून आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

मैफिल ही मित्राची साधुन आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

काल दृष्टी योग स्म्शानी सोडून आलो
मन आन्नादात मी फुलून आलो

चिमणीताई

No comments: