Tuesday, October 7, 2008

शान्ति भिनली ..आज ..!!


बाहुल्या या डोळ्यांच्या बाहुल्या
ज़रा खिन्न खिन्न आहेत आज ..!!

जरी मिटता ही पापणी क्षम्य
एक घटका विझला हा भास् आज ...!!

क्षण हा पुर्तिचा आला नसला जरी
घटा घटात वास्तव्य करतो आज ...!!

रुण ह्या जन्माचे फेडिले म्हणुन तरी
दिसला हा परभ्र्म्ह वास्तव्यात आज ...!!

पावन झालो असेही नाही या शरीरात
या आत्म्याचा अंत दुरनिकट आहे आज ...!!

तरीही मी सुखी या अर्थी तहानलेलो
शान्ति शान्ति शान्ति भिनली भिनली आज ...!!

बाहुल्या या डोळ्यांच्या बाहुल्या
ज़रा खिन्न खिन्न आहेत आज ...!!

चिमनिताई ~~!!

एकच वेळ ...!!


एकच वेळ ...!!

मी तर केवळ दयेचा सागर
लोटा भर-भर वाहून घे ..
मी तर केवळ मायेचा सागर
एक डुबकी तरी मारून घे ...!!

मी तर केवळ प्रकाश ज्ञानाचा
एकच अंधकार लावून घे
मी तर केवळ क्षणाचा भुंगर
एकदा तरी पाहून घे ..!!

मी तर केवळ प्रभूचा दास
एकच वेळ एइकून घे ..
तू तर आहे दासाचा दास
एकच वेळ ओळखुन घे ..!!

मी तर आहे भविष्याचा मार्ग
एकच वेळा चालून घे ..
मी तर आहे भूतांचा भुत
एकच वेळ जानूं घे ...!!

मी तर आहे पाण्याचा झोत
एकच वेळ पिवून घे
मी तर आहे जीवनाचा मौत
एकच वेळ जगुन घे ..!!

मी तर आहे परमात्म्याशी समरूप
एकच वेळ उपकारून घे ..
मी तर आहे जादूचा चिराग
एकच वेळ फुकमारून घे ...!!

चिमनिताई ~~!!

(शत्रुस ललकारी )

मी फुंकले रणशींग आज
तू घे माघार शत्रु
मी मोडिस काढली माझी प्रथा
तू घे जाणून आज शत्रु ....

शिवा - जिवाचा माझा बाणा
तू तलवार थिरकलास शत्रु
या काळ्या मातीचा मी लाल
तू शून्य गतीला मिसळ शत्रु ..!!

वैकुठाची भूमि आमची ही माय मराठी
तू तळहाताचा मैल शत्रु
ज्ञान मुर्तीची लेखी आमची जात
तू भयभीत आमचाच शत्रु ....!!

वाचा आमची नीट सुनले राजा
तू तर आहें बहिरा शत्रु
नयनांनी तर वार करतोरे तीर
तू तर वास्तु गंध शत्रु ...!!

या देशाला मानाचा मुजरा ठोकतो सलामी
तू गुंड तयाचा शत्रु
निधड्या छातीचा मी शुर योद्धा
तुजला रणशींग फ़ुंकतो शत्रु ..!!

चिमनिताई ~~!!

"अमृतानुभव"


मज नको थोरवा पुर्तिचा
मज नको थोरवा कीर्तीचा
मी तान्हा बाळ काचेचा
मज नको बनवू मुर्तिचा ...!!

राम रामा तुझाच ध्यास
मनामधि माझ्या तुझाच वास
तू कीर्ति-पुर्तिच्या मधास
तुझ्यासाठी अखेरचा एक श्वास ...!!

दया जागवी चैतन्यक्शम्य
प्रत्येक्ष पुर्न्ब्र्ह्म्हा तू ज्ञानराजा
तुझाच भास आहे सर्व जागा
तू निरंतरा तू अधिराजा ...!!

स्वहित ज्ञाना यावे पंढरिसि
एक वेळ पाहावे पांडुरंगासि
तोहा जीवन सफल व्हावा नामकाळि
चित्तावे ,भजावे नाम नित्य हरिसि ...!!

सांगती वेदान्त मिळे जे तत्व
तन्तोतान्ति भाव अनंत काळ
"अमृतानुभव" मिळे ज्यासी नित्य काळ
तोचि विद्वान सर्वांस एकवेळ ...!!

चिमनिताई ~~!!

येत नाही....!!


मला कविता करता येत नाही
नरर्थक रेघोटया मात्र मारतो

सारं कसं काळजाला भिड़त नाही
मग हसत रडत व्यक्त करतो

मला चित्र काढता येत नाही
उभे आडवे भोपळे मात्र छापतो

सारं कसं डोळ्याना पाहावत नाही
मग गपचुप बिनदेखत कापतो

मला प्रेम करता येत नाही
तिला येताजाता घिरट्या मात्र मारतो

सारं काही समोरच घडत नाही
म्हणुन नव्या नव्या युक्त्या शोधतो

म्हणतात प्रेमाला सीमा नाही
मग माझ्या घरापासून तिच्या घरापर्यंत येतोजातो

चिमनिताई ~~!!

मला झोप येत नाही मी काय करू ?


मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला राम झोप येवू देत नाही
रामायण लिहवितो .....!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला कृष्णा झोप येवू देत नाही
महाभारत लिहावितो .....!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला ज्ञानेश्वर झोप येवू देत नाही
ज्ञानेश्वरी लिहवितो ......!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला तुकाराम झोप येवू देत नाही
तुकाराम गाथा लिहवितो .....!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला रामदास झोप येवू देत माही
दासबोध लिहवितो ....!!

मी काय करू ?
मी काय करू ?
मला झोप येत नाही
मी काय करू ?

मला नामदेव झोप येवू देत नाही
नामदेव गाथा लिहवितो .....!!

मला झोप येत नाही
मी काय करू ?

चिमनिताई ~~!!

पाहून घे .....


आज माझा नवा दिवस
उगवण्याचा ,

काल झाले ते गेले ,संपले
नाशिवंत ,

मृत्युला कवटाळत शेवटचे
भंगले ,

पानाना फुटल्या पालव्या ,आजच
उपभोगलेले ,

माझे नवे रूप आहे पुर्विचेच
निराकार ,

उघड्या डोळ्यांनी पाहा
स्वत्छ ,

काविळिने व्यापलेली दृष्टी
चांदण्याला पिवळे ,

उगा का होईना ,पण बघ
एकदाच ,

जर इत्छा असेल तर
अन्तिम ,

मी निरभ्र ,मोकळा ,सर्वत्र
सामावलेला ...


अरे वेड्या पाहून घे ...पाहून घे

चिमनिताई ~~!!

रवि मागतो अंधार...!!


रवि मागतो अंधार...!!

मी काल ,आज आणि उद्या '
असाच राहणार आहे ......
...चक्र्व्यव्हात अडकलेला.....!!

मी जळन्याचे स्त्रोत , ज्वाला '
असाच सहणार आहे .....
.....चटक्यांच्यात सामावलेला ...!!

मी भ्रमर दीवाना ,नाद्खुळा '
असाच विरंगुळा आहे ....
.......भिरभिर भिरलेला .....!!

मी नखरेल व्यतुत ,तापलेला '
असाच तपनार आहे ....
.....असंखेत वावरलेला....!!

मी रवि मागतो अंधार ,काळोख '
असाच प्रखार्नार आहे .....
.... अनंत काळावलेला ...!!

चिमनिताई ~~!!

भगवंत ...!!


जानियले भगवंत
तू ज्ञान मूर्ति ....
दावियल्या दिशा
आमरण तृप्ति ...!!

आत्मा बहुतांश
सुक्ष्म बहुगुणी
ब्रम्हा तुझं रूपं
तू चैतन्य मूर्ति ...!!

तुझिया वाणी
अविरिक्त ध्यास
दावियाला ज्ञाना
तूच दुःख हर्ति...!!

ज्ञाना आणि तुका
दोन पाय धुनी
ज्ञान स्पर्श होता
आत्मज्ञान धुर्ति...!!

सदुगुरु विना
नाही धोंडा पानी
करी आता पार
चौर्यान्शीची पूर्ति ....!!

चिमनिताई ~~!!

आता सुटला रे भार ...!!


भार भाराचा आधार
धार धारेला वधार
किती वेणु मी नशीब
आता सुटला रे भार ...!!

मन मनाची वखार
त्याले लागस वारं
जिव कोंबडिना पिंजरा
आता सुटला रे भार ...!!

देव देवा तुनि मार
उड़स आकाश हाई सारं
पानी पेवाले घागर
आता सुटला रे भार ...!!

कोम्भ कोम्भिला मझार
येई त्यालेच जव्हार
हाई खावाले वावरं
आता सुटला रे भार ...!!

माचा माचा वरी पातीचार
त्याले उना आते आकार
झोप उनी शेवटनि
आता सुटला रे भार ....!!

चिमनिताई ~~!!

वेग़ळा नको ...!!


वेग़ळा नको ...!!


मला छंद वेग़ळा नको
मला गंध वेग़ळा नको
या माती मध्ये उगवून
मला व्यंग वेग़ळा नको...!!

मला ध्यास वेग़ळा नको
मला व्यास वेग़ळा नको
या सावली मध्ये अंतरून
मला श्वास वेग़ळा नको .....!!

मला राम वेग़ळानको
मला श्याम वेग़ळा नको
या निराकाराच्या मध्ये तापलेला
मला नाम वेग़ळा नको ...!!

मला आत्मा वेग़ळा नको
मला परमात्मा वेग़ळा नको
या शरीरा मध्ये बसलेला
मला अमरआत्मा वेग़ळा नको ...!!

मला सत्व वेग़ळा नको
मला तत्व वेग़ळा नको
या ज्ञाना मध्ये धुतलेले
मला नेमत्व वेग़ळा नको ...!!

मला गुरु वेग़ळा नको
मला सदगुरु वेग़ळा नको
ब्रम्हज्ञानाविना नसलेला
मला ज्ञानगुरु वेग़ळा नको ...!!

चिमनिताई ~~!!

पक्षी


पक्षी (आपल्या कळ्पातुन हरवलेला )

कोन्या कुळातला कोणी पक्षी
धावत असतो सैरा वैरा...!!

पोटाची आग विझावान्या साठी
शोधतो पानी वैरा वैरा ...!!

सफ़ेद रबग ,पिवळी चोच
काळा कोट वरतून ..!!

आवाज करती पैक पैक पैक
मित्र जोड़ती भारतं ...!!

दुख अपुले संगत होता
पाण्याने अश्रुने ....!!

आगीचा गोलाच तो
विज्हतो आहे पाण्याने ....!!


चिमनिताई ~~!!

चित्रकविता....


चित्रकविता....

चित्र लेखाची बिजली
या निळ्याभोर आभाळि
वावरते ,

तू सांगना सजना
खरच मी तुला निहाळते
मोहरते ,

उंच उंच झाडांची
ही काळी निळी सावली
पसरते ,

दोन ढगांची कहानी
मी प्रेमाने दर्शावते
पायरे ,पायरे.......

चिमनिताई ~~!!

खंत मनाची ....!!


खंत मनाची ....!!

अश्या घननिळ सागरात ,हे दूर दूर किनारे
मल्हाव करीत लाटा ,तू थाम्बलास का रे ...!!

पंढरपुरात आहे ,सदा, नित्य वास त्याचा
कमरेत हाथ दोन्ही ,तो एकला उभा रे .....!!

या उंच पर्वतांचा,नद्या अन सागराचा
वारिस तो एकला ,खबरदार स्तब्द कसा रे ....!!

या मुक्या बाहुल्यांचे कर्तुत्व थोर आहे
नव माणसास कसा हा छंद जोपासलास रे ...!!

भुंग़्य़ाची जात ही न्यारी ,तो कमळ शोधत आहे
वा~यावरी भ्रमर करूनही सूर्यास वेचतो रे ...!!

चिमनिताई ~~!!

एकच थेम्ब ...!!


एकच थेम्ब ...!!

बघ
आले न डोळ्यात पानी
आता
कोण समजावणार तुला
तू
असा कसा विरंगुळा
जा
मी नाही बोलत तुझ्याशी
नको
पुन्हा नको छेडू मला
जाते
मी आता सासरी चालली
हस
आणि खुशीने अलविदा कर
पुन्हा
नाही आता भेट नाही
तू
कोण कुठला विसर मला
अजुन
डोळ्यात एकच थेम्ब .....एकच थेम्ब ......!!

चिमनिताई ~~!!

कविता आणि जेवण


कविता आणि जेवण

येडयाचा कांदा ,कांद्याची वांगी
वांग्याच्या मिरच्या .आणि हे भरित ....!!

कसं जमतं हो तुम्हाला
हे वांग्याचं भरित ?

शेवग्याच्या शेंगा ,वाटपाचं सारण
लावलाय गैस ,आणि ही आमटी ...!!

कसं जमतं हो तुम्हाला
ही शेवग्याची आमटी ?

ज्वारिचं पीठ ,तापलेला तवा
थोडसं मीठ.आणि ही भाकरी ....!!

कसं काय जमते हो
ही ज्वारीची भाकरी ?

भिजवलेले तांदुळ ,शिटी वाला कुकर
घद्याळाचि २० मिनटे आणि हा भात ...!!

कसं काय जमते हो
ही तान्दळाचा भात ?

मग झालं जेवण आज तैयार सर्वाना मेजवानी
कधी कुठे झाले मीठ जास्त आणि कमी पानी

तरीही सहजच कधीतरी बनवतो जेवण
आवडले तर या मेजवानीला खा माझे कालवन

कवितांचे ही असेच आहे ,कधी जास्त गोड होते
कधी थोडी खारत .कधी येते डोळ्यात पानी आणि जीवन होते असेच सुरु...!!

चिमनिताई ~~!!

याद राख मला ...!


मी वाटलो जरी गेलो
तरी याद राख मला ...!

मी पिटलो जरी गेलो
तरी याद राख मला ....!

नसलो जरी जवळ आता
तरी याद राख मला ...!

दूर गेलो असेन या भासात
तरी याद राख मला ....!

मी तुझा नाही झालो
तरी याद राख मला ....!

मी तुझाच आहे या आशेने जग
आणि याद राख मला .....!

मी नेहमी ~ह्युदयात्च असेन
म्हणुन याद राख मला ....!

या सत्यजीवी जगात मी तुझाच आहे
म्हणुन याद राख मला ....!

माझ्या ही ह्युदायत तूच असशील
म्हणुन याद राख मला .....!

मी आताही तुझाच आहे
नंतरही तुझाच राहणार आहे
म्हणुन याद राख मला .....!!

चिमनिताई ~~!!

प्रथम क्रमांक......

प्रथम क्रमांक.....

गगनाला भेदेन चंद्रावर पोह्चेन
ता~याना चमकावें ,सु~याला तळपवेन
...... अशी आहे शक्ति मी
कोण मला हरवेल ...?

नवयुगाचा मी सारथि
....सर्व माझ्या संगती
चंद्र -तारे एकवटूनि
....मीच त्यांचा महारथी ....!

कल्पनेच्या शक्तिने सर्वांना हरवेन
.....युक्त्या नव्या काधीन
उंच उंच पर्वतांच्या
....शिखरावर चढीन ....!

उंच उंच गगनान्ना सर्वांना हरविले
जोम जोम लहरान्ना सर्वांना नमविले
चंद्र -सिरी ता~यांना एकत्र लढविले ...!

पड़त्याला साथ दिली
मित्राला स्नेह दिला
काय हवे आहे आता
प्रथम क्रमांक मिळविला.....!!

चिमनिताई ~~!!

मी खेळ मांडला शब्दांचा ...!!


मी खेळ मांडला शब्दांचा ....!!

ही मांडनि झाली वरखाली
सापडे न कोणी रक्ताचा
पहा पहा डोळे उघडुन
मी खेळ मांडला शब्दांचा ...!!

शब्दच मला सांगतात
कोणी न येथे वरणाचा
भाव भक्ति ही आपल्यासाठीच
मी खेळ मांडला शब्दांचा ....!!

प्रेमा खातिर जान ही देऊ
जिव असेल जर ख~याचा
जिवाभावाचा कोणीही सापडो
मी खेळ मांडला शब्दांचा ....!!

भान असुद्या अंतरंगाचे
हा विश्वची त्याला व्यापायचा
तू लघु ,तो आभासी विशाल
मी खेळ मांडला शब्दांचा ...!!

गुरु विना हा संत अधूरा
संतची मांडी डाव देवाचा
तो दाखवतो ब्रह्मा दोन डोळ्यांनी
मी खेळ मांडला शब्दांचा ...!!

चिमनिताई ~~!!

मी तुझी असतानाही ....!!

मी अशीच तुझ्या मोहात पडली
तू माझा नसतानाही ....!!

मी अशीच तुला सावरू लागली
तू माझा नसतानाही ....!!

तुझ्या काटेरी रस्त्याला मी पायदान दिले
तू माझ्या नसतानाही .....!!

मी तुझ्या भावनाना कधीही ठेच पोहचवली नाही
तू माझा नसतानाही ....!!

तापना~या सूर्यापासून तुझी सावली झाली मी
तू माझा नसतानाही ....!!

माझ्या मनातले गुपित तुलाच सांगितले मी
तू माझा नसतानाही ...!!

मी पुष्कल प्रेम केलं तुझ्यावर
तू माझा नसतानाही....!!

तरीही तू मला समजू शकला नाही
मी तुझी असतानाही ....!!

चिमनिताई ~~!!

तू कवटाळ मला ....!!


तू कवटाळ मला ....!!

मी फिरवली नजर
चहुकडे सम ..!!

घेतला ब्योरा दूर दूर
भिडेल तोवर ..!!

ज्ञान कक्ष्य उघडले
भार देवून ..!!

नकळे तरीही हे गूढ़
भोवताली असुनही ..!!

कारण............!!

मी अज्ञान- मी बालकं
मी ना थोर कुणी .....!!

मी कुरुविचारी -विस्मय वादी
मी ना अघोर कुणी ....!!

जो वास करी चहुकडे
असा हा अदृश्य ....!!

जो समय चक्र चालवी
असा हा अभेद्य ....!!

जो भासालाही आवाज करी
असा हा चेतनामयी ...!!

तोच हा ज्ञानदाता
जो भ्रम्हांड निर्माण करी ...!!

मी क्षरण तुला रे निराकार
तू करशी मज तुसारखा

तू अनंता ,तू अविनाशी
मी तुझा लेकरु ,तू कवटाळ मला ....!!
....................तू कवटाळ मला ....!!

चिमनिताई ~~!!

कारन मी आता देवाकडेच राहणार आहे ....!!


कारन मी आता देवाकडेच राहणार आहे ....!!

मी नेहमी लहानच राहणार आहे
ज़रा ही काही होईना उगाच रुस्नार आहे
मला खुप लाम्ब जायचे आहे
कारण मी आता देवाकडेच राहणार आहे .....!!

मित्र माझे खुप आहे
पण विचारणारे कुणी नाही
एकट्याची वाट मला एकट्याला चालायची आहे
कारण मी आता देवाकडेच राहणार आहे ...!!

भावासारखा भाऊ आहे
आई-वडिल प्रेमाळु आहे
माया त्यांची कधी अपुरी पडणार नाही पण माझी अट आहे
कारण मला देवाकडेच राहायचे आहे .....!!

मी रोजच तुम्हाला सांगत आहे
दुःख तुमचे भरपूर आहे
सर्वांचे दुःख मलाद्या ही इच्छा आहे
कारण मी आता देवाकडेच राहणार आहे ......!!

जो पर्यंत या नश्वर जगात आहे
प्रेमाचे बिज लावायचेच आहे
कधिकधिना कधी मोठे होइल हे झाड़ आता तुम्हाला त्याला वाढवायचे आहे
कारण मी आता देवाकडेच राहणार आहे .......!!


कारण मी आता देवाकडेच राहणार आहे .......!!

चिमनिताई

तू अशीच येत रहा ...!!


तू अशीच येत रहा ...!!

तू माज्या कवितेतून
अशीच येत रहा ....!!

मी तुला पाहिन सदा '
तू अशीच येत रहा ......!!

घायाळ करते तुझी अदा
तू अशीच येत रहा ....!!

जिव आलाय तुझ्या वरच
तू अशीच येत रहा ....!!

वारसा तुझा हा प्रेमाचा
तू अशीच येत रहा ....!!

माझ्या तनामनाला तू भावतेस
तू अशीच येत रहा ....!!

नूतन हा तुझा हर्ष
तू अशीच येत रहा ....!!

कळीच्या रुपान फुल हो
तू अशीच येत रहा ...!!

शुद्ध केले माझ्या मनाला
तू अशीच येत रहा ....!!

वारंवार तू माझीच हो
तू अशीच येत रहा ..!!

चिमनिताई ~~!!

bye bye गणपति बाप्पा ...!!


आला आला आला
वाजत गाजत आला ..!!

मोदक घेवून आला
उन्दरावर बसून आला ..!

कोण कोण कोण ?
अहो आमचा गणपति बाप्पा ..!!

त्याची पूजा करतो
आम्ही अकरा दिवस ...!!

सारखं लक्ष्य देतो
त्याची पनती नाही विझत ...!!

रात्र भर म्हणतो
गणपति बाप्पा ,गणपति बाप्पा..>!!

त्याच्या नादात पिसतो पत्ते
मारतो गप्पा ठप्पा ...!!

आरती अशी करतो
की मीच त्याचा भक्त ...!!

समोरच्या पटली ही
ती झाली व्यक्त ...!!

देवा आमाला माफ़ कर
काही चुकी झाली असेल ...!!

खरा आला तर मारेल
आणि तोही कंबर कसेल....!!

माझे तर आहे
एकच आता सांगणे ...!!

पूजा पाठ सोडून आता
मनोमन जपने .....!!

आज तो जात आहे
त्याला खोल पाण्यात बुडवू ....!!

एक वर्षाने पुन्हा येइल
अश्या ठिकाणी डूबवु ...!!

चला तर मग
त्याला bye bye करा ...!!

चाललाय गणपति बाप्पा
त्याला bye bye करा ...!!

चिमनिताई ~~!!

आयुष्याच्या वाटेवर ...!!


आयुष्याच्या वाटेवर ...!!

रास्ता चुकलो आता
घरी जायचे आहे
जिवाला मुकलो आता
वरी जायचे आहे ..!!

माणूस आहे मी
मानसा सारखे वागतो
वेळ आली तर
जनावरा सारखे जगतो ...!!

कुणी नाही येथे
आधार द्यायला येत
जो असेल तोही नेतात
त्याला माणूस म्हानतायेत...!!

विचार करा ज़रा
काय करता आहात
चोरी होते डोळ्यासमोर
तरीही पाहता आहात ...!!

माणूस माणूस म्हणुन
जनावरे झालीत समदी
जनावरांना असते अक्कल
तुम्हाला आहे का शर्मिंदी ...!!

एकच वाक्य आता
ध्यानात आहे ठेवतो
आयुष्याच्या वाटेवर कुणी
कुणाचा असुनही नसतो ....!!

चिमनिताई ~~!!

माझा ,माझी ,माझे .....!!


माझा ,माझी ,माझे .....!!

आज नाही होत
आणिक एक कविता
करतोय आता
मी फक्त प्रतीक्षा ...]

घरी जायचं आहे
बघतो आहे रास्ता
टेक्सी मिळालि तर चालेल
नाहीतर रिक्शा ....!!

उगाच आहे मी
करतोय विचार
नोकरी नको मला
चांगला आहे व्यापार ..!!

अवघे चांदने घेवून
मी आहे फिरत
रातच्याला घरी येतो
मी मिरत मिरत ...!!

एकटा एकटा असतो
एकच आहे मित्र
तो पण साला भामटा
काढत असतो चित्र ...!!

माझे साले प्रश्न
वेडं करतात मला
सोमवारी फोन करतो
सगळ सांगतो तिला ...!!

पप्पा माझे भारी
सोडत नाही पाठ
जाइन तिथे येतात
म्हणे आहे माझ्याशी गाठ...!!

आई माझी चागली
आहे साधी भोळी
रोज नवे नाटक सागतों
लावतो लाळी गोळी ...!!

दादा माझा चम्पक
हुशार आहे फार
फसवलं जर त्याला
देतो मला मार ...!!

आइटम माझी लय भारी
करते नटा फट्टा
ब्यूटी पार्लर घेवून बसते
नोटा येतात सट्टा सट्टा ...!!

मला बघून सारे
हसता आहेत तुम्ही
कविता वाचली आता
विचार कळवा डमी...!! ( नकली )

चिमनिताई ~~!!

Sunday, September 14, 2008

मरीमाय खायजो तुले ....!!


मरीमाय खायजो तुले ....!!



अहिरानिचं भुत डोक्यावर होतं
हातात मराठीची लेखनी ....!!

दुकानाचा ताबा वडिल पाहत होते
आणि मी नोकराची चाखनी ....!!

उत्तम कवि होणार हेच स्वप्न होतं
सकाळ रात्री तेच पडत होतं ....!!

आज काय झालं उद्या काय होइल
हेच कवितेतच घडत होतं ....!!

कवितेच्या नादात कामाला दुर्लक्ष केलं
गिर्ह्यायिकान्चं मन आता सर्वत्र पसरलं ....!!

आता काय करावं म्हणुन टाइम टेबल केला
कामं सोडून कविताच येते बाकी सर्व इसरलं....!!

आता काय करू महीना झाला खोटा
नाही दीसत आता भरपूर हिरव्या नोटा....!!

आजच मी आईला म्हनलो हे असं असं झालं.... माझ्या मुळे
एकच आवाज आला ,मरिमाय खायजो तुले ,मरी माय खायजो तुले ....!!

चिमनिताई ....!!

तुम......!!

कुछ कहू तो
चुप करा देती हो तुम ...!!

कुछ न कहो तो
मुस्कुरा देती हो तुम ...!!

तूफ़ान सी होकर
गुमसुम सी लगती हो तुम ...!!

ये हवा अपना रुख बदल
हमसे इतना प्यार करती हो तुम ....!!

हमारा शर्माना
हसी हो जाती हो तुम .....!!

हमारा धड़कना
गले लगा लेती हो तुम ....!!

जीवन की इस सफर में
साथी हो जाती हो तुम ....!!

जीवन तो नसीब नाही हमें '
मरकर भी कब्र पर क्या रोती हो तुम ....!! कब्र ( मकबरा )

चिमनिताई ...!!

माझा लढा

मी चाललो पार नवका घेवून
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय .....!!

डाव मांडलाय पत्त्यानचा इथ
रम्मी कोनालाबी खेळता येत नाय
पत्ते पिसुन थकलेत समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

बाग़ उगवली स्वप्नांची इथ
झाडे कोनालाबी लावता येत नाय
झाडे तोडून थकले समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

गाण्याचा बाजार भरलाय इथ
ओरडायला कोनलाबी येत नाय
शिटी वाजवून थकले समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

राजाची सभा भरलीय इथ
वजिराचा तर पत्ताच नाय
अन्यायाला घाबरून थकले समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

ढगांचा पावूस भरलाय इथ
विजांचा तर कळ्कळाटच नाय
पावसाची वाट पाहून थकले समदी
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

जगबुडी म्हणतात होणार इथ
धरतीला कम्पन सुटणार नाय
मी चाललो पार नवका घेवून
मला सम्द्यांना वर्ती नेयाचं हाय ..!!

चिमनिताई ...!!

आशीर्वाद....!!

आज मी लग्न करायचं ठरवलं
आणि करणारच हेही पक्क केलय...!!

माझ्या लाडक्या शब्दांशी
खुप मदत करतात ते मला ...!!

नेहमी सोबत च असतात माझ्या
नाही बोललो तरीही उगाजच ...!!

कधी मी आनंदात असतो
ते मोती बनुन बाहर येतात

मग कधी दुखात असतो
खरे खुरे अश्रु बनुन जिव ओवाळुन टाकतात

मग मला त्यांच्याशीच प्रेम झाले
त्याला मी काय करणार ....!!

आवडायला लागली आहे मला ती
शब्दांसह ,शब्दांची माळा ....!!

कुणी माझा प्रेम भंग करू नका
मी कवताळलय आता तिला ....!!

फक्त मला तुमचा होकार हवा आहे
आमच्या जोडीला तुमचा आशीर्वाद हवा आहे ...!!

दयाल ना .... आशीर्वाद....!!

चिमनिताई ...!!

अहिराणी कविता ...(सावकार ....)


अहिराणी कविता
हा माझा तीसरा प्रयत्न आहे अहिराणी भाषेतला गोड मानून घ्या .

एक सावकार जो फक्त पैश्याच्या मागे आहे आणि बाजारात तोही लुटला जातो


सावकार ....


मी धनाना पुजारी माले धन पाहिजे
काहीच का होईना माले अमाप पाहिजे ......!!

रस्तावर्न कुत्ताल्ल भी माले हाई भुकस
येणारा जाणारा भाड़े खावु चोरी दपे छुपस.........!!

मी शे गावना ठग माले कोण लूबाडस
वावरं बत्ठा खाइगवु माले कोण जुमाडस ....... !!

मी व्यापार ना गुराखी माले व्यापार पाहिजे
काहीच का होईना माले अमाप पाहिजे ...!!

पैसा पैसा ओरडतसं हाई डेडरं सारी
शेतिले पिक नही उपास मारिनी चोरी ...!!

व्यापार ना गुनता येल शे बाजारमा
लुटी गवु लुटी गवु पैसा नही म्हजारमा.....!!

चिमनिताई ...!!

ही माझी मुभा ....!!

ज़रा लाजरी अन निर्मळ स्वभावाची
ख़ास करून माझ्या बरोबर असताना ....!!

अविश्वासाला ही साथ देणारी
माझ्या खोट्याला खरे करून पाहणारी ....!!

तीच ती हो ती च माझी मुभा
निर्माळ्य विचारांची एक अदा ....!!

मैत्रीला प्रेमाचं नातं नकळत जोडणारी
हो तीच मुभा नवळत्या वळनावर वळनारि ....!!

चांगुल्याचा ठेवा मोहितपने जपणारी
माझ्या मनाला हवीहवीशी वाटणारी ...!!

तिला देव पण येतो भेटायला कधीकधी
या निर्विकार आकाराचे दर्शन करून घ्यायला ....!!


माझी मुभा अशीच काहीशी आहे ......!!

चिमनिताई ...!!

माझिया ...!!( मी दास तुझा )


माझिया ...!!( मी दास तुझा )

ना मी शोष
ना मी शेष
मी आत्मा अविर्भास
भासाभास माझिया .....!!

ना मी परिक्रमा
ना मी अखण्डता
वैकुंठ विहारिता
घट घट दास माझिया ....!!

ना मी त्रिमूर्ति
ना मी पंच इन्द्रिय
व्यासा विरहिता
कामधेनु मीच माझिया ...!!!

ना मी प्रत्यक्षा
न मी अविरक्ता
मिया भुत भविष्य
निरंतरची नेम माझिया ...!!

ना मी कळसुया
ना मी अपूर्ववृथा
नियतीचा भ्रम
भासे तुझी माझिया माझिया.....!!

चिमनिताई ....!!

हा खेळ ...


खेळलोच कधी न मी हा खेल
जो मनाला दाखवी आरसा ....!!

जिव ओतून टाकिला तरीही
शरीराला फरक नाही फारसा .....!!

हां खेळच निराळा दोन जिवांचा
प्रेम नाव त्याचे हा भाव मनाचा ....!!

नाते नसता असता एकनिष्ट भावना
जपते मन अन संगम होतो तनाचा ....!!

हा रोग आहे भावनांचा सीमेपार पल्याडचा
नानावती यातना सोसुनी येते ही भावना ....!!

सुंदर काही दीसत नाही सुंदरीच्या सामने
मी रडत होतो देवाकडे म्हनलो एक साकडे मागना .......!!

चिमनिताई ...!!

क्युवारी....!!(एक षडयंत्र )


मी ग्वार धास
मी आश धास
मी तिमिर धास
मी क्युवारी धास ......!!!

अन्नाताचा प्रतिक
निर्विकार प्रतिक
कण कण स्ववादु प्राघास
मी क्युवारी धास ......!!!


नयन वर्तक
प्राधर वर्तक
निरमई आस्वादु न्याघास
मी क्युवारी धास ........!!!


लतिक चमक
भासाभास आभास
कण कण आस्वादु व्याख्यास
मी क्युवारी धास .........!!!

जल निर्जळि
निक्ष्म निर्जळि
श्वाशोश्वास भ्रमास
मी क्युवारी धास ......!!

चिमनिताई ...!!

एक घागर .....!!



मी एक घागर भरली
सुखाची घागर
जी सर्वाना
हविहवीशी वाटते .....!!

मी एक घागर भरली
दुख्हाची घागर ,
जी काहिन्नाच
हवीहवीशी वाटते ......!!

मी एक घागर भरली
ज्ञायाची घागर
जी सर्वाना मान्य
नसते अशी.... !!

मी एक घागर भरली
अज्ञानाची घागर
जी फक्त आंधळ्या तराजुतच
शोभते अशी.....!!

मी एक घागर भरली
शिष्याची घागर
ही फक्त ज्ञान जीन
इतपत सिमित ....!!

मी एक घागर भरली
गुरुची घागर
यात सागराची खोली कमीच ,
आकाशाची विशालता कमीच ,
निरंतर तेवत असलेले ब्रम्हज्ञान
काही अजुनही.....!!

चिमनिताई ....!!

मी करू पाहतोय

मी करू पाहतोय
या गगनाला अजुन उंच

मी करू पाहतोय
या पाण्याला अजुन नितळ

मी करू पहातोय
या धरतीला अजुन घट्ट

मी करू पाहतोय
या शरीराला अजुन बळकत

मी करू पाहतोय
या मनाला अजुन मजबूत

मी करू पाहतोय
या जगाला अजुन मॅमथ (हत्ती सारखा एक प्राणी )

मी करू पाहतोय
या रक्ताला अजुन शिरशिरित

मी करू पाहतोय
या डोळ्याना अजुन तीक्ष्ण

मी करू पाहातोय
या समुद्राला अजुन गोड

मी करू पाहातोय
या सोन्याला अजुन येइल सुवास ...!!

मी करू पाहातोय
या स्वर्गाला शीड्या अमाप ...!!

मी करू पाहातोय
हे भंगलेलं स्वप्न खरं ...!!

मी करू पाहतोय
ही कविता लिहायचं धाडसं....!!

दयाल तुम्ही साथ ..............!!

चिमनिताई ....!!!

माझी करनी (काम )मला आवडतं ते असं


मी असाच बोलतो
काय करणार ?
मी असाच राहतो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

मी असाच मस्ती करतो
काय करणार ?
मी असा गप्प पण बसतो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

मी राज्याची स्वप्न पण बघतो
काय करणार ?
कधी भिका~याचं सोंग ही घेतो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

आता रमतय मन मंदिरात
काय करणार ?
देवा कड़े पाट करू की पोट करू
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

मला आवडते ज्ञानेश्वरी
काय करणार?
दासबोध ही हवाहवा सा वाटतो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

शोधतो कधी कधी दगडात देव
काय करणार ?
निराकाराच्या शोधात धड़पद्तो
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

मग विश्वाचीय ठाई मी होय खोटा खोटा
काय करणार ?
देव पाहि तेव्हा आन्नद होई मोठा मोठा
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

सकळ विश्वची माझे घर
काय करणार ?
त्यास नाही आकार उकार
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

गुरु सोडवी अमाप बंधन
काय करणार ?
मी त्याचा वेड़ा एक बाळ
काय करणार ?

मला बाबा आवडतं
गबाळ्यासारखं राहायला ......!!

चिमनिताई ....!!

या गुरु कृपा .....!!



गुरु कृपेचा दिधला वारा
गुरु विन आहे संत अधूरा ...!!

ज्ञान रूपा तेज हा पूरा
संत ची वाहती या ज्ञान धारा ....!!

जग कल्याणी अवतार घेतला पारा
पोलादी स्पर्श करुनी न्याहाळतो सोनारा ...!!

रूपा रूपा तुनि प्रगटला न्यारा
चंदनासम सुहासिताला घर संसारा ...!!

या विश्वाचा पालन हरता निरंकारा
पाहतो तुला आज मी या गुरु कृपा ,या गुरु कृपा .....!!

चिमनिताई ...!!

या शांततेत आता...!!


या शांततेत आता...!!
एका अश्या माणसाचे मनोव्रुत्त की जो काही दिवसात मारणार आहे

मी काही वेळ होतो सहवासात माझ्या शब्दात एक दुखः आणि पुढचा प्रवास नंतर कारण
तों जेवढा दुख्हात होता तितकाच आनंदित ही पण हा प्रवास मनाचा ........!!

सचेतनाचा वारा लागतोय
धम्मळ झालीय ही वाणी ....!!

मनी कुणाच्या भास् होतायत
कोण कुजबुजतोय ही गानी...!!

भाव विश्व त्यागले आता
काही नको न चारा पानी ...!!

तन्मय जीवन भोगून सरले
मधुर वाचा न आली कानी ...!!

अनंतेच्या वाटावरती पाठ फिरवुनी
कोण होइल का महा धनि ...!!

एकच आशा एकच तरु
मंदिर झालय हे निकामी ...!!


मंदिर झालय हे निकामी ..........!!


पहा पहा रे जीवन चक्र
फिरते आहे मागे पुढे ...!!

कोण कुणाचा कुणाला खातो
कोण कुणाला आहे भ्यातो ...!!

पाहून धरती आहे म्हणते
ये तुला मी आता समावते..!!

घाबरत तर मी वाघला ही नाही
मोकलं झालय आता हे रानं....!!

जीवन चक्र तर सुरु झालय
शरीरही व्याकुळ अन मनही घाण ....!!

चिमनिताई ....!!

अंत...!!

या शांततेत आता
मानुसाही दगावतोय ...

प्रेमाखातिरही का होईना
माणुसकी विसरतोय...

भुन्ग्याला पंख फूटता
कमळ नवे तो शोधतोय .....

जगण्याला आधार का होईना
चिखला वरी हा उभारतोय.....

पत्किला दिव्याचा पसारा
का अंगात इतका भिनतोय .....

मरन्यास तो आतुरलेला
मृत्यु शीवन्यास जातोय ....

भंगले शरीर आता
मी पोरका झाहालोय ...

या देवाकडे ही विचारन्या
त्वरा कराया लावतोय .....

माखलो मी सर्वानगातुन
जीवही परलोकी पोहचतोय .....




आता हा पसारा हवा हवा सा आहे
अंत ही जवळच टिपून बसला आहे .!!

मी मागतो मला दया नितांत झोप आता
आयुष्याच्या किनारी मी वाट पाहत बसलोय .!!

चिमनिताई ..!!

आठवण

असा मनाचा लळा लागला रे
जीवनाला सुखाचा तळा लागला रे

व्यथा सांगतो मी कथा सांगतो मी
आर्ततेच्या सुखाने गळा दाटला रे

मला पाहणारी तिची नजर येते
तिच्या पाहण्यात क्षमा वाटली रे

हसण्यात आहे निराळी मजा रे
सुमधुर तुझी वाणी पटली रे

निनादो असा घुंगरू कानी आला रे
तिने कुंकवाचा टीळा लावला रे

असत्यामागे सत्य सामोरे येते
प्रेम रोगाचा नवा शोध नावाजला रे

कवताळले आता स्वर्ग मिठीत आहे
तुझ्या नावानेच जीवन सुखी वाटते रे

जरी तू आहेस परी लांब माझ्या
यादेत तुझ्या मृत्यु गळा कापतो रे

चिमनिताई ....!!

नसतानाही ...!!


मी नकळतच तुझ्यावर
............प्रेम करत होतो

अस्तित्वाची जानीव् नसतानाही .....!!

मी नकळतच झुरत
................जात होतो

तू माझ्याकडे पाहिलं नसतानाही ......!!

विशाल सागरात एकटाच
...................पोहत जात होतो

तू तिथेही सोबत नसतानाही ......!!



आता भास् होता आहेत
ही मयफिल कधी सजली नसतानाही .....!!

जख्मा वेदानानी भरता आहेत
या डोळ्यात कधी अश्रु नसतानाही ......!!


माझ्या नभाखाली मीच बसतोय
कधीही शीत छाया नसतानाही ......!!

तू माझ्या जीवनात कधी येणार आहेस
मला जगण्याची आवड नसतानाही .....!!

मी तुला असाच सतवत आहे
तू नश्वर जगात जिवंत नसतानाही .....!!

चिमनिताई ....!!

या शांततेत आता...


एका अश्या माणसाचे मनोव्रुत्त की जो काही दिवसात मारणार आहे

मी काही वेळ होतो सहवासात माझ्या शब्दात एक दुखः आणि पुढचा प्रवास नंतर कारण
तों जेवढा दुख्हात होता तितकाच आनंदित ही पण हा प्रवास दुख्हाचा ....

या शांततेत आता
मी हरवनार आहे...!!

मोजकेच दिवस माझे
मी जगणार आहे...!!

कळुद्या मला जीवन
जे पावले आहे...!!

काळाचा घोळ सारा
मी मरणार आहे...!!

यमाचा दूत मला
आज सांगुन गेला...!!

तुझे प्राण पाहिजे
दान मागुन गेला...!!

नवे शरीर मिळेल
नवे नाम देवून गेला...!!

पुरे झाले आता
मी बदनाम आहे...!!

या शांततेत आता
मी हरवनार आहे...!!

चिमनिताई ......!!

वाईट माणूस ...


अजूनही हा पाठलाग
असाच चालु आहे

काही न उरले आज
जे मी समजणार आहे

ओंजाळ रिकामी तरीही
हा गळा तृप्त आहे

काट्यांचा ही सुहास हा
या फुला सम आहे

स्पर्शा विनाही मात्रा हा
लंगोटी चोर आहे

काय सांगू मी तुम्हाला हा
मल्हाळ पोटी आहे

मानवासम दिसणारा हा
भामटा बेईमान आहे

नको तो खरा घडा हा
मातीच्या स्वाभिमान आहे

असुनही नसल्या सारखा हा
श्वापद भावना हिन् आहे

गरज नसूनही गरजू बनुन हा
उपभोगता बनणार आहे

अश्या वासराला बैल समजुन हा
गुराखी आरी टोचत आहे

माहामारी विनाशाची प्रवृति जात हा
अविस्मरनीय कंबर खोचत आहे

चिमनिताई ....!!

मी प्राण देत आहे .....!!


बेखबर नजरांचे
वार होत आहे
मी असाच वेळोवेळी
प्राण देत आहे ....!!

नभेदले जरी हे वार
आरपार होत आहे
सवेदना मनाला
मी घाव घालत आहे ....!!

प्राणा पलिकडे शरीरही
उगाच साथ देत आहे
मी तडकलो तरीही
मुद्दाम शोषित आहे ....!!

आता न कोणी मला
नाही थांबवत आहे
जातो विलीन होण्या
जीवन उगाच लांबवत आहे ...!!

दोस्ता तुम्हावारी विश्वास
अजुन ठाम आहे
प्रेमाने केला कहर हा
मी प्राण देत आहे ....!!

मी प्राण देत आहे .....!!

चिमनिताई ....!!

असा आहे मी


स्वप्नच आले नाही ना
मग का जागतो आहे मी

लयलुट झालीच नाही
मग का झाकतो आहे मी

सूर्यच आला नाही
मग का तपतो आहे मी

मरनच आले नाही
मग का जगतो आहे मी

तू भेटलीच नाही
मग का शोधतो आहे मी

प्रेमच उरले नाही
मग का रागवतो आहे मी

उरलाच नाही किनारा
मग का वाहतो आहे मी

डुबलोच नाही आता
मग का पोहतो आहे मी

सापडे ना मग अश्व
मग का पळतो आहे मी

शरिरच नाही उरले
मग का जळतो आहे मी

चिमनिताई

प्रतीक्षा.....!!


मी वेदनेच्या हाकेन
व्याकुळ झालो होतो

तू येशील सावलीत माझ्या
मी बकुल झालो होतो ....!!

नाही गवसला किनारा
मी वाहतच जात होतो

तू भेटशील या आशेने
मी पाहताच जात होतो ....!!

लय दूर तो किनारा
संपत नाही आता

आठवण येते आहे
दुखः झाले नाथा ...!!

तो गोडवा तुझा रे
आता मी गाईला होतो

क्षण क्षण तुझ्या प्रेमाचा
आता मी पाहिला होता ....!!

अशा शांततेत आता
मन बहरून येते

तू येशील या आशेने
नयन गह्यरून येते ......!!

चिमनिताई

मी घाव घातला आहे..!!


मी घाव घातला आहे..!!

या नश्वर देहा वरती
मी घाव घातला आहे ..!!

या मनाच्या जळ्न्या वरती
मी घाव घातला आहे ..!!

या अभिमानाच्या पर्वतावर
मी घाव घातला आहे ..!!

या कर्म् कांड कामावरती
मी घाव घातला आहे ..!!

या रूप बदलत्या साखळिवर
मी घाव घातला आहे ..!!

या मनाच्या वादळिवर
मी घाव घातला आहे ..!!

या संसाराच्या मोहावरती
मी घाव घातला आहे ..!!

या अमर्यादी इच्छांवर
मी घाव घातला आहे..!!

या मानवाच्या अस्तित्त्वावर
मी घाव घातला आहे..!!

या युधाच्या शर्नागतिवर
मी घाव घातला आहे..!!

अन प्रेमाच्या या आत्म दहनावर
मी घाव घातला आहे..!!

विजयी होइन या विश्वाचा अमर्तेवर
मी घाव घातला आहे..!!


या मानवाच्या जन्मावरती
मी घाव घातला आहे कारन......

या नश्वर देहा वरती
मी घाव घातला आहे..!!

चिमनिताई ......!!

ही कवीता

कतिही प्रयत्न केले तरीही येते ही कवीता
कल्पने कल्पने ने वाट दाखवी ही कविता

काय सुचावे काय रुचावे तर ती ही कविता
भान हरवावे की हरवून जावे ती ही कविता

शब्दांची साखळी बनवते ती ही कविता
स्वताहुन गुम्फते तर ती ही कविता

मनाचा खेळ सारा मनाला दाखवते ती ही कविता
कवीला आपल्याच बंधात बांधते ती ही कविता

ज्या मनाला वाळवि लागते तिथे उमलते ही कविता
मना मनाचा संवाद घडवते ती आपलीच कविता

चिमनिताई ....!!

Sunday, August 31, 2008

देवाला कुठे शोधतोस रे ...!!

राम नाम चा गजर करा रे
कशाला हुशारी मिरवतोस रे ..
कच्या मातीचा मनाचा बंगला
क्षणात विर्घळुन जाई रे ....!!

ब्राम्हण आहेस ,स्नान करतोस
पुरानाही तू वाचतोस रे..
सर्व काल तत्पर असून
देवाला कुठे कुठे शोधतोस रे ...!!

जोगी होवून जटा वाढवतो
सर्व काळ आनंदी असतोस रे..
डोक्या वर्ती हाथ धरून
देवाला कुठे शोधतोस रे ...!!

मानभावाच पगडा घेवून
काळे वेश धारण करतोस रे..
दाढ़ी मिशा ,वाकडी काठी मिरवतोस
देवाला कुठे कुठे शोधतोस रे ...!!

मुसल मान असून बाक देतो
हा देव काय बहिरा आहें रे..
मुंगीच्या पायात घुंगरू वाजतात
हेही देव एकतो रे .....!! देवाला कुठे कुठे शोधतोस रे ...!!

जंगम असून लिंग घेवून
घरा घरा तुन फिरतोस रे..
शंख वाजवून भिक्षा मागतोस
देवाला कुठे कुठे शोधतोस रे ...!!

एकरे मानवा ,मी नाही साधू
मनात जपाची कीर्ति करतोस तर..
अंतकरनातुन तोही प्रकटतो ..
त्याचीच भक्ति करतोस तर ..

देवाला तू आणि देव तूला पाविल रे ..........

समदा इचार करा ...!!


मी ओलावलोय आता
.......... पूर्ण पने...!!

आठ्वन तर येणारच ना
... अशी अध्येमध्ये ....!!

मग का थांबू मी
...माझ्या अश्रुंना ...!!

वाहुदेत त्यांचातरी काय दोष
.....सुखतिल बिचारी ...!!

परावृत्त आहोत आपण
... ख~या देवापासून..!!

म्हणतो गुरु ब्रम्हा ,गुरुर विष्णु
..... गुरु साक्षात पर्ब्र्म्हा ...!!

तरीही ओळ्खत नाहित
... आंधळे सर्व ...!!

तुकाराम , पंढरी राजा ,कुठे आहात आपण
........... कोणती पंढरी ..!!

वैकुण्ठ वासी , विमानाने गेले
... कोण , ते इमानाने गेले ..!!

मावुली ,त्यांचा ग्रंथ ज्ञानेश्वरी
....रसपूर्ण ,भावपूर्ण ..!!

मुस्लिम भाषेचा वापरही नाही
...अन तितकाच तों पाक ...!!

मग शोधा असा गुरु
... जो दावी परमेश्वर ...!!

तात्काळ करी आपल्या सारखा
.. नाही काळ वेळ लागी त्यासे ....!!

मला भेटली नाही...!!


मनाच्या काळ्जाचा ठोका
चुकला नाही
मी तर तूला भेटलो पण तू
मला भेटली नाही...!!

फिरत होतो तुझ्या साठी
पण पत्ता भेटला नाही
ठंडा प्यायला उभा राहिलो
पण पानिहि भेटले नाही ..!!

घर विसरलो ,दारही चुकलो
रस्ता भेटला नाही
प्रेमा खातिर भुरळहि पडलो
पण तू मला भेटली नाही ...!!

तुझे वडिल भेटले त्याना विचारले
हा पत्ता भेटला नाही
ठोकून काढले चोपून काढले
असा मत्ता भेटला नाही ..!!

विसरलीस तू मला आता कारन तू
तूला भेटलो नाही
पण आठवेल मला तों क्षण जेव्हा तुझा
मत्ता सोडून तू भेटली नाही ..!!

मी असा कसा...वेडा वाहत गेलो ..!!~~


नाम नामात गेलो
काम नामात गेलो ,
मी असा कसा
वेडा वाहत गेलो ..!!

जरी अडकलो
बुध्या लागुन
मी असा कसा
वेडा वाहत गेलो ..!!

थेम्ब थेम्ब
पाण्याचा गळलो
मी असा कसा
वेडा वाहत गेलो ..!!

कधी लाह्या
बनुनी फुट्लो
मी असा कसा
वेडा वाहत गेलो ..!!

तुम्हा वाचून मी
आहें दगलो
मी असा कसा
वेडा वाहत गेलो ..!!

मनाच्या त्रासापासून
मी आता तपलो
मी असा कसा
वेडा वाहत गेलो ..!!

पंच महाभूतानि
मी आहें वेधलो
मी असा कसा
वेडा वाहत गेलो ..!!

मी असा कसा विरंगुळा~~~!!


मी असा कसा विरंगुळा
मला नाही माझा ठाव ठिकाणा ..!!

कोणी सांगेल का मला
कलूद्या माझा ठाव ठिकाणा ..!!

गूढया न गूढया घड्या घालतो
माझ्यावर नाही कोणाची छाया ..!!

आंथरुन् पाहून पाय पसरतो
माझ्यावर नाही कुणाची माया ..!!

भूंगा होऊनि मी जातो आहे
कमळामध्ये भूक विझविण्या ..!!

कुणी पाहु नका मला डोळे मिटुनी
मांजर होऊनि दूध पिण्या ..!!

अंधारात प्रकाश शोधतो
गूढ उकलतो ,प्रकाशाविनामी ..!!

मोजकेज बोलणे माझे सांगतो
लिहतो खोडतो ,लेखणिविनमी ..!!

अंतराळात कधी हरवतो
कधी सूर्य कधी चंद्र बनूणी ..!!

प्रेमा खातीर धडपडतो आहे
कधी बाण तर कधी तीर् बनूणी ..!!

मन हे माझे सांगत असते
शूर वीर मी या धारतीतला ....!!

कधी भाग्यातुन कधी लेखणीतून
घडवित असतो मी स्वतःला ..!!

आई


मायेच्या श्वाशातला एक प्रकाश
नकळत ~हदयाला लागुन राहतो ..!!

ठेच लागते बाळाला तेव्हा
आईच्या काळजातुन आवाज येतो ....!!

स्वताच्या ममतेच्या आश्रयाने
तोंडातला घास त्या पिल्लाला देते ...!!

जगावेगळि अशी ती जिच्या साठी
देवही अवतार घेवून तिच्या उदरी जन्मा येतो ..!!

मानवाला असा हा आशीर्वाद निर्मित्याने दीला
ज्याने ज्याने जन्म घेतला तोचि तोचि धन्य झाला....!!

उपकाराची जाणीव ठेवा आईच्या त्या ममातेशातिर
काळिज काढून देइल ती तुमच्या वरच्या प्रेमाखातिर ..!!

................


स्वप्न माझे मीच लिहतो मला आता काही नको
येता जाता हात वारे ,पाहुणचार तर मुळिच नको !!

अति विषयता भर भर येते ,जिवाजिवाची हानि होते ,
चला तर आता ध्यास धरुया, एकोप्याने बळ ही येते...!!

मुक्त होवुया फिरन्या साठी झटपट , झटपट मार्गी लागरे ,
क्षणात आवरा सारी कामे , या देवाची आम्ही लेकरे ....!!

स्मरण करा रे या अविनाशीचे,मनन करा रे या देवाचे
भाग्य उजळेल तुम्हा सर्वांचे , सतकार्य होइल या देहाचे....!!

दर्शन घेता या देवाचे ,कळेल सारी माया होती
दीसणार ते नासणार होते , सदगुरुला शरण जाती..!!

.......................

विचार च करत राहिलो
जानेवारी कधी संपला
तेच पाहत राहिलो .....!!
महिन्याच्या शेवटी पाहिलं
जीव वेडाकासा झाला
काहीतरी म्हणेन म्हणुन राहिलं ...!!
फेब्रुवारी ,मार्च असाच गेला
ओळ्ख व्हावी म्हणुन
मी मित्राला नेला ..!!
एप्रिलला माझी चांगलीच ओळ्ख झाली
कधी भांडन कधी तंटा
गोष्ट मोठी होत गेली .....!!
में महिन्यात ती ज़रा जवळ आली
जून आला आणि गेला
जुलै पावसात भिजुन नेला ...!!
ऑगस्ट महिन्यात तिला फिरायला घेवून गेलो
सेप्टेंबरला तिनं मला नेलं
एकाच नारळाचं नळि घालून पाणी पिलं ....!!
ऑक्टोंबर मध्ये ती हवीहवीशी वाटली
नोव्हेंबर मध्ये एकदम नाहीशी झाली
मग डिसेम्बर ला घरीच भेटली ....!!
म्हणते कशी वरीस निघून गेलं
तूण काय भी नाय दावलं
म्हणुन आता मीच दस~याला हेरलं ...!!

Tuesday, August 26, 2008

कवी कल्पना...!!

कॉलेज ला होतो १/५/२००३ ला तेव्हा कॉलेज मध्ये एक मुलगी होती
"कल्पना " तिच्या साठी लिहली होती ....

निसर्गाच्या सानिध्यात
निसर्ग आपला सोबती
मी तिचा होतो
आणि ती माझी होती

जिथे जिथे जात होतो
तिथे तिथे येत होती
कधी पुढे येत होती
कधी मागे राहत होती

मी करायच्या आधी
तीच करून टाकत होती
बोलत नव्हती ,हसत नव्हती
फक्त माझ्या बरोबर येत होती

मी तर तिचा होतो
आणि ती माझी होती
तों तर मी होतो आणि
ती माझी कवी कल्पना होती

chimnitai......!!

ती कवीता..!!


नाचते ..ती कवीता
नाचवते ..ती कवीता
धड़पड़ते ..ती कवीता
पाडते ...ती कवीता ...!!

दात दाखवते... ती कविता
अश्रु गाळते ..ती कवीता
संभाळते ...ती कवीता
नासवते ..ती कवीता ...!!

मन हलके करते ... ती कवीता
स्वप्नात घेवून जाते ...ती कवीता
विचार कारायला लावते ..ती कवीता
संपून उरते काहीशी ...ती कवीता ....!!

आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी
लक्षात आणून देते ...ती कवीता ...!!
मोठ्या घटना सक्श्य्म पने
उभेहुब मांडते ... ती कविता....!!

जेवढे काही कमी लिहू... ती कवीता
जेवढे काही जास्त लिहू ...ती कवीता !!

एवढे लिहून थांबवतो मी ..ही कवीता
पुढे काही सुचत असेल तर लिहा तुम्ही ..ही कवीता !!

chimnitai.....!!

माझी वही...!!


काहीतरी हवं होतं मला
शोधते आहे, भेटेल
अ रे हो वही,कवितांची .....!!

बरेच दिवस गेले
आता संपले, अश्रुही
भावना जपून ठेवलेल्या ,अलगदपने ....!!

अचानक समोर आल्या
जळलेल्या दारिद्राच्या,कल्पना
दूखाने गुर्फटलेल्या, यातना ...!!

कधी विचार ही केला नाही
असे होइल ,विद्रूप
काळजापर्यन्त घाव ,पोखरलेले...!!

सर्वं काही इथेच होते
दृष्टिला येणारे ,समोरच
त्यालाच कवटाळुन बसली ,आलिंगानात ....!!

चिमनिताई ......!!

Saturday, August 23, 2008

मला आता काही नको .....!!

मी असाच राहणार आहें
बिन पावलांचा ,
नेहमी शर्यतीत पहिला येणारा ......!!

मला कोणाचा खान्दाही नको
सहारा देणारा ,
वेशीवर टांगलेल्या सम दिसणारा ....!!

भावनांच्या मर्यादाही नको
पिंजर्या सारख्या ,
उड़ता न येना~या पकक्षा प्रमाने....!!

वेदनांचे घाव ही नको
भरून न निघनारे ,
सदैव कळजाला त्रास देणारे ....!!

फुलाचे आयुष्य ही नको
कोमजुन जाणारे ,
आज सुगंध देणारे उद्या नाहीसे होणारे ....!!

हवा तों अन्नत काळ
जो जगतो आहें ,
एक एक क्षण प्रभूच्या स्मरणातला .......!!

chimnitai.....!!

तूला कसा वाटतो....

सांग सखे मी तूला कसा वाटतो
चम् चमनारा चमन वाटतो
का तार्यांमधला यमन वाटतो
सांग सखे मी तूला कसा वाटतो ......!!

भुत काळातला गम्प्या वाटतो
का भविष्यात्ला चम्प्या वाटतो
अमन शांतीने कधी पेटतो
सांग सखे मी तूला कसा वाटतो.....!!

मनात तुझ्या भरलो कसा
कापूस पिंजुन ठेवलाय जसा
चंद्राचा चा तों दाग खटतो...
सांग सखे मी तूला कसा वाटतो .....!!

पाण्याची ती घागर घेवून
नक्षत्रांचे पांग फेडून
सुन्दर दिसन्या मी आहें नटतो
सांग सखे मी तूला कसा वाटतो .....!!

भूतान मधला वेताळ वाटतो
का राजा मधला विक्रम वाटतो
मर्द जातीचा कळा ठोकतो ...
सांग सखे मी तूला कसा वाटतो .....!!

प्रकाशातला दिवा वाटतो
का अंधारात्ला पत्की वाटतो
नाण्याच्या दोन बाजू कुटतो
सांग सखे मी तूला कसा वाटतो .....!!

मनात गुंतुनी मन ही नेतो
भाषा मधुर वाणी गायतो
कधी खद्कन गम्मत पटतो
सांग सखे मी तूला कसा वाटतो ..... !!

chimnitai....!!

कोणासाठी ....!!

कुना न सांगू मत माझे
हे तुझ्याच साठी
कुना न भावे मीच माझा
मी तुझ्याच साठी ...!!

लोका न पावे गर्द तयाचा
हा कोना साठी
क्षमेत चालतो भुरळ पाडन्या
कोट्यान कोटि कुणासाठी ...!!

पहिला जिव या सॄष्टिचा पाहिला
न मी कोणासाठी
तुलाच पाहीले देवा आता
हे सर्वे काही कोणासाठी ....!!

जीवन जगण्या अन्नपाणी
जगणे ही कोणासाठी
वारा न वाही झोक्याचा
प्राण वायु कोणासाठी ...!!

मत्स्य तरंगी जलधारा ती
श्वास घेतसे कोणासाठी
अमृत्वाचा लेनी तिची
श्वास सोडतासे कोणासाठी ....!!

श्वापद निर्मित मांस हारी
अमिर्भाव हां कोणासाठी
जिवंत राहने धेय्य ऐकले
जगणे मरने कोणासाठी ...!!

पापाची ही दुनिया सारी
पुण्य घेतले कोणासाठी
नरकाचे आसन मीच होइन
नर्क असावा कोणासाठी ...!!

जीवन जगण्या आत्मा समर्थ
देव पाहि कोणासाठी .......
जीवनाचे या कल्याण करण्या
सदगुरु आलाय तुम्हासाठी ....!!

chmnitai....!!

Saturday, August 16, 2008

मन ....!!



संध्याकाय होस तुले काई नई ठाव
तुन् मन गाडं हाकसं त्याले नाही काय पाव ......!!

सकायना पहाट्मा तुना संगे चाले रे प्रकाश
वारा देई तुले पिंगा तुना माथावर आकाश ....!!

तुन्ह मन चपय , नाही ख़ास चारा पाणी
उडे चिडिना मायक त्याले लाव्रे वन्गय वाणी .....!!

सारा श्रुष्टिना पसारा याद करस हाई मन वरमान
कधी धाड्शी त्याले गणक सुख समाधान ....!!

देवा पाहशी का रे आणि धाड्शी समाधान
तवय पाह्सू मन म्हणा डोक्यावर तुन्ह वान....!!

chimnitai...!!

माणूस ...!!


जीवन शेइली बदलत जाई
जाई बदलत पद्धत
घनगोर अंधारात जो उभा राही
ही ज्याची त्याची पद्धत .....!!

सापडे नाही किनारा त्याला
तों म्हणे प्रतिबिम्ब्ची माझे घर
मध्यावर्ती सापडल्यावर
तळ ही चाखी समशानाच्या वर ....!!

आपूर्त काळी वेळ ही होती
समजुन घेतले अवकाशाला
नाही आता कोण समजावेल
काल युगातील समाजाला ....!!

पुर्तिची ती वेळ निराळि
परंपरेचा दिधला वारा
माणूस झाला जनारान्सारखा
आता तोडून खाई चारा चारा ....!!

मानसातू शक्ति मान तू
बांधू न शकला नयनाना
आता रडतो वर्तमानाला
का शोधतो आहें भुतयान्ना ......!!!


chimnitai...!!

Wednesday, August 13, 2008

चालले आहेत प्रयत्न



चालले आहेत प्रयत्न
आज बैल घ्यायला निघालेलो
बैल काय गाढव सुद्धा
घेतले असते नाइलाजास्त्व.....!!

कामाजा बोझा झेपत
नाही म्हणतो आता
बैलाचे काम गाढवच
करील आता ....!!

सोयीस्कर रित्या
पार पडेल माझा हंगाम
नाही तर आहें
छोटा- मोठा फटका ......!!

गड़बड़ घोटाला नको म्हणुन
आज चश्मा लावून जातोय
बैलच हवा आणि गाढव नको
असे निरखून पाहतोय....!!

chimnitai.....!!

Sunday, August 10, 2008

आज भलतच आभाळ भरून आलय


आज भलतच आभाळ भरून आलय
जसं डोंगरावर रान उभं राहलय.....!!

शरीराच्या पिंजर्यात मनाचा पक्षी आलाय
जसा झाडाचा एक भागच वाकलाय......!!

जुम्पलेलं नांगर शेती वखारायला लागलय
जसं बैल शेतीचा भागच बनुन राहलय....!!

गर्दीच्या गोंधळाला मस्तिच बळ आलय
जसं माजलेल जनावर शिंगान्वर खळ आलय ....!!

शरीरातल्या मनावर पिजर्याचा झळ आलाय
आत्मा निघेपर्यंत बस आता मात्र पाण्यालाही नळ आलय.....!!

chimnitai.........!!

माझं मनातलं प्रेम ......!!



प्रेमात कसं विसरु मी
मला मिळालेल् एकट पण ,
तुला नाही का वाटत
तुला खातय तुझं हे जागतं पण ....!!

डोळ्यावर आलेले पाण्याचे थेम्ब
ही माझीच साक्ष देतात .
तुझं माझ्यावर प्रेम आहें
हे निश्ब्द्च सांगतात .....!!

तू थोडासा नखरा करायचा
नजर वर करून पाहायचा
मनातल्या मनात लाजायचा
आणि मी त्या +
सोनेरी क्षणाचा आस्वाद घ्यायचा .......

वाटतं तुझा हाथ धरून उभं रहायचं
तुझ्या पावला मागं पाउल टाकायचं ,
नकळत तुला गालावर स्पर्श करायचं
आणि तू गालातल्या गालात हसायचं .....!!


chimnitai...!!

तूच तू........ !!


नयनात लपलास तू
र्हुदयात बसलास तू
स्वर्ग पाहिला क्षणाला
दिप विझवून बसलास तू ....!!

असा का रे तू
मोहरलेस मलाच तू
आठवतो पदोपदी
याद कळ्याचा संग्रह तू ....!!

पहाटीचा चंद्र तू
उगवतिचा सूर्य तू
रूप तुझे तेजस्वी असे
फुलांचा राजा कमळ तू ......!!

लक्षावधि तारका तू
अगणित मन्डलाय तू
सुन्दर स्वप्न दाखवणारा
मनामनातला दिग्विजयी तू ....!!

मांगल्याचे प्रतिक तू
आरतीचा समूह तू
अनंत काळ जळनारा
समईतला प्रकाश तू .....!!

वेदातले शब्द तू
ग्रंथातले शास्त्र तू
जमवलेला इतिहास तुझा
भविष्यातला संगणक तू ....!!

अविनाशी अंत तू
अविभाज्य घटक तू
कोटि कोटि प्रणाम करतो आता
सूक्ष्म कनांचा अधिराजा तू ....!!

आतहि तु
बाहेरही तू
चाहू कड़े आठहि दिशा
अंतर बाह्य तूच तू

उकलहि तू
गुढ़ ही तू
नित्य राम तुझ्यात हा
नियतीचा शामही तू ....!!

chimnitai..........!!

Friday, August 8, 2008

वाढदिवस् आहें या निमित्त आजचा दीवस गुरु के नाम



काळाचा बादशहा म्हना
अथवा समय चक्रका जाल
नाही मी वाढलो आहें
पांघरून वयोमर्यादेची ढाल ....

एक एक करता वाढत आहें
वाढत जाते माया जाल
जगतो त्याला मरण ही आहें
मित्रची असते त्याची खाल .....!!

आजचा दीवस कसा असो
माझ्या साठी एक ठसा असो
मी तर म्हणतो गुरु हा माझा
सदैव माझ्या समोर असो ....!!

निरंकाराची शपत मला
सरले आयुष्य येइन पुन्हा
सामिल होन्या तुझ्या रुपात
मिटवशील् तूच माझा गुन्हा ....!!

बाबाजिच्या चर्नावर आलो
नतमस्तक जेव्हा झालो
परम पित्याचे दर्शन घ्यालो
निरंकाराशी साक्षर झालो ...... !!

चिमनी ताई

नवा प्रयोग



काहीतरी असं जे
मनाला पटतय ,
काहीतरी असं जे
करावसं वाटतय.....!!

चवऱ्यांशी लक्ष्य योनी
फिरलो आहें ,
म्हनुनच मानव जन्म
प्राप्त झाला आहें .....!!

ह्या जीवनात एक
नवा प्रयोग
जीवनाचा एक
नवा आयोग ....!!

विचारांच्या पलिकडचि
विचार द्रुष्टी ,
नव तारुन्याची
परम्यात्त्माची नवी श्रुष्टी ....!!

अनेकता पाहून विभागले
हे मन ,
एकता हावी
म्हणतात सर्वजन....!!

आशा नव्या प्रयोगाचा
नवा प्रकाश ,
मानवाचे सुन्दर मन
अन सुन्दर आकाश ......!!

व्यकुळतेच्या अभ्यासातला
नवा जीव आरम्भेचा
कल्युगाच्या पाठी आहें
भाग्याचा प्राराम्भेचा ......!!

भले अन वाईट
नाण्याच्या बाजू दोन ,
भले ते माझे मन
वाईट बाजू कुणाचे कोण ...!!

सर्व बाजूंनी वेढले
मतिमंदांच्या रेशानी
नवा प्रयोग साकारला
एका कवितेच्या आशांनी.....!!

चिमनी ताई

Tuesday, July 29, 2008

नवा सूर्य........



सावल्यांच्या चांदनित
एक प्रकाश उजाडला
मोकळ्या फुलांत आता
नवा दीप बहरला.....!!

पुर्वीचा रूप खरा
मुक्याने वाचाळला
आभास हा असाच हा
चहुकडे पसरला .....!!

मानवतेच्या पुरातला
महापुर कोसळला
चंद्राच्या गुनातला
नवा चेहरा आज उजाडला ....!!

नावाच्या घोळातला
पवन सूत अवतरला
प्रेमाचा शोध त्याने
नकळतच लावला ........!!

चिमनी ताई..........!!

Tuesday, July 22, 2008

बदलणार..... आणि नाहिपण



येतात आणि जातात
बदलत राहतात ,
ऐका मागोमाग एक
नशीबच बनुन वागतात.......!!

तीनच ॠतु
आयुष्यात पण येतात
तिन पगड्या घेवून
विरून जातात ......!!

बाल पनापासुन तरुण
वयापर्यंत काहीच कळत नाही ,
तरुण पन गेले की
म्हातार्पनात ही काहीच कळत नाही ,

बालपन म्हणजे
पावसाळा असतो ,
हिवाला ,उन्हाला तरुण
म्हातार वयात येत असतो ....!!

ॠतु बदलतात
आणि आयुष्यही बदलणार
बदलत नाही तों
ह्या स्रुष्टिचा घडवणार......!!

जो ॠतु ही घडवतों
आयुष्यही घडवतों ,
धावतो ,पडतो
आपल्या बरोबर धडपडतो....!!

पुन्हा ह्या जीवन
चक्र्कात आणून सोडतो ,
तोच तों, बघतो ,
हसतो आणि रडवतो ....!!

तरीही कळुन आणि
वळुन न कळाल्या सारखं ,
गुंत्यात गुंता पडल्या वाणी
सुट्ल्या सारखं

तरीही काळाच्या ओघात
सर्व काही वाहून जाते
माणूस विसरला
तरीही जीवन चक्र तसेच रहाते

.....!!.......चिमनिताई .....!!...

वाट पाहते.....

पुन्हा नवे वेड
आणि नवा खेळ
स्वप्नाहून सुन्दर रानी
एक राजा याचा मेळ....!!

स्वप्नातच होती
तेव्हाच उचलून नेले
अजुन शुद्धा नव्हती
म्हणुनच मनही गेले ...!!

पर्क्याच्या हाथी
नाचवतच होता
जसं सांगेल तसं
मीही खात होती गोता ....!!

तरीही राजकुमारच्या
आठवणीत एक एक दिवस
एक एक रात्र
आणि मग रात्र आणि दिवस ...!!

दिवसामागून महीने
तरीही तो नाही वाहत
मी तशीच होती
त्याची आतुरपने वाट पाहत ..!!

नाही येणार का
मला न्यायला आता
तरीही मी वाट पाहीन
शेवटपर्यंत जाता जाता ....!!

तरीही तुझी वाट पाहीन
तुझं गीत गाइन
श्याम आणि संध्या
तुझच ध्यान करीन ...!!

.....!!.......चिमनिताई .....!!...

Saturday, July 19, 2008

आज पहाट जहाली.

आज पहाट पहाट आज पहाट जहाली.
स्वप्न अमृताचे गोड मनी हरवून
...................आज पहाट जहाली.||

स्वप्न म्हणता म्हणता कवा कवडस् हे आलं
पाहताच अंगनी माझ्या मन चांद्न्यांच गेलं
गोड शब्द शहारून आज पहाट जहाली !!

मधुर आवाजाने सकाळ बहरून गेली
सोन चाफ्या कळ्यानि नभ कहरून आली
स्वप्न सुन्दर म्हणताच आज पहाट जहाली !!

हरी नामाच्या गजरान नाद मनोमनी आला
पुश्प्काच्या चंदनानी नवा दिवस वुजाडला
मोहिनिने मोहरून आज पहाट जहाली !!

असाच देवा तू रोज सामोरी येना
यातना विसरून मला तुझ्यात विलीन करना
तुझा भाव मनी राखून आज पहाट जहाली !!

..................चिमनी ताई

Friday, July 18, 2008

राम ही मीच


राम ही मीच

राम ही मीच
सीता ही मीच
तू शोधू पाहते
तों रावण ही मीच

क्षणा क्षनाला
रूप बदलतो
रावनातला
राम ही मीच

मित्रत्वाचा
मित्र मी
सखा सोबती
राम ही मीच

पुष्प कळ्यान्च्ये
पान ही मीच
खोड़ काटे
राम ही मीच

नेत्रुत्वाच
नेत्रा ही मीच
भूया न पापण्या
राम ही मीच

तुझ्या सारखा
समरूप ही मीच
एकरूप नाही असा
राम ही मीच

शाश्वत आत्मा
पर्भ्र्म्हा ही मीच
पन परमेश्वर नाही
राम ही मीच

चिमनी ताई

Thursday, July 17, 2008

पावसाळा

उन्हाळ्यात असतो ,उन्हाचा सळ्सळा
हिवाळ्यात वाटतो ,थंडीचा कळ्कळा
पावसाळ्यात मात्र काही तरी असते
थंडी ,उन ,पाउस सर्वच वसते

पावसाळा आला की गमतच असते
गम्मत के जम्मतच असते
नदी, नाले तुडुम्ब् वाहतात
अनेक आनद सुखाने नाह्तात

झाडे सर्वच अंघोळ करतात
फुला फ़ळानि टवटवीत दिसतात
नविन वस्त्र धारण करतात
जणू कुठेतरी फिरायलाच जातात

चिमनिताई........

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
कोण जाने ,बट्ट त्याना हाथ मा शे !!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
मी करसु तवयच हुइन ,जे मना मनमा उमजी र्हायन !!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
हाई काई माती धनधान्य देस ,गुराढोरासले भी खावाड्स !! पन
माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन !!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
आज वाटन हाई धरतीच मणि माय शे !!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
हाई धरती आपलं पोट भरस,पाणी भी हाइच पाजस !!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
मी राबसू ,काम करसु ,माले मालुम शे !!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
मी अनाड़ी माणूस ,लिखता वाचता गनक्च एस माले !! पन
माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन!!

माले खबर नव्हती ,मन् नशीब कवय खुलिन
जवय मी अहीरानी भाषा मा कविता करसु
तवय्च मन नशीब खुलिन ,ते आज व्हयन्न!!

चिमनी ताई........

Wednesday, July 16, 2008

...............................

आज एकटाच होतो मी
आणि तोच रस्ता होता ,नेहमीचाच

सारखा मागे वळुन पाहत होतो
ती हाक मारेल या आशेने ,आक्रोशाने

आठवत होते तिचे शब्द
मनाला भिड्नारे पूर्ण पणे, शीर्षेद

धक्काच तसा लागला होता
मन ही सावरत नव्हते ,घायाळ

मी तिचाच होतो
केसा पासून नखापर्यंत , अक्खा

चालतच जात होतो
रस्ता संपेपर्यंत ,खुळा

विचार ही करत होतो
पुन्हा होइल का भेट ,वाजवी

डोक्यात प्रकाशाच पेटत नव्हता
तेच विचार पुन्हापुन्हा , भंडावलेले

कारन नुकताच आलो होतो
आग लावून ,चितेला

पुन्हा नाही भेटणार
या आशेनेच गेलो होतो, शेवटचा

निराकार प्रभु


निर्विद्लेल्या हातानी
वंदन करते तुजला
तू महारती निरंतरा
निर्विज निरंतर मजला !!

तू स्वताः परभ्रम्हाः
कृष्णा ,विष्णु नयना तू
नाम तुजे निरंतर
चाले पंढरपुर तू !!

मज आवडे प्रकाश
हा काळोख्या रात्रीचा
विठू माझा चमत्कारी
वेथ वाचे शात्राचा !!

विश्वास माझा सदगुरुवरि
तुला पाहता मी झाले सुखी
रूप तुझे हे निराकार
निशब्द ठेव आले मुखी!!

...................चिमनी ताई...............

Thursday, July 10, 2008

निराकार प्रभु

[teal]निर्विद्लेल्या हातानीवंदन करते तुजलातू महारती निरंतरानिर्विज निरंतर मजला !!तू स्वताः परभ्रम्हाःकृष्णा ,विष्णु नयना तूनाम तुजे निरंतर चाले पंढरपुर तू !!मज आवडे प्रकाशहा काळोख्या रात्रीचाविठू माझा चमत्कारीवेथ वाचे शात्राचा !!विश्वास माझा सदगुरुवरितुला पाहता मी झाले सुखीरूप तुझे हे निराकारनिशब्द ठेव आले मुखी!!
...................चिमनी ताई...............

Saturday, July 5, 2008

चिमणीचे प्रेम........

नाम
घेइन
मुखाने
तू
राहा
सुखाने
वाट
परतीची
पाहणारे
शोधती
तुजला
सारे...!!

तू
कोवळा
सांजवात
मी
पक्षीन
नभात
तू
देहात
हातात
निरंतर
देमजला
साथ...!!

विलक्षण
शक्ति
तू
दिसाचा
सूर्य
तू
रात्रीचा
चन्द्र
तू
प्रेमाचा
गुलकंद
तू...!!

प्रात
कालप्राजक्ता
वेचते
तुजे
रूपनयनी
आठवते
नित्य
तुअसाच
राहा
तुला
ऒजळीत
साठवते ...!!

... चिमणीताई....

स्वप्न.........!!


तुझ्या डोळ्यामध्ये पाहीले मी ,
विश्व माझे स्वप्नातले ..!!
स्वप्नात तूच होतीस ती परी,
भाव तुझे मनातले ....!!

लेवुनी बंध माझा काळ्जाचा
हाथ तूच रोखला ....!!
स्पंद चालु लागला सराईत
प्रेमाचा गंध हा चाखला ...!!

सेरबैर झालो राणी
प्रीत तुझी जेव्हा मिळलि ....!!
रातरानीच फुलली अंगनात
मंत्रमुग्ध मन् खीळलि ....!!

चाहुल होताच शुद्धा हरपलो
पाहुलागलो तुलाच ग.....!!
स्वप्न माझे तुटले हे
कळले नाही मलाच ग ...!!

...

ღ चिमणीताईღ

Thursday, July 3, 2008

कुणी नाही बोलत नाही माझ्याशी.....

कुणी नाही बोलत नाही माझ्याशी......

(2002)मद्ये ..........
मी दहावित होतो आणि काही कारनामुले
घरातून निघून गेलो होतो ,आणि २ दिवसानी जेव्हा
मला घराची आठ्वन आली तेव्हा परत घरी आलो
पन माझ्याशी कोणी बोलत नव्हते ,तेव्हा २० मिन्तात ही कवीता लिहली आणि
सर्वाना वाचून दाखवली ,आणि happy ending......

...................................................................................


कुणी नाही बोलत नाही माझ्याशी
मनाला वाटते खंत,
होइल माझा कदाचित एकदा
या जगातुनी अंत !!

सर्वे रुसले आहेत माझ्याशी
झाली माझ्याकडून अशी चुक ,
जेवण पन कोणी नाही विचारत
मला लागली आहें आता भूक !!

होता एक मित्र अपुला
तोही गेला रुसाया ,
कुणीच नाही आले
माझे अश्रु पुसाया !!

क्षमा मागुनि नाही बोलत
अशी ही सगळी मानस,
क्षमा करा तुम्ही मला
आहें एक स्वप्न छानसं !!

पुन्हा नाही होणार हो
अशी चुक पप्पा ,
आता तरी बोलाना
मारा माझ्याशी गप्पा !!

आई तू तरी बोलगं
मन हलकं कर गं,
माझ्याशी खेळ गं
रडू नको येवू देवू गं !!

दादा तू तरी सांगना
मी काय करू ?
पुन्हा दारी उभा राहू
का असाच मरू !!

बस बस बस

कुणी नाही बोलले माझ्याशी
मनाला वाटली खंत ,
झाला माझा नक्की आता
या जगातुनी अंत !!

चिमणीताई

..........आठवण..........!!

..........आठवण..........!!

आठवल्या त्या रिमझिम धारा
कोमल भेट टी फुलासारखी ,
तुटुन पडली विज़ माझ्यावर
बहरली ति चांदण्या सारखी !!

भर दुपारी आभाळाला
छेदले होते तार्यानी ,
थंडगार तो वारा लागला
वेढले आहें सार्यानी !!

आठवली ती भेट मला
ओल्या ॠतुच्या स्पर्शाने ,
ओला देह शहरला आता
तुझ्या एका छोट्याश्या हरषाने !!

तुझ्या प्रीतिची ओढ़ लागली
मन झाले होते व्याकुळ,
तुझ्या लालिचा गंध वेचता वेचता
मीही झालो होतो बकुल !!

भावनं।नी मनातून माझ्या
ही एक कविता रचली होती ,
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती!!

चिमणीताई

एक सूर्य तो मालवला

एक सूर्य तो मालवला

आकाशात भ्रमण करणारा एक पक्षी ,जेव्हा पिंजर्यात अडकतो ,
स्वताचा जीव त्या पिंझर्यातुं मुक्त करण्या साठी रक्त बम्भाळ अवस्तेत
तो पलायन करतो आणी पारधी कडून मारला जातो आशीच एक
पक्ष्यावर ही रचना केलि आहे...........

...............................................................................
...............................................................................

तीक्ष्ण नजर ,सळपातळ बांधा
चाल बोलकी तोर्याची !!

वाट अवघङ,पूर्ण डोंगर
रूप माझे मोहरती !!

मनात्त माझ्या , नाचती मोर
रूप चांदने तेजवती !!

अड्कला जीव् ,पाह्न्यात ड्रुश्य
झेप् घेतली कारव्याने !!

नाम तयाचे , घेतले मुखी
धुंद बेधुंद पिंजर्यात अडकला परवाने !!

पिंजरा तोडीला ,मुक्या पक्षानी
धाव घेतली घरा कड़े !!

शोधित आसरा ,पान फुलाचा
सुगन्धित दरवले चहुकडे !!

कुण्या चोराने,चोरीला हेतु
सूर्य मालवन्या मनाच्या आधी !!

तिथेच लागली,आज तयाची
अंतिम राख समाधि !!

तेजाचातो अस्त,नयन कुंजिता
विरहं चुम्बुनी आळ्वला !!

प्रखर तेजाचा ,तेज अग्नीचा
सूर्य आज तो मालवला!

चिमणीताई

तो काल दृष्टी योग मी पाहून आलो...........!!

तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

उभा समोर मुत्यु तो मी पाहून आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

रक्ताच्या वेदनेत मी नाहुन आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

क्रूर ती रात्र पाहून मोहरुण आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

आन्न्दाच्या दुखात मी पोहून आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

यातनेला साद मी घालून आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

सुर रडके घेउन नाचून आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

मैफिल ही मित्राची साधुन आलो
तो काल दृष्टी योग मी पाहून आलो

काल दृष्टी योग स्म्शानी सोडून आलो
मन आन्नादात मी फुलून आलो

चिमणीताई

Saturday, June 7, 2008

मी एक तारयासारखा होण्याचा प्रयत्न करतोय

मी एक तारयासारखा होण्याचा प्रयत्न करतोय
ज्याला स्वताचा प्रकाश खटतो
पण तरीही कोण जाने का म्हणुन
स्वताहावर पड्नारा प्रकाश टाकून द्यावासा वाटतो

आज पावुस येणार म्हणुन
नेहमी मनाला गारवा वाटतो
इन्द्रधनुष्य आज दिसणार या आशेने
मनाला सावरू की नको हा ध्यास गाटतो

आता फुलपाखरे येतील
माजं रान हिरवे गार करायला हवे
फक्त फुलपाखरे नकोत तर
मला पक्शांचे हवेत थवे

एका तारयाला या सर्वं गोष्टी व्यर्थ आहेत
पण मी तुमच्यातलाच एक तारा आहें

चिमणीताई

Friday, May 30, 2008

ठेव विश्वास माज्यावर.........

ठेव विश्वास माज्यावर
असे कधी म्हाणु नकोस
मित्र आहें मी तुजा
हे कधी विसरु नकोस ||१||

नाते आपले हे प्रेमाचे
अखंड चालू राहू दे
समजून घेतलेस तू मला
मैत्री अशीच वाहू दे||२||

ना मंजूर जर असेल लोकाला
मैत्री आपली सत्याची
जीवन मरण देवाच्या हातात
शरीर मातीच्या मित्याची ||३||

मित्र म्हणजे भावुच आहें
जीवलग, सखा कोणीही समज
दोस्ती आपली पक्की ठेव
तू आता हे लवकर उमज||४||

::chimnitai........

Wednesday, May 7, 2008

मग सांगतो प्रेम माजे .......

वेळ येवुदे अ रे सागरा
मग सांगतो प्रेम माजे
खोल कीती ते.......

वेळ येवुदे अ रे पर्वता
मग सांगतो प्रेम माजे
उंच कीती ते........

वेळ येवुदे अ रे पाखरा
मग सांगतो प्रेम माजे
थ्व्थ्वे कीती ते........

वेळ येवुदे अ गं नर्मदे (नदी )
मग सांगतो प्रेम माजे
उथळ कीती त.......े

वेळ येवुदे अ रे पवना (हवा )
मग सांगतो प्रेम माजे
भ्रमर कीती ते........

वेळ येवुदे अ रे अर्जुना
मग सांगतो प्रेम माजे
लक्ष्नीय कीती ते........

वाट पाहतो त्याची मी
कधी येइल ते.......

अश्रू गाळतो मोत्याचे
आठव्नीत ओघ्ळ्तात ते .......

♥ चिमणीताई♥

अस्चं असतं .....

दोन पावलं
.....तू चाल
दोन पावलं
.....मी चालतो
तुजे आणि
....मज़े सुर
कुठवर जुळतात
.....ते पाहतो
माजा प्रवास
....कठीण आहे
तुज़ी साथ
....हवी आहे
पाव्लान्मागे पावुल
.....पडू दे तुज
वीसंगती नको सम्जू
....हे प्रेम आहे माजे
माजा विचार
....मनात घुन्गाविल तुज्या
रुदयावर हाथ ठेव
.....आणि महं तूच माजा
माज्या एत्केही
.....जवळ येवु नको
की सवय
....होईल तुज़ी
प्रेम मात्र कर
...आभाळा एवढे
मी होइन तुजा
....तू हो माजी

♥ चिमणीताई♥

"वादळवाट"

या वाटेवर चालताना ,
ना तहान लागे ना भूक
आत्माच मला वीचारी,
तू काहून आहेस मूक

अन्धाराच्या बाजारात जर,
वीकता आला प्रकाश
"वादळवाट" आहे ही ,
ना जमीन ना आकाश

प्रेमाचे सुख ,
मीळत नसे कुना
आपले ते आपले ,
पर्क्याला का हीना

जो तो आपले ,
सुख पाहतो
सुखासाठी का होईना,
दुखाच्या पाण्यात नाह्तो

शेवटी का होईना,
सत्य जगाला कळते
मात्र आपले पाऊल,
वादळवाटे कड़े काहून वळत

♥ चिमणीताई♥

वेडे विचार.........

कधी येइल उद्या?..........
आजचा दीवस् जात का नाही?........
मागे परतून पाहावेसे
नाही वाटत आता............

प्रयत्न चालू ठेवले
पण रीत भात नाय माहीत........

खुल्या रुद्याने आसमान ओतले
नफ़ा या तोटा नाय माहीत.......

मित्राचे नाते तेवत ठेवले
सखा आवडतो हेही नाय माहीत........


भरपूर लांब जायचे आहे
कोणी रास्ता दाखवा तर........
कोणी साथ देत नाही
जग नाहीतर मर .......
कोणी पाठ्वील का मला
मायदेशीचे आहेर.........
हा भारत देश च
आहे माजे माहेर.......
आता दूर जाते आहे
वेदना होताहेत.........
बस पूरे आता
लोक मात्र पाह्ताहेत ..........

♥ चिमणीताई♥

आणी भुताकाळातच मी फसले.......

कोण मी ?
............मलाच नाही नाहीत ,
कोणी हाक मार्तयं,म्हान्तायं इथे नाही तुजे हीत,

कोण जाणे ?
............कुणास ठावुक ?
मलाही नाही माहित

अधूरी माजी कहानी ...........
जीव जळतोय माजा
होतेय शरीराची हानी............

पौरानीमेचा चंद्र
................अमावस्येला का येत नाही ?
समुद्राची अथान्गता
................मोज्ता का येत नाही ?

ध्यान माजे
...........हरवून बसले मी...........
कोणी हाक मार्तयं,म्हान्तायं
बघ माधवी तो आरसा.........
ध्यान तुजे हर्वु नकोस
समज़ तूच आहे तुज सारखा...........

आरसा कधी
सांगतो आपली कहानी ?
त्यात शोधावी लागते
एक अमर प्रेम कहानी

बस पूरे जाले आता
नको प्रश्न असले
वर्तमान सोडला
आणी भुताकाळ!तच मी फसले

::::::::चिमनी ताई''''''''

दे एक शब्द मुखी

नको फुल्वु मोरा
आता तुजा पीसावा |
वेड लावले मनाला
मनात माज्या वीसावा ||

प्रेमाचा गुलकंद
मी नाही वीसर्नार |
प्रीती माजी खरी होती
ती नाही मालव्नार ||

तन -मन -धन
अर्पीले तुला |
मी नाही तुजी
सांग त्या वेड्याला||

मन माजे बेधुंद
जसे वाह्नारे पाणी |
त्यात तू मासा
व्यर्थ तुज़ी जवानी ||

मद्य प्याला पीवुनी
जाला का कोनी सुखी ?
नाद माजा सोड्रे
दे एक शब्द मुखी ||

:चिमनी ताई