कुणी नाही बोलत नाही माझ्याशी......
(2002)मद्ये ..........मी दहावित होतो आणि काही कारनामुले
घरातून निघून गेलो होतो ,आणि २ दिवसानी जेव्हा
मला घराची आठ्वन आली तेव्हा परत घरी आलो
पन माझ्याशी कोणी बोलत नव्हते ,तेव्हा २० मिन्तात ही कवीता लिहली आणि
सर्वाना वाचून दाखवली ,आणि happy ending......
........................................
कुणी नाही बोलत नाही माझ्याशी
मनाला वाटते खंत,
होइल माझा कदाचित एकदा
या जगातुनी अंत !!
सर्वे रुसले आहेत माझ्याशी
झाली माझ्याकडून अशी चुक ,
जेवण पन कोणी नाही विचारत
मला लागली आहें आता भूक !!
होता एक मित्र अपुला
तोही गेला रुसाया ,
कुणीच नाही आले
माझे अश्रु पुसाया !!
क्षमा मागुनि नाही बोलत
अशी ही सगळी मानस,
क्षमा करा तुम्ही मला
आहें एक स्वप्न छानसं !!
पुन्हा नाही होणार हो
अशी चुक पप्पा ,
आता तरी बोलाना
मारा माझ्याशी गप्पा !!
आई तू तरी बोलगं
मन हलकं कर गं,
माझ्याशी खेळ गं
रडू नको येवू देवू गं !!
दादा तू तरी सांगना
मी काय करू ?
पुन्हा दारी उभा राहू
का असाच मरू !!
बस बस बस
कुणी नाही बोलले माझ्याशी
मनाला वाटली खंत ,
झाला माझा नक्की आता
या जगातुनी अंत !!

No comments:
Post a Comment