Tuesday, October 7, 2008

शान्ति भिनली ..आज ..!!


बाहुल्या या डोळ्यांच्या बाहुल्या
ज़रा खिन्न खिन्न आहेत आज ..!!

जरी मिटता ही पापणी क्षम्य
एक घटका विझला हा भास् आज ...!!

क्षण हा पुर्तिचा आला नसला जरी
घटा घटात वास्तव्य करतो आज ...!!

रुण ह्या जन्माचे फेडिले म्हणुन तरी
दिसला हा परभ्र्म्ह वास्तव्यात आज ...!!

पावन झालो असेही नाही या शरीरात
या आत्म्याचा अंत दुरनिकट आहे आज ...!!

तरीही मी सुखी या अर्थी तहानलेलो
शान्ति शान्ति शान्ति भिनली भिनली आज ...!!

बाहुल्या या डोळ्यांच्या बाहुल्या
ज़रा खिन्न खिन्न आहेत आज ...!!

चिमनिताई ~~!!

एकच वेळ ...!!


एकच वेळ ...!!

मी तर केवळ दयेचा सागर
लोटा भर-भर वाहून घे ..
मी तर केवळ मायेचा सागर
एक डुबकी तरी मारून घे ...!!

मी तर केवळ प्रकाश ज्ञानाचा
एकच अंधकार लावून घे
मी तर केवळ क्षणाचा भुंगर
एकदा तरी पाहून घे ..!!

मी तर केवळ प्रभूचा दास
एकच वेळ एइकून घे ..
तू तर आहे दासाचा दास
एकच वेळ ओळखुन घे ..!!

मी तर आहे भविष्याचा मार्ग
एकच वेळा चालून घे ..
मी तर आहे भूतांचा भुत
एकच वेळ जानूं घे ...!!

मी तर आहे पाण्याचा झोत
एकच वेळ पिवून घे
मी तर आहे जीवनाचा मौत
एकच वेळ जगुन घे ..!!

मी तर आहे परमात्म्याशी समरूप
एकच वेळ उपकारून घे ..
मी तर आहे जादूचा चिराग
एकच वेळ फुकमारून घे ...!!

चिमनिताई ~~!!

(शत्रुस ललकारी )

मी फुंकले रणशींग आज
तू घे माघार शत्रु
मी मोडिस काढली माझी प्रथा
तू घे जाणून आज शत्रु ....

शिवा - जिवाचा माझा बाणा
तू तलवार थिरकलास शत्रु
या काळ्या मातीचा मी लाल
तू शून्य गतीला मिसळ शत्रु ..!!

वैकुठाची भूमि आमची ही माय मराठी
तू तळहाताचा मैल शत्रु
ज्ञान मुर्तीची लेखी आमची जात
तू भयभीत आमचाच शत्रु ....!!

वाचा आमची नीट सुनले राजा
तू तर आहें बहिरा शत्रु
नयनांनी तर वार करतोरे तीर
तू तर वास्तु गंध शत्रु ...!!

या देशाला मानाचा मुजरा ठोकतो सलामी
तू गुंड तयाचा शत्रु
निधड्या छातीचा मी शुर योद्धा
तुजला रणशींग फ़ुंकतो शत्रु ..!!

चिमनिताई ~~!!

"अमृतानुभव"


मज नको थोरवा पुर्तिचा
मज नको थोरवा कीर्तीचा
मी तान्हा बाळ काचेचा
मज नको बनवू मुर्तिचा ...!!

राम रामा तुझाच ध्यास
मनामधि माझ्या तुझाच वास
तू कीर्ति-पुर्तिच्या मधास
तुझ्यासाठी अखेरचा एक श्वास ...!!

दया जागवी चैतन्यक्शम्य
प्रत्येक्ष पुर्न्ब्र्ह्म्हा तू ज्ञानराजा
तुझाच भास आहे सर्व जागा
तू निरंतरा तू अधिराजा ...!!

स्वहित ज्ञाना यावे पंढरिसि
एक वेळ पाहावे पांडुरंगासि
तोहा जीवन सफल व्हावा नामकाळि
चित्तावे ,भजावे नाम नित्य हरिसि ...!!

सांगती वेदान्त मिळे जे तत्व
तन्तोतान्ति भाव अनंत काळ
"अमृतानुभव" मिळे ज्यासी नित्य काळ
तोचि विद्वान सर्वांस एकवेळ ...!!

चिमनिताई ~~!!

येत नाही....!!


मला कविता करता येत नाही
नरर्थक रेघोटया मात्र मारतो

सारं कसं काळजाला भिड़त नाही
मग हसत रडत व्यक्त करतो

मला चित्र काढता येत नाही
उभे आडवे भोपळे मात्र छापतो

सारं कसं डोळ्याना पाहावत नाही
मग गपचुप बिनदेखत कापतो

मला प्रेम करता येत नाही
तिला येताजाता घिरट्या मात्र मारतो

सारं काही समोरच घडत नाही
म्हणुन नव्या नव्या युक्त्या शोधतो

म्हणतात प्रेमाला सीमा नाही
मग माझ्या घरापासून तिच्या घरापर्यंत येतोजातो

चिमनिताई ~~!!

मला झोप येत नाही मी काय करू ?


मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला राम झोप येवू देत नाही
रामायण लिहवितो .....!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला कृष्णा झोप येवू देत नाही
महाभारत लिहावितो .....!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला ज्ञानेश्वर झोप येवू देत नाही
ज्ञानेश्वरी लिहवितो ......!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला तुकाराम झोप येवू देत नाही
तुकाराम गाथा लिहवितो .....!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला रामदास झोप येवू देत माही
दासबोध लिहवितो ....!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला नामदेव झोप येवू देत नाही
नामदेव गाथा लिहवितो .....!!

मला झोप येत नाही
मी काय करू ?

चिमनिताई ~~!!

पाहून घे .....


आज माझा नवा दिवस
उगवण्याचा ,

काल झाले ते गेले ,संपले
नाशिवंत ,

मृत्युला कवटाळत शेवटचे
भंगले ,

पानाना फुटल्या पालव्या ,आजच
उपभोगलेले ,

माझे नवे रूप आहे पुर्विचेच
निराकार ,

उघड्या डोळ्यांनी पाहा
स्वत्छ ,

काविळिने व्यापलेली दृष्टी
चांदण्याला पिवळे ,

उगा का होईना ,पण बघ
एकदाच ,

जर इत्छा असेल तर
अन्तिम ,

मी निरभ्र ,मोकळा ,सर्वत्र
सामावलेला ...


अरे वेड्या पाहून घे ...पाहून घे

चिमनिताई ~~!!

रवि मागतो अंधार...!!


रवि मागतो अंधार...!!

मी काल ,आज आणि उद्या '
असाच राहणार आहे ......
...चक्र्व्यव्हात अडकलेला.....!!

मी जळन्याचे स्त्रोत , ज्वाला '
असाच सहणार आहे .....
.....चटक्यांच्यात सामावलेला ...!!

मी भ्रमर दीवाना ,नाद्खुळा '
असाच विरंगुळा आहे ....
.......भिरभिर भिरलेला .....!!

मी नखरेल व्यतुत ,तापलेला '
असाच तपनार आहे ....
.....असंखेत वावरलेला....!!

मी रवि मागतो अंधार ,काळोख '
असाच प्रखार्नार आहे .....
.... अनंत काळावलेला ...!!

चिमनिताई ~~!!

भगवंत ...!!


जानियले भगवंत
तू ज्ञान मूर्ति ....
दावियल्या दिशा
आमरण तृप्ति ...!!

आत्मा बहुतांश
सुक्ष्म बहुगुणी
ब्रम्हा तुझं रूपं
तू चैतन्य मूर्ति ...!!

तुझिया वाणी
अविरिक्त ध्यास
दावियाला ज्ञाना
तूच दुःख हर्ति...!!

ज्ञाना आणि तुका
दोन पाय धुनी
ज्ञान स्पर्श होता
आत्मज्ञान धुर्ति...!!

सदुगुरु विना
नाही धोंडा पानी
करी आता पार
चौर्यान्शीची पूर्ति ....!!

चिमनिताई ~~!!

आता सुटला रे भार ...!!


भार भाराचा आधार
धार धारेला वधार
किती वेणु मी नशीब
आता सुटला रे भार ...!!

मन मनाची वखार
त्याले लागस वारं
जिव कोंबडिना पिंजरा
आता सुटला रे भार ...!!

देव देवा तुनि मार
उड़स आकाश हाई सारं
पानी पेवाले घागर
आता सुटला रे भार ...!!

कोम्भ कोम्भिला मझार
येई त्यालेच जव्हार
हाई खावाले वावरं
आता सुटला रे भार ...!!

माचा माचा वरी पातीचार
त्याले उना आते आकार
झोप उनी शेवटनि
आता सुटला रे भार ....!!

चिमनिताई ~~!!

वेग़ळा नको ...!!


वेग़ळा नको ...!!


मला छंद वेग़ळा नको
मला गंध वेग़ळा नको
या माती मध्ये उगवून
मला व्यंग वेग़ळा नको...!!

मला ध्यास वेग़ळा नको
मला व्यास वेग़ळा नको
या सावली मध्ये अंतरून
मला श्वास वेग़ळा नको .....!!

मला राम वेग़ळानको
मला श्याम वेग़ळा नको
या निराकाराच्या मध्ये तापलेला
मला नाम वेग़ळा नको ...!!

मला आत्मा वेग़ळा नको
मला परमात्मा वेग़ळा नको
या शरीरा मध्ये बसलेला
मला अमरआत्मा वेग़ळा नको ...!!

मला सत्व वेग़ळा नको
मला तत्व वेग़ळा नको
या ज्ञाना मध्ये धुतलेले
मला नेमत्व वेग़ळा नको ...!!

मला गुरु वेग़ळा नको
मला सदगुरु वेग़ळा नको
ब्रम्हज्ञानाविना नसलेला
मला ज्ञानगुरु वेग़ळा नको ...!!

चिमनिताई ~~!!

पक्षी


पक्षी (आपल्या कळ्पातुन हरवलेला )

कोन्या कुळातला कोणी पक्षी
धावत असतो सैरा वैरा...!!

पोटाची आग विझावान्या साठी
शोधतो पानी वैरा वैरा ...!!

सफ़ेद रबग ,पिवळी चोच
काळा कोट वरतून ..!!

आवाज करती पैक पैक पैक
मित्र जोड़ती भारतं ...!!

दुख अपुले संगत होता
पाण्याने अश्रुने ....!!

आगीचा गोलाच तो
विज्हतो आहे पाण्याने ....!!


चिमनिताई ~~!!

चित्रकविता....


चित्रकविता....

चित्र लेखाची बिजली
या निळ्याभोर आभाळि
वावरते ,

तू सांगना सजना
खरच मी तुला निहाळते
मोहरते ,

उंच उंच झाडांची
ही काळी निळी सावली
पसरते ,

दोन ढगांची कहानी
मी प्रेमाने दर्शावते
पायरे ,पायरे.......

चिमनिताई ~~!!

खंत मनाची ....!!


खंत मनाची ....!!

अश्या घननिळ सागरात ,हे दूर दूर किनारे
मल्हाव करीत लाटा ,तू थाम्बलास का रे ...!!

पंढरपुरात आहे ,सदा, नित्य वास त्याचा
कमरेत हाथ दोन्ही ,तो एकला उभा रे .....!!

या उंच पर्वतांचा,नद्या अन सागराचा
वारिस तो एकला ,खबरदार स्तब्द कसा रे ....!!

या मुक्या बाहुल्यांचे कर्तुत्व थोर आहे
नव माणसास कसा हा छंद जोपासलास रे ...!!

भुंग़्य़ाची जात ही न्यारी ,तो कमळ शोधत आहे
वा~यावरी भ्रमर करूनही सूर्यास वेचतो रे ...!!

चिमनिताई ~~!!

एकच थेम्ब ...!!


एकच थेम्ब ...!!

बघ
आले न डोळ्यात पानी
आता
कोण समजावणार तुला
तू
असा कसा विरंगुळा
जा
मी नाही बोलत तुझ्याशी
नको
पुन्हा नको छेडू मला
जाते
मी आता सासरी चालली
हस
आणि खुशीने अलविदा कर
पुन्हा
नाही आता भेट नाही
तू
कोण कुठला विसर मला
अजुन
डोळ्यात एकच थेम्ब .....एकच थेम्ब ......!!

चिमनिताई ~~!!

कविता आणि जेवण


कविता आणि जेवण

येडयाचा कांदा ,कांद्याची वांगी
वांग्याच्या मिरच्या .आणि हे भरित ....!!

कसं जमतं हो तुम्हाला
हे वांग्याचं भरित ?

शेवग्याच्या शेंगा ,वाटपाचं सारण
लावलाय गैस ,आणि ही आमटी ...!!

कसं जमतं हो तुम्हाला
ही शेवग्याची आमटी ?

ज्वारिचं पीठ ,तापलेला तवा
थोडसं मीठ.आणि ही भाकरी ....!!

कसं काय जमते हो
ही ज्वारीची भाकरी ?

भिजवलेले तांदुळ ,शिटी वाला कुकर
घद्याळाचि २० मिनटे आणि हा भात ...!!

कसं काय जमते हो
ही तान्दळाचा भात ?

मग झालं जेवण आज तैयार सर्वाना मेजवानी
कधी कुठे झाले मीठ जास्त आणि कमी पानी

तरीही सहजच कधीतरी बनवतो जेवण
आवडले तर या मेजवानीला खा माझे कालवन

कवितांचे ही असेच आहे ,कधी जास्त गोड होते
कधी थोडी खारत .कधी येते डोळ्यात पानी आणि जीवन होते असेच सुरु...!!

चिमनिताई ~~!!

याद राख मला ...!


मी वाटलो जरी गेलो
तरी याद राख मला ...!

मी पिटलो जरी गेलो
तरी याद राख मला ....!

नसलो जरी जवळ आता
तरी याद राख मला ...!

दूर गेलो असेन या भासात
तरी याद राख मला ....!

मी तुझा नाही झालो
तरी याद राख मला ....!

मी तुझाच आहे या आशेने जग
आणि याद राख मला .....!

मी नेहमी ~ह्युदयात्च असेन
म्हणुन याद राख मला ....!

या सत्यजीवी जगात मी तुझाच आहे
म्हणुन याद राख मला ....!

माझ्या ही ह्युदायत तूच असशील
म्हणुन याद राख मला .....!

मी आताही तुझाच आहे
नंतरही तुझाच राहणार आहे
म्हणुन याद राख मला .....!!

चिमनिताई ~~!!

प्रथम क्रमांक......

प्रथम क्रमांक.....

गगनाला भेदेन चंद्रावर पोह्चेन
ता~याना चमकावें ,सु~याला तळपवेन
...... अशी आहे शक्ति मी
कोण मला हरवेल ...?

नवयुगाचा मी सारथि
....सर्व माझ्या संगती
चंद्र -तारे एकवटूनि
....मीच त्यांचा महारथी ....!

कल्पनेच्या शक्तिने सर्वांना हरवेन
.....युक्त्या नव्या काधीन
उंच उंच पर्वतांच्या
....शिखरावर चढीन ....!

उंच उंच गगनान्ना सर्वांना हरविले
जोम जोम लहरान्ना सर्वांना नमविले
चंद्र -सिरी ता~यांना एकत्र लढविले ...!

पड़त्याला साथ दिली
मित्राला स्नेह दिला
काय हवे आहे आता
प्रथम क्रमांक मिळविला.....!!

चिमनिताई ~~!!

मी खेळ मांडला शब्दांचा ...!!


मी खेळ मांडला शब्दांचा ....!!

ही मांडनि झाली वरखाली
सापडे न कोणी रक्ताचा
पहा पहा डोळे उघडुन
मी खेळ मांडला शब्दांचा ...!!

शब्दच मला सांगतात
कोणी न येथे वरणाचा
भाव भक्ति ही आपल्यासाठीच
मी खेळ मांडला शब्दांचा ....!!

प्रेमा खातिर जान ही देऊ
जिव असेल जर ख~याचा
जिवाभावाचा कोणीही सापडो
मी खेळ मांडला शब्दांचा ....!!

भान असुद्या अंतरंगाचे
हा विश्वची त्याला व्यापायचा
तू लघु ,तो आभासी विशाल
मी खेळ मांडला शब्दांचा ...!!

गुरु विना हा संत अधूरा
संतची मांडी डाव देवाचा
तो दाखवतो ब्रह्मा दोन डोळ्यांनी
मी खेळ मांडला शब्दांचा ...!!

चिमनिताई ~~!!

मी तुझी असतानाही ....!!

मी अशीच तुझ्या मोहात पडली
तू माझा नसतानाही ....!!

मी अशीच तुला सावरू लागली
तू माझा नसतानाही ....!!

तुझ्या काटेरी रस्त्याला मी पायदान दिले
तू माझ्या नसतानाही .....!!

मी तुझ्या भावनाना कधीही ठेच पोहचवली नाही
तू माझा नसतानाही ....!!

तापना~या सूर्यापासून तुझी सावली झाली मी
तू माझा नसतानाही ....!!

माझ्या मनातले गुपित तुलाच सांगितले मी
तू माझा नसतानाही ...!!

मी पुष्कल प्रेम केलं तुझ्यावर
तू माझा नसतानाही....!!

तरीही तू मला समजू शकला नाही
मी तुझी असतानाही ....!!

चिमनिताई ~~!!

तू कवटाळ मला ....!!


तू कवटाळ मला ....!!

मी फिरवली नजर
चहुकडे सम ..!!

घेतला ब्योरा दूर दूर
भिडेल तोवर ..!!

ज्ञान कक्ष्य उघडले
भार देवून ..!!

नकळे तरीही हे गूढ़
भोवताली असुनही ..!!

कारण............!!

मी अज्ञान- मी बालकं
मी ना थोर कुणी .....!!

मी कुरुविचारी -विस्मय वादी
मी ना अघोर कुणी ....!!

जो वास करी चहुकडे
असा हा अदृश्य ....!!

जो समय चक्र चालवी
असा हा अभेद्य ....!!

जो भासालाही आवाज करी
असा हा चेतनामयी ...!!

तोच हा ज्ञानदाता
जो भ्रम्हांड निर्माण करी ...!!

मी क्षरण तुला रे निराकार
तू करशी मज तुसारखा

तू अनंता ,तू अविनाशी
मी तुझा लेकरु ,तू कवटाळ मला ....!!
....................तू कवटाळ मला ....!!

चिमनिताई ~~!!

कारन मी आता देवाकडेच राहणार आहे ....!!


कारन मी आता देवाकडेच राहणार आहे ....!!

मी नेहमी लहानच राहणार आहे
ज़रा ही काही होईना उगाच रुस्नार आहे
मला खुप लाम्ब जायचे आहे
कारण मी आता देवाकडेच राहणार आहे .....!!

मित्र माझे खुप आहे
पण विचारणारे कुणी नाही
एकट्याची वाट मला एकट्याला चालायची आहे
कारण मी आता देवाकडेच राहणार आहे ...!!

भावासारखा भाऊ आहे
आई-वडिल प्रेमाळु आहे
माया त्यांची कधी अपुरी पडणार नाही पण माझी अट आहे
कारण मला देवाकडेच राहायचे आहे .....!!

मी रोजच तुम्हाला सांगत आहे
दुःख तुमचे भरपूर आहे
सर्वांचे दुःख मलाद्या ही इच्छा आहे
कारण मी आता देवाकडेच राहणार आहे ......!!

जो पर्यंत या नश्वर जगात आहे
प्रेमाचे बिज लावायचेच आहे
कधिकधिना कधी मोठे होइल हे झाड़ आता तुम्हाला त्याला वाढवायचे आहे
कारण मी आता देवाकडेच राहणार आहे .......!!


कारण मी आता देवाकडेच राहणार आहे .......!!

चिमनिताई

तू अशीच येत रहा ...!!


तू अशीच येत रहा ...!!

तू माज्या कवितेतून
अशीच येत रहा ....!!

मी तुला पाहिन सदा '
तू अशीच येत रहा ......!!

घायाळ करते तुझी अदा
तू अशीच येत रहा ....!!

जिव आलाय तुझ्या वरच
तू अशीच येत रहा ....!!

वारसा तुझा हा प्रेमाचा
तू अशीच येत रहा ....!!

माझ्या तनामनाला तू भावतेस
तू अशीच येत रहा ....!!

नूतन हा तुझा हर्ष
तू अशीच येत रहा ....!!

कळीच्या रुपान फुल हो
तू अशीच येत रहा ...!!

शुद्ध केले माझ्या मनाला
तू अशीच येत रहा ....!!

वारंवार तू माझीच हो
तू अशीच येत रहा ..!!

चिमनिताई ~~!!

bye bye गणपति बाप्पा ...!!


आला आला आला
वाजत गाजत आला ..!!

मोदक घेवून आला
उन्दरावर बसून आला ..!

कोण कोण कोण ?
अहो आमचा गणपति बाप्पा ..!!

त्याची पूजा करतो
आम्ही अकरा दिवस ...!!

सारखं लक्ष्य देतो
त्याची पनती नाही विझत ...!!

रात्र भर म्हणतो
गणपति बाप्पा ,गणपति बाप्पा..>!!

त्याच्या नादात पिसतो पत्ते
मारतो गप्पा ठप्पा ...!!

आरती अशी करतो
की मीच त्याचा भक्त ...!!

समोरच्या पटली ही
ती झाली व्यक्त ...!!

देवा आमाला माफ़ कर
काही चुकी झाली असेल ...!!

खरा आला तर मारेल
आणि तोही कंबर कसेल....!!

माझे तर आहे
एकच आता सांगणे ...!!

पूजा पाठ सोडून आता
मनोमन जपने .....!!

आज तो जात आहे
त्याला खोल पाण्यात बुडवू ....!!

एक वर्षाने पुन्हा येइल
अश्या ठिकाणी डूबवु ...!!

चला तर मग
त्याला bye bye करा ...!!

चाललाय गणपति बाप्पा
त्याला bye bye करा ...!!

चिमनिताई ~~!!

आयुष्याच्या वाटेवर ...!!


आयुष्याच्या वाटेवर ...!!

रास्ता चुकलो आता
घरी जायचे आहे
जिवाला मुकलो आता
वरी जायचे आहे ..!!

माणूस आहे मी
मानसा सारखे वागतो
वेळ आली तर
जनावरा सारखे जगतो ...!!

कुणी नाही येथे
आधार द्यायला येत
जो असेल तोही नेतात
त्याला माणूस म्हानतायेत...!!

विचार करा ज़रा
काय करता आहात
चोरी होते डोळ्यासमोर
तरीही पाहता आहात ...!!

माणूस माणूस म्हणुन
जनावरे झालीत समदी
जनावरांना असते अक्कल
तुम्हाला आहे का शर्मिंदी ...!!

एकच वाक्य आता
ध्यानात आहे ठेवतो
आयुष्याच्या वाटेवर कुणी
कुणाचा असुनही नसतो ....!!

चिमनिताई ~~!!

माझा ,माझी ,माझे .....!!


माझा ,माझी ,माझे .....!!

आज नाही होत
आणिक एक कविता
करतोय आता
मी फक्त प्रतीक्षा ...]

घरी जायचं आहे
बघतो आहे रास्ता
टेक्सी मिळालि तर चालेल
नाहीतर रिक्शा ....!!

उगाच आहे मी
करतोय विचार
नोकरी नको मला
चांगला आहे व्यापार ..!!

अवघे चांदने घेवून
मी आहे फिरत
रातच्याला घरी येतो
मी मिरत मिरत ...!!

एकटा एकटा असतो
एकच आहे मित्र
तो पण साला भामटा
काढत असतो चित्र ...!!

माझे साले प्रश्न
वेडं करतात मला
सोमवारी फोन करतो
सगळ सांगतो तिला ...!!

पप्पा माझे भारी
सोडत नाही पाठ
जाइन तिथे येतात
म्हणे आहे माझ्याशी गाठ...!!

आई माझी चागली
आहे साधी भोळी
रोज नवे नाटक सागतों
लावतो लाळी गोळी ...!!

दादा माझा चम्पक
हुशार आहे फार
फसवलं जर त्याला
देतो मला मार ...!!

आइटम माझी लय भारी
करते नटा फट्टा
ब्यूटी पार्लर घेवून बसते
नोटा येतात सट्टा सट्टा ...!!

मला बघून सारे
हसता आहेत तुम्ही
कविता वाचली आता
विचार कळवा डमी...!! ( नकली )

चिमनिताई ~~!!