Sunday, September 14, 2008

मरीमाय खायजो तुले ....!!


मरीमाय खायजो तुले ....!!



अहिरानिचं भुत डोक्यावर होतं
हातात मराठीची लेखनी ....!!

दुकानाचा ताबा वडिल पाहत होते
आणि मी नोकराची चाखनी ....!!

उत्तम कवि होणार हेच स्वप्न होतं
सकाळ रात्री तेच पडत होतं ....!!

आज काय झालं उद्या काय होइल
हेच कवितेतच घडत होतं ....!!

कवितेच्या नादात कामाला दुर्लक्ष केलं
गिर्ह्यायिकान्चं मन आता सर्वत्र पसरलं ....!!

आता काय करावं म्हणुन टाइम टेबल केला
कामं सोडून कविताच येते बाकी सर्व इसरलं....!!

आता काय करू महीना झाला खोटा
नाही दीसत आता भरपूर हिरव्या नोटा....!!

आजच मी आईला म्हनलो हे असं असं झालं.... माझ्या मुळे
एकच आवाज आला ,मरिमाय खायजो तुले ,मरी माय खायजो तुले ....!!

चिमनिताई ....!!

तुम......!!

कुछ कहू तो
चुप करा देती हो तुम ...!!

कुछ न कहो तो
मुस्कुरा देती हो तुम ...!!

तूफ़ान सी होकर
गुमसुम सी लगती हो तुम ...!!

ये हवा अपना रुख बदल
हमसे इतना प्यार करती हो तुम ....!!

हमारा शर्माना
हसी हो जाती हो तुम .....!!

हमारा धड़कना
गले लगा लेती हो तुम ....!!

जीवन की इस सफर में
साथी हो जाती हो तुम ....!!

जीवन तो नसीब नाही हमें '
मरकर भी कब्र पर क्या रोती हो तुम ....!! कब्र ( मकबरा )

चिमनिताई ...!!

माझा लढा

मी चाललो पार नवका घेवून
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय .....!!

डाव मांडलाय पत्त्यानचा इथ
रम्मी कोनालाबी खेळता येत नाय
पत्ते पिसुन थकलेत समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

बाग़ उगवली स्वप्नांची इथ
झाडे कोनालाबी लावता येत नाय
झाडे तोडून थकले समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

गाण्याचा बाजार भरलाय इथ
ओरडायला कोनलाबी येत नाय
शिटी वाजवून थकले समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

राजाची सभा भरलीय इथ
वजिराचा तर पत्ताच नाय
अन्यायाला घाबरून थकले समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

ढगांचा पावूस भरलाय इथ
विजांचा तर कळ्कळाटच नाय
पावसाची वाट पाहून थकले समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

जगबुडी म्हणतात होणार इथ
धरतीला कम्पन सुटणार नाय
मी चाललो पार नवका घेवून
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

चिमनिताई ...!!

आशीर्वाद....!!

आज मी लग्न करायचं ठरवलं
आणि करणारच हेही पक्क केलय...!!

माझ्या लाडक्या शब्दांशी
खुप मदत करतात ते मला ...!!

नेहमी सोबत च असतात माझ्या
नाही बोललो तरीही उगाजच ...!!

कधी मी आनंदात असतो
ते मोती बनुन बाहर येतात

मग कधी दुखात असतो
खरे खुरे अश्रु बनुन जिव ओवाळुन टाकतात

मग मला त्यांच्याशीच प्रेम झाले
त्याला मी काय करणार ....!!

आवडायला लागली आहे मला ती
शब्दांसह ,शब्दांची माळा ....!!

कुणी माझा प्रेम भंग करू नका
मी कवताळलय आता तिला ....!!

फक्त मला तुमचा होकार हवा आहे
आमच्या जोडीला तुमचा आशीर्वाद हवा आहे ...!!

दयाल ना .... आशीर्वाद....!!

चिमनिताई ...!!

अहिराणी कविता ...(सावकार ....)


अहिराणी कविता
हा माझा तीसरा प्रयत्न आहे अहिराणी भाषेतला गोड मानून घ्या .

एक सावकार जो फक्त पैश्याच्या मागे आहे आणि बाजारात तोही लुटला जातो


सावकार ....


मी धनाना पुजारी माले धन पाहिजे
काहीच का होईना माले अमाप पाहिजे ......!!

रस्तावर्न कुत्ताल्ल भी माले हाई भुकस
येणारा जाणारा भाड़े खावु चोरी दपे छुपस.........!!

मी शे गावना ठग माले कोण लूबाडस
वावरं बत्ठा खाइगवु माले कोण जुमाडस ....... !!

मी व्यापार ना गुराखी माले व्यापार पाहिजे
काहीच का होईना माले अमाप पाहिजे ...!!

पैसा पैसा ओरडतसं हाई डेडरं सारी
शेतिले पिक नही उपास मारिनी चोरी ...!!

व्यापार ना गुनता येल शे बाजारमा
लुटी गवु लुटी गवु पैसा नही म्हजारमा.....!!

चिमनिताई ...!!

ही माझी मुभा ....!!

ज़रा लाजरी अन निर्मळ स्वभावाची
ख़ास करून माझ्या बरोबर असताना ....!!

अविश्वासाला ही साथ देणारी
माझ्या खोट्याला खरे करून पाहणारी ....!!

तीच ती हो ती च माझी मुभा
निर्माळ्य विचारांची एक अदा ....!!

मैत्रीला प्रेमाचं नातं नकळत जोडणारी
हो तीच मुभा नवळत्या वळनावर वळनारि ....!!

चांगुल्याचा ठेवा मोहितपने जपणारी
माझ्या मनाला हवीहवीशी वाटणारी ...!!

तिला देव पण येतो भेटायला कधीकधी
या निर्विकार आकाराचे दर्शन करून घ्यायला ....!!


माझी मुभा अशीच काहीशी आहे ......!!

चिमनिताई ...!!

माझिया ...!!( मी दास तुझा )


माझिया ...!!( मी दास तुझा )

ना मी शोष
ना मी शेष
मी आत्मा अविर्भास
भासाभास माझिया .....!!

ना मी परिक्रमा
ना मी अखण्डता
वैकुंठ विहारिता
घट घट दास माझिया ....!!

ना मी त्रिमूर्ति
ना मी पंच इन्द्रिय
व्यासा विरहिता
कामधेनु मीच माझिया ...!!!

ना मी प्रत्यक्षा
न मी अविरक्ता
मिया भुत भविष्य
निरंतरची नेम माझिया ...!!

ना मी कळसुया
ना मी अपूर्ववृथा
नियतीचा भ्रम
भासे तुझी माझिया माझिया.....!!

चिमनिताई ....!!

हा खेळ ...


खेळलोच कधी न मी हा खेल
जो मनाला दाखवी आरसा ....!!

जिव ओतून टाकिला तरीही
शरीराला फरक नाही फारसा .....!!

हां खेळच निराळा दोन जिवांचा
प्रेम नाव त्याचे हा भाव मनाचा ....!!

नाते नसता असता एकनिष्ट भावना
जपते मन अन संगम होतो तनाचा ....!!

हा रोग आहे भावनांचा सीमेपार पल्याडचा
नानावती यातना सोसुनी येते ही भावना ....!!

सुंदर काही दीसत नाही सुंदरीच्या सामने
मी रडत होतो देवाकडे म्हनलो एक साकडे मागना .......!!

चिमनिताई ...!!

क्युवारी....!!(एक षडयंत्र )


मी ग्वार धास
मी आश धास
मी तिमिर धास
मी क्युवारी धास ......!!!

अन्नाताचा प्रतिक
निर्विकार प्रतिक
कण कण स्ववादु प्राघास
मी क्युवारी धास ......!!!


नयन वर्तक
प्राधर वर्तक
निरमई आस्वादु न्याघास
मी क्युवारी धास ........!!!


लतिक चमक
भासाभास आभास
कण कण आस्वादु व्याख्यास
मी क्युवारी धास .........!!!

जल निर्जळि
निक्ष्म निर्जळि
श्वाशोश्वास भ्रमास
मी क्युवारी धास ......!!

चिमनिताई ...!!

एक घागर .....!!



मी एक घागर भरली
सुखाची घागर
जी सर्वाना
हविहवीशी वाटते .....!!

मी एक घागर भरली
दुख्हाची घागर ,
जी काहिन्नाच
हवीहवीशी वाटते ......!!

मी एक घागर भरली
ज्ञायाची घागर
जी सर्वाना मान्य
नसते अशी.... !!

मी एक घागर भरली
अज्ञानाची घागर
जी फक्त आंधळ्या तराजुतच
शोभते अशी.....!!

मी एक घागर भरली
शिष्याची घागर
ही फक्त ज्ञान जीन
इतपत सिमित ....!!

मी एक घागर भरली
गुरुची घागर
यात सागराची खोली कमीच ,
आकाशाची विशालता कमीच ,
निरंतर तेवत असलेले ब्रम्हज्ञान
काही अजुनही.....!!

चिमनिताई ....!!

मी करू पाहतोय

मी करू पाहतोय
या गगनाला अजुन उंच

मी करू पाहतोय
या पाण्याला अजुन नितळ

मी करू पहातोय
या धरतीला अजुन घट्ट

मी करू पाहतोय
या शरीराला अजुन बळकत

मी करू पाहतोय
या मनाला अजुन मजबूत

मी करू पाहतोय
या जगाला अजुन मॅमथ (हत्ती सारखा एक प्राणी )

मी करू पाहतोय
या रक्ताला अजुन शिरशिरित

मी करू पाहतोय
या डोळ्याना अजुन तीक्ष्ण

मी करू पाहातोय
या समुद्राला अजुन गोड

मी करू पाहातोय
या सोन्याला अजुन येइल सुवास ...!!

मी करू पाहातोय
या स्वर्गाला शीड्या अमाप ...!!

मी करू पाहातोय
हे भंगलेलं स्वप्न खरं ...!!

मी करू पाहतोय
ही कविता लिहायचं धाडसं....!!

दयाल तुम्ही साथ ..............!!

चिमनिताई ....!!!

माझी करनी (काम )मला आवडतं ते असं


मी असाच बोलतो
काय करणार ?
मी असाच राहतो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

मी असाच मस्ती करतो
काय करणार ?
मी असा गप्प पण बसतो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

मी राज्याची स्वप्न पण बघतो
काय करणार ?
कधी भिका~याचं सोंग ही घेतो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

आता रमतय मन मंदिरात
काय करणार ?
देवा कड़े पाट करू की पोट करू
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

मला आवडते ज्ञानेश्वरी
काय करणार?
दासबोध ही हवाहवा सा वाटतो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

शोधतो कधी कधी दगडात देव
काय करणार ?
निराकाराच्या शोधात धड़पद्तो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

मग विश्वाचीय ठाई मी होय खोटा खोटा
काय करणार ?
देव पाहि तेव्हा आन्नद होई मोठा मोठा
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

सकळ विश्वची माझे घर
काय करणार ?
त्यास नाही आकार उकार
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

गुरु सोडवी अमाप बंधन
काय करणार ?
मी त्याचा वेड़ा एक बाळ
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

चिमनिताई ....!!

या गुरु कृपा .....!!



गुरु कृपेचा दिधला वारा
गुरु विन आहे संत अधूरा ...!!

ज्ञान रूपा तेज हा पूरा
संत ची वाहती या ज्ञान धारा ....!!

जग कल्याणी अवतार घेतला पारा
पोलादी स्पर्श करुनी न्याहाळतो सोनारा ...!!

रूपा रूपा तुनि प्रगटला न्यारा
चंदनासम सुहासिताला घर संसारा ...!!

या विश्वाचा पालन हरता निरंकारा
पाहतो तुला आज मी या गुरु कृपा ,या गुरु कृपा .....!!

चिमनिताई ...!!

या शांततेत आता...!!


या शांततेत आता...!!
एका अश्या माणसाचे मनोव्रुत्त की जो काही दिवसात मारणार आहे

मी काही वेळ होतो सहवासात माझ्या शब्दात एक दुखः आणि पुढचा प्रवास नंतर कारण
तों जेवढा दुख्हात होता तितकाच आनंदित ही पण हा प्रवास मनाचा ........!!

सचेतनाचा वारा लागतोय
धम्मळ झालीय ही वाणी ....!!

मनी कुणाच्या भास् होतायत
कोण कुजबुजतोय ही गानी...!!

भाव विश्व त्यागले आता
काही नको न चारा पानी ...!!

तन्मय जीवन भोगून सरले
मधुर वाचा न आली कानी ...!!

अनंतेच्या वाटावरती पाठ फिरवुनी
कोण होइल का महा धनि ...!!

एकच आशा एकच तरु
मंदिर झालय हे निकामी ...!!


मंदिर झालय हे निकामी ..........!!


पहा पहा रे जीवन चक्र
फिरते आहे मागे पुढे ...!!

कोण कुणाचा कुणाला खातो
कोण कुणाला आहे भ्यातो ...!!

पाहून धरती आहे म्हणते
ये तुला मी आता समावते..!!

घाबरत तर मी वाघला ही नाही
मोकलं झालय आता हे रानं....!!

जीवन चक्र तर सुरु झालय
शरीरही व्याकुळ अन मनही घाण ....!!

चिमनिताई ....!!

अंत...!!

या शांततेत आता
मानुसाही दगावतोय ...

प्रेमाखातिरही का होईना
माणुसकी विसरतोय...

भुन्ग्याला पंख फूटता
कमळ नवे तो शोधतोय .....

जगण्याला आधार का होईना
चिखला वरी हा उभारतोय.....

पत्किला दिव्याचा पसारा
का अंगात इतका भिनतोय .....

मरन्यास तो आतुरलेला
मृत्यु शीवन्यास जातोय ....

भंगले शरीर आता
मी पोरका झाहालोय ...

या देवाकडे ही विचारन्या
त्वरा कराया लावतोय .....

माखलो मी सर्वानगातुन
जीवही परलोकी पोहचतोय .....




आता हा पसारा हवा हवा सा आहे
अंत ही जवळच टिपून बसला आहे .!!

मी मागतो मला दया नितांत झोप आता
आयुष्याच्या किनारी मी वाट पाहत बसलोय .!!

चिमनिताई ..!!

आठवण

असा मनाचा लळा लागला रे
जीवनाला सुखाचा तळा लागला रे

व्यथा सांगतो मी कथा सांगतो मी
आर्ततेच्या सुखाने गळा दाटला रे

मला पाहणारी तिची नजर येते
तिच्या पाहण्यात क्षमा वाटली रे

हसण्यात आहे निराळी मजा रे
सुमधुर तुझी वाणी पटली रे

निनादो असा घुंगरू कानी आला रे
तिने कुंकवाचा टीळा लावला रे

असत्यामागे सत्य सामोरे येते
प्रेम रोगाचा नवा शोध नावाजला रे

कवताळले आता स्वर्ग मिठीत आहे
तुझ्या नावानेच जीवन सुखी वाटते रे

जरी तू आहेस परी लांब माझ्या
यादेत तुझ्या मृत्यु गळा कापतो रे

चिमनिताई ....!!

नसतानाही ...!!


मी नकळतच तुझ्यावर
............प्रेम करत होतो

अस्तित्वाची जानीव् नसतानाही .....!!

मी नकळतच झुरत
................जात होतो

तू माझ्याकडे पाहिलं नसतानाही ......!!

विशाल सागरात एकटाच
...................पोहत जात होतो

तू तिथेही सोबत नसतानाही ......!!



आता भास् होता आहेत
ही मयफिल कधी सजली नसतानाही .....!!

जख्मा वेदानानी भरता आहेत
या डोळ्यात कधी अश्रु नसतानाही ......!!


माझ्या नभाखाली मीच बसतोय
कधीही शीत छाया नसतानाही ......!!

तू माझ्या जीवनात कधी येणार आहेस
मला जगण्याची आवड नसतानाही .....!!

मी तुला असाच सतवत आहे
तू नश्वर जगात जिवंत नसतानाही .....!!

चिमनिताई ....!!

या शांततेत आता...


एका अश्या माणसाचे मनोव्रुत्त की जो काही दिवसात मारणार आहे

मी काही वेळ होतो सहवासात माझ्या शब्दात एक दुखः आणि पुढचा प्रवास नंतर कारण
तों जेवढा दुख्हात होता तितकाच आनंदित ही पण हा प्रवास दुख्हाचा ....

या शांततेत आता
मी हरवनार आहे...!!

मोजकेच दिवस माझे
मी जगणार आहे...!!

कळुद्या मला जीवन
जे पावले आहे...!!

काळाचा घोळ सारा
मी मरणार आहे...!!

यमाचा दूत मला
आज सांगुन गेला...!!

तुझे प्राण पाहिजे
दान मागुन गेला...!!

नवे शरीर मिळेल
नवे नाम देवून गेला...!!

पुरे झाले आता
मी बदनाम आहे...!!

या शांततेत आता
मी हरवनार आहे...!!

चिमनिताई ......!!

वाईट माणूस ...


अजूनही हा पाठलाग
असाच चालु आहे

काही न उरले आज
जे मी समजणार आहे

ओंजाळ रिकामी तरीही
हा गळा तृप्त आहे

काट्यांचा ही सुहास हा
या फुला सम आहे

स्पर्शा विनाही मात्रा हा
लंगोटी चोर आहे

काय सांगू मी तुम्हाला हा
मल्हाळ पोटी आहे

मानवासम दिसणारा हा
भामटा बेईमान आहे

नको तो खरा घडा हा
मातीच्या स्वाभिमान आहे

असुनही नसल्या सारखा हा
श्वापद भावना हिन् आहे

गरज नसूनही गरजू बनुन हा
उपभोगता बनणार आहे

अश्या वासराला बैल समजुन हा
गुराखी आरी टोचत आहे

माहामारी विनाशाची प्रवृति जात हा
अविस्मरनीय कंबर खोचत आहे

चिमनिताई ....!!

मी प्राण देत आहे .....!!


बेखबर नजरांचे
वार होत आहे
मी असाच वेळोवेळी
प्राण देत आहे ....!!

नभेदले जरी हे वार
आरपार होत आहे
सवेदना मनाला
मी घाव घालत आहे ....!!

प्राणा पलिकडे शरीरही
उगाच साथ देत आहे
मी तडकलो तरीही
मुद्दाम शोषित आहे ....!!

आता न कोणी मला
नाही थांबवत आहे
जातो विलीन होण्या
जीवन उगाच लांबवत आहे ...!!

दोस्ता तुम्हावारी विश्वास
अजुन ठाम आहे
प्रेमाने केला कहर हा
मी प्राण देत आहे ....!!

मी प्राण देत आहे .....!!

चिमनिताई ....!!

असा आहे मी


स्वप्नच आले नाही ना
मग का जागतो आहे मी

लयलुट झालीच नाही
मग का झाकतो आहे मी

सूर्यच आला नाही
मग का तपतो आहे मी

मरनच आले नाही
मग का जगतो आहे मी

तू भेटलीच नाही
मग का शोधतो आहे मी

प्रेमच उरले नाही
मग का रागवतो आहे मी

उरलाच नाही किनारा
मग का वाहतो आहे मी

डुबलोच नाही आता
मग का पोहतो आहे मी

सापडे ना मग अश्व
मग का पळतो आहे मी

शरिरच नाही उरले
मग का जळतो आहे मी

चिमनिताई

प्रतीक्षा.....!!


मी वेदनेच्या हाकेन
व्याकुळ झालो होतो

तू येशील सावलीत माझ्या
मी बकुल झालो होतो ....!!

नाही गवसला किनारा
मी वाहतच जात होतो

तू भेटशील या आशेने
मी पाहताच जात होतो ....!!

लय दूर तो किनारा
संपत नाही आता

आठवण येते आहे
दुखः झाले नाथा ...!!

तो गोडवा तुझा रे
आता मी गाईला होतो

क्षण क्षण तुझ्या प्रेमाचा
आता मी पाहिला होता ....!!

अशा शांततेत आता
मन बहरून येते

तू येशील या आशेने
नयन गह्यरून येते ......!!

चिमनिताई

मी घाव घातला आहे..!!


मी घाव घातला आहे..!!

या नश्वर देहा वरती
मी घाव घातला आहे ..!!

या मनाच्या जळ्न्या वरती
मी घाव घातला आहे ..!!

या अभिमानाच्या पर्वतावर
मी घाव घातला आहे ..!!

या कर्म् कांड कामावरती
मी घाव घातला आहे ..!!

या रूप बदलत्या साखळिवर
मी घाव घातला आहे ..!!

या मनाच्या वादळिवर
मी घाव घातला आहे ..!!

या संसाराच्या मोहावरती
मी घाव घातला आहे ..!!

या अमर्यादी इच्छांवर
मी घाव घातला आहे..!!

या मानवाच्या अस्तित्त्वावर
मी घाव घातला आहे..!!

या युधाच्या शर्नागतिवर
मी घाव घातला आहे..!!

अन प्रेमाच्या या आत्म दहनावर
मी घाव घातला आहे..!!

विजयी होइन या विश्वाचा अमर्तेवर
मी घाव घातला आहे..!!


या मानवाच्या जन्मावरती
मी घाव घातला आहे कारन......

या नश्वर देहा वरती
मी घाव घातला आहे..!!

चिमनिताई ......!!

ही कवीता

कतिही प्रयत्न केले तरीही येते ही कवीता
कल्पने कल्पने ने वाट दाखवी ही कविता

काय सुचावे काय रुचावे तर ती ही कविता
भान हरवावे की हरवून जावे ती ही कविता

शब्दांची साखळी बनवते ती ही कविता
स्वताहुन गुम्फते तर ती ही कविता

मनाचा खेळ सारा मनाला दाखवते ती ही कविता
कवीला आपल्याच बंधात बांधते ती ही कविता

ज्या मनाला वाळवि लागते तिथे उमलते ही कविता
मना मनाचा संवाद घडवते ती आपलीच कविता

चिमनिताई ....!!